नारळीभात (naral bhaat recipe in marathi)

Manali Jambhulkar
Manali Jambhulkar @cook_24745679

#रेसिपीबुक
#नारळीपौर्णिमा
#वीक8
लहानपणा पासूनच आवडीचा भात म्हणजे नारळीभात. खूप सुंदर होतो आणि पटकन होतो.

नारळीभात (naral bhaat recipe in marathi)

#रेसिपीबुक
#नारळीपौर्णिमा
#वीक8
लहानपणा पासूनच आवडीचा भात म्हणजे नारळीभात. खूप सुंदर होतो आणि पटकन होतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाट्याआंबेमोहोर / बासमती तांदूळ
  2. 4 वाट्यापाणी
  3. 2 वाट्याचिरलेला गूळ
  4. 2 वाट्याखोवलेला नारळ
  5. 2 चमचेसाजूक तूप
  6. चिमुटभरकेशर
  7. 5-6लवंग
  8. 2दालचिनी
  9. 4-5वेलची
  10. वेलची पावडर
  11. काजू आणि किसमिस आवडीनुसार
  12. 1 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    सर्वात आधी एक पातेलं घेऊन त्यात साजूक तूप घाला, ते तापले कि त्यात काजू तळून घेऊन बाजूला ठेवा. मग त्यात सर्व खडा मसाला घाला.

  2. 2

    तो जर परतला गेला की त्यात धुतलेले तांदूळ घालून परतून घ्या. नंतर 4 वाट्या पाणी घाला. वरून मीठ आणि केशर घाला, आणि दहा मिनिटे शिजवून घ्या.

  3. 3

    आता एक कढई घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा तूप घालून गुळ घाला आणि खोवलेला नारळ घाला थोडेसे परतल्यानंतर शिजलेला भात घालून मिक्स करा

  4. 4

    आता त्यात वेलची पावडर, केशरी रंग, काजू, आणि किसमिस घालून एकदा ढवळा. झाकण ठेवून 5-10 होउद्या, नंतर गॅस बंद करा. नारळीभात तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manali Jambhulkar
Manali Jambhulkar @cook_24745679
रोजी

टिप्पण्या

Ankita Cookpad
Ankita Cookpad @cook_18445792
Hashtag correct add Kara please Ani week 7 chi recipe ata post kelit?

Similar Recipes