रोज फ्लेवर शेवई खीर (rose flavour seviya kheer recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#gpr
#गुरु पौर्णिमा स्पेशल
#रोज फ्लेवर शेवई खीर

रोज फ्लेवर शेवई खीर (rose flavour seviya kheer recipe in marathi)

#gpr
#गुरु पौर्णिमा स्पेशल
#रोज फ्लेवर शेवई खीर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपशेवई
  2. 1/2 लिटरदूध
  3. 3-4 टेबलस्पूनसाखर (आवडीनुसार घेणे)
  4. 2-3 टेबलस्पूनमिल्कमेड (आवडीनुसार घेणे)
  5. 1-2 टीस्पूनसाजूक तूप
  6. 2 टेबलस्पूनरोज सिरप
  7. 3-4 थेंबरोज इसेन्स
  8. 1/2 कपगरम पाणी
  9. आवडीनुसार ड्रायफ्रूट

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    प्रथम गॅस वर पातेले किंवा एखादे पसरट भांडे ठेवणे. त्यात तूप घालावे व शेवई घालून छान हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेणे.2-3 मिनिटे लागतात.

  2. 2

    आता या मध्ये अगदी शिजण्या पुरते थोडे गरम पाणी घालून 2 मिनिट शिजवून घेणे. आता या मध्ये आवडीनुसार साखर, मिल्कमेड घालून घेणे.नंतर या मध्ये गरम केलेले दूध लागेल तसे घालून छान एकत्र करून घेणे.

  3. 3

    जशी खीर थंड होते तशी खीर घट्ट होते. म्हणून लागेल तसे दूध घालावे. आता या मध्ये आवडीनुसार रोज सिरप (आवडत असल्यास घालणे) व 3-4 थेंब रोज इसेन्स घालावे. खूप छान गुलाबी रंग व रोज फ्लेवर येतो खीरीला.5मिनिट ही खीर छान शिजवून घेणे.

  4. 4

    आता वरून आवडीनुसार ड्रायफ्रूट घालावेत. मस्त गुलाबी रोज फ्लेवर खीर तयार झाली. खूप छान टेस्टी बनते खीर.

  5. 5
  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

Similar Recipes