शेगाव कचोरी (Shegaon kachori recipe in marathi)

Jyoti Ghuge
Jyoti Ghuge @cook_20333495

#फ्राईड
शेगाव कचोरी हा शेगाव चा प्रतिष्ठित ब्रांड आहे.शेगावला दरवर्षी लाखो भाविक गजानन महाराजांचे दर्शन घ्यायला येतात आणि दर्शनाला येणारा प्रत्येक भाविक ही कचोरी खाणयाचा मोह टाळू शकणार नाही.
तर आज आपण तीच शेगाव स्पेशल कचोरी बघणार आहोत.

शेगाव कचोरी (Shegaon kachori recipe in marathi)

#फ्राईड
शेगाव कचोरी हा शेगाव चा प्रतिष्ठित ब्रांड आहे.शेगावला दरवर्षी लाखो भाविक गजानन महाराजांचे दर्शन घ्यायला येतात आणि दर्शनाला येणारा प्रत्येक भाविक ही कचोरी खाणयाचा मोह टाळू शकणार नाही.
तर आज आपण तीच शेगाव स्पेशल कचोरी बघणार आहोत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०-४० मिनिट
२-३
  1. 1 कपमैदा
  2. 1 (8 कप)तेल
  3. 1/2 कपबेसन
  4. 1/२ टेबलस्पून लाल तिखट
  5. 1/4 टीस्पूनहळद
  6. 1/2 टीस्पूनआमचूर पावडर
  7. 1 टीस्पूनगरम मसाला
  8. 1 टीस्पूनकसुरी मेथी
  9. 1 टीस्पूनमोहरी
  10. 2 टीस्पूनजिरे
  11. 2-3हिरव्या मिरच्या
  12. 7-8लसूण पाकळ्या
  13. 1 इंचआल्याचा तुकडा
  14. तळण्यासाठी तेल
  15. 1 टीस्पूनधने
  16. 1 टीस्पूनबडीशेप
  17. चवीप्रमाणे मीठ
  18. आवश्यकतेुसार पाणी

कुकिंग सूचना

३०-४० मिनिट
  1. 1

    सर्वात प्रथम एका बाउल मध्ये मैदा घ्या आणि त्यात तेल आणि चवीप्रमाणे मीठ घालून सर्व व्यवस्थित मिसळून घ्या.

  2. 2

    पिठाचा जर मुटका बनत असेल तर समजायचं की आपण जेवढं तेल घातलं ते पिठाला पुरेस आहे.आता मैद्यामध्ये थोड थोड पाणी घालून त्याचा गोळा बनवून घ्या.हा तयार गोळा १५-२० मिनिट बाजूला झाकून ठेवा म्हणजे तो छान मऊ बनेल.

  3. 3

    पिठाचा गोळा मऊ होईपर्यंत आपण कचोरी च स्टफिंग बनवून घेऊ.

  4. 4

    त्यासाठी एक प्यान घ्या त्यात धने,जिरे आणि बडीशेप घाला आणि त्याला छान भाजून घ्या.धने,जिरे आणि बडीशेप व्यवस्थित भाजून झालं की त्याला मिक्सर च्या भांड्यात टाका आणि त्याची जाडसर पूड बनवून घ्या.

  5. 5

    आता पूड प्लेट मध्ये काढून घ्या आणि त्याच भांड्यात हिरवी मिरची चे काप,लसूण पाकळ्या आणि आल्याचे काप घाला आणि त्याची पेस्ट बनवून घ्या.

  6. 6

    आता पॅन मध्ये तेल घाला.तेल गरम झाले की त्यात मोहरी,जिरे घाला आणि छान तडतडू द्या.जिरे,मोहरी छान तडतडले की त्यात आल,लसूण, मिरचीची पेस्ट घाला आणि छान तेला मध्ये परतून घ्या.

  7. 7

    पेस्ट छान परतून झाली की त्यात लाल तिखट, हळद,गरम मसाला,आमचूर पावडर आणि कसुरी मेथी घाला आणि सर्व मसाले तेला मध्ये परतून घ्या.

  8. 8

    मसाले छान परतून झाले की त्यात बेसन घाला आणि बेसन छान भाजेपर्यंत त्याला कमी गॅस वर परतत रहा.बेसनाचा छान सुगंध यायला लागला की समजायचं की आपल बेसन छान भाजल आहे आता त्यावर थोड थोड पाण्याचा हपका मारा.बेसन छान ओल होईल एवढं पाणी घाला.

  9. 9

    आता चवीप्रमाणे मीठ घाला आणि बेसन २-३ मिनिट झाकून ठेवून कमी गॅसवर शिजवून घ्या.आपल कचोरी च स्टफिंग तयार आहे.स्टफिंग थंड व्हायला ठेवा.

  10. 10

    आता पिठाचा गोळा घ्या आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या.आता एक गोळा घ्या आणि हातानेच त्याची पुरी बनवून घ्या.ही पुरी मध्ये जाड आणि त्याचे काठ पातळ करा.आता त्यात तयार स्टफिंग घाला आणि स्टफिंग व्यवस्थित आतमध्ये दाबून घ्या आणि कडा एकत्र करून वरचा जो पिठाचा भाग येतो तो तिथेच दाबून त्याला गोल गोल फिरवून घ्या.

  11. 11

    आता पोळपाट वर ठेवून हा गोळा हलक्या हाताने लाटून घ्या.आणि अश्याप्रकारे सर्व कचोऱ्या तयार करून घ्या.

  12. 12

    आता कढई मध्ये तेल गरम करत ठेवा.तेल गरम झाले की त्यात एक एक कचोरी घालून तिला मध्यम आचेवर छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.अश्याप्रकरे सर्व कचोऱ्या तळून घ्या.

  13. 13

    आपली शेगाव स्पेशल कचोरी तयार आहे.गरमागरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Ghuge
Jyoti Ghuge @cook_20333495
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes