शेगाव कचोरी (shegaon kachori recipe in marathi)

Mansi Patwari
Mansi Patwari @cook_24424122
Dombivli East

#रेसिपीबुक #week4 मी लहानपणापासून नेहमीच शेगाव ला जात असते गजानन महाराजांचा दर्शनासाठी, तिथली कचोरी प्रसिद्ध आहे,मला खूप आवडते ह्या आठवड्यात थीम मुळे मी करून पाहीली,धन्यवाद cookpad

शेगाव कचोरी (shegaon kachori recipe in marathi)

#रेसिपीबुक #week4 मी लहानपणापासून नेहमीच शेगाव ला जात असते गजानन महाराजांचा दर्शनासाठी, तिथली कचोरी प्रसिद्ध आहे,मला खूप आवडते ह्या आठवड्यात थीम मुळे मी करून पाहीली,धन्यवाद cookpad

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

60 मिनिटे
4 जणांसाठी
  1. कचोरी साठी
  2. 2 वाटीमैदा
  3. मीठ चवीनुसार
  4. सारणासाठी
  5. 5 टेबलस्पूनहिरवे वाटाणे
  6. 3 टेबलस्पूनचना दाळ पीठ
  7. 3 टेबलस्पूनतेल
  8. 1/2 टेबलस्पूनमोहरी
  9. 1/2 टेबलस्पूनजिरे
  10. 1/4 टेबलस्पूनहळद
  11. 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  12. 5हिरव्या मिरच्या
  13. 5-6लसून पाकळी
  14. 1 इंचआद्रक
  15. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

60 मिनिटे
  1. 1

    आधी आपण सारण कसे करायचे ते पाहू,हिरवे वाटाणे 5/6 तास भिजत घालून त्यानंतर कुकर मध्ये 1 शिट्टी करून घ्या,मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या...मिरची, लसून व अद्रक ची पण पेस्ट तयार करून घ्या...कढईत तेल टाकून गरम झाले की त्यात मोहरी,जिरे घाला नंतर मिरची पेस्ट घालून ती फ्राय झाली की हळद,मसाला घाला व वाटाण्याची पेस्ट व चना दाळ पीठ पण घालून सगळं मिक्स करा...मीठ घालून परत 7-8 मिनिट फ्राय होऊ द्या,थोडास पाणी घालून 5 मिनिटे वाफ येऊ द्या,हे मिश्रण खूप ओल पण नाही करायचं व कोरड पण नको

  2. 2

    मैदा घ्या त्यात तेल,मीठ घालुन थोडस हातानी ते एकजीव करा व पाण्यानी मऊ भिजवून घ्या..हे पीठ 20 मिनिटे झाकून ठेवा

  3. 3

    सारण पण थंड झालं व मैदा पण भीजाऊन झाला की आता कचोरी करू या,मैद्याचे एक गोळा करा त्यात आपण मोदक करतो तसे सारण भरून त्याला हलक्या हाताने पुरी करतो तशी लाटून घ्या..

  4. 4

    कढईत तेल गरम झाले की कचोरी तळून सर्व्ह करा,त्यासोबत मिरची पण तळुन घ्या खुप छान लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mansi Patwari
Mansi Patwari @cook_24424122
रोजी
Dombivli East

टिप्पण्या

Similar Recipes