रक्षाबंधन विशेष नारळाची वडी (naralachi wadi recipe in marathi)

Vaishali Khairnar
Vaishali Khairnar @cook_24364890

#रेसिपीबुक रेसिपी नं 29
#week 8
#रक्षाबंधन_विशेष पोस्ट नं 2

श्रावण पोर्णिमेसच "श्रावणी" असे देखील म्हटले जाते. पाऊस पडल्यानंतर आनंदी झालेले लोक समाधानाने वेदपुराणाची कथा ऐकण्याचे उत्सव साजरे करीत. तर कुमारांना शिक्षण घेण्यास सुरवात करण्याचा मुहूर्त याच काळात काढला जात असे. अध्ययनाचा प्रारंभ, शौर्याचे शुभचिन्ह या दोन गोष्टी मनोमन लक्षात ठेवणे व तसे आचरण करणे म्हणजे "श्रावणी' साजरी करणे होय. श्रवण नक्षत्रावर श्रावणी करतात.हा सण म्हणजे बहिण भावाचे अतूट नाते दाखवतो.आणि नात्यातला गोडवा वाढवण्यासाठी नारळाचे वेगवेगळे पदार्थ बनवतो पंचपक्वानाचे जेवन बनवतो आणि रेशमी धाग्याला प्रेमाचा रंग देतो. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे नारळाची वडी चला तर रेसिपी पाहुया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
3 सर्व्हिंग
  1. 1 वाटिनारळाचा चव
  2. 1 वाटीसाखर
  3. आवडीनुसार सुकामेवा आणि त्याची भरड
  4. 1 टीस्पूनजायफळ पावडर
  5. 2 टेबलस्पुनदुध
  6. 2 टेबलस्पुनसाजुक तुप

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सर्वात प्रथम नारळ फोडुन त्याचे तुकडे करून मिक्सर मधून बारीक चव करून घ्या.

  2. 2

    आता गॅस वर कढई ठेवून त्यात साजुक तुप घाला आणि नारळाचा चव 3 ते 4 मिनिटे छान परतुन घ्या.

  3. 3

    आता त्यात साखर घाला आणि 5 ते 7 मिनिटे छान परतून घ्या. नंतर त्यात जायफळ,वेलची पावडर, काजु बदामाची पावडर घाला आणि 2 ते 3 चमचे दुध घाला व मिश्रणाचा छान गोळा होईपर्यंत परतून घ्या.

  4. 4

    एका प्लेट ला तुप लावुन त्यावर खोबऱ्याचे मिश्रण टाका व एक सारखे वाटीने प्रेस करा आणि छान हवा तो आकार द्या.आणि ड्रायफ्रुटची भरड टाकुन गार्निश करा.

  5. 5

    मिश्रण गार झाल की वड्या पाडायला घ्या.

  6. 6

    तयार आहे मस्त खुसखुशीत नारळाची वडी नक्की करून पहा खुपच छान होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vaishali Khairnar
Vaishali Khairnar @cook_24364890
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes