बांगड्याचे तिखले (bangdyache tikhale recipe in marathi)

Anuja P Jaybhaye
Anuja P Jaybhaye @cook_21664622

नमस्कार मंडळी 🙏
चवीचे खाताय ना......
अहो खाल्लेच पाहिजे......
तर मंडळी आज आपण बांगडा हा मत्सप्रेमींचा आवडता मासा शिजवणार आहोत.
चवीला अतिशय उत्कृष्ट अश्या माशाबद्दल ची मला माहित असलेली थोडीशी माहिती मी इथे सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.
..
बांगडा (इंग्रजीत Mackerel) हा एक खाऱ्या पाण्यातला मासा आहे. भारताभोवतालच्या समुद्रांत हा मुबलक मिळतो.हा मासा शाकाहारी आहे.
या माशाला अंजारी असेही म्हणतात.
या माशाचे शास्त्रीय नाव बहुधा Sromber srombus असावे.
बांगडा हा मासा उष्ण असतो.
बोंबलानंतर बांगड्याला कॅल्शिअमचा स्रोत म्हणून ओळखला जाते.
याशिवाय,
ओमेगा ३ व प्रथिने, जीवनसत्त्व ‘ड’ व ‘क’ हे घटकही बांगडय़ात असतात.
बांगडा भाजून खाण्यापेक्षा आमटीतून शिजवून खाल्ल्यास त्यातील ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड अधिक प्रमाणात टिकून राहते.
..
चला तर मंडळी आज आपण बनवूया झणझणीत, चमचमीत असे " बांगड्याचे तिखले "

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनीटे
५ व्यक्तींकरीता
  1. 5ओले ताजे बांगडे
  2. 1/2 वाटीखोवलेले ओले खोबरे
  3. 8-9लसूण पाकळ्या
  4. 9-10संकेश्वरी सुक्या मिरच्या
  5. 2 टेबलस्पूनधणे
  6. 1/2 टेबलस्पूनबडीसोप (optional)
  7. 1 टेबलस्पूनकोकम आगळ
  8. 5-6कोथिंबीरीच्या काड्या
  9. 1/2टिस्पून हळद
  10. चवीनुसारमीठ
  11. फोडणीसाठी-
  12. 1 टेबलस्पूनतेल
  13. 2-3ठेचलेल्या लसूण पाकळ्या
  14. 4-5कढिपत्ता पाने

कुकिंग सूचना

10 मिनीटे
  1. 1

    सर्वप्रथम बांगड्यांच्या डोळ्याखालून पोटाकडे चिर मारून पोटातील घाण काढून घ्यावी. खवले असतील तर ते काढून मग बांगडे वाहत्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यावेत. शक्यतो बांगडे आख्खेच ठेवावेत. (दिसायला छान दिसतात) त्यासाठी लहान आकाराचे बांगडे असलेले जास्त छान. आता त्या बांगड्यांना हळद, मीठ, आगळ चांगले चोळून बाजूला ठेवावे.

  2. 2

    मिक्सरच्या भांड्यात सुक्या संकेश्वरी मिरच्या, धणे, बडीसोप, त्रिफळ १० मिनीटे भिजत घालावे. १० मिनीटांनंतर त्यात खोवलेले ताजे खोबरे, लसूण पाकळ्या, कोथिंबीर, कच्ची कैरी आणि मीठ, (मीठ बेतानेच घालावे कारण आपण बांगडे मेरिनेट करताना मीठ घातलेले आहे) जरासे पाणी घालून अगदी छान बारीक वाटून घ्यावे. आता हा बारीक वाटलेला मसाला थोडा थोडा प्रत्येक बांगड्याला खालुन वरून लावून घ्यावा.

  3. 3

    गॅसवर पॅन ठेवून त्यात तेल गरम करून मग त्यात ठेचलेला लसूण, कढिपत्ता पाने घालून एक एक बांगडा त्यात ठेवावा आता २-३ मिनीटे त्यावर झाकण ठेवून द्यावे. ३ मिनीटांनंतर झाकण काढून बांगडे हळुवारपणे उलटवून घ्यावे. आणि पुन्हा ३-४ मिनीटांसाठी झाकण ठेवावे. ५ मिनीटांनंतर झाकण काढून बांगडे पूर्णपणे शिजले आहे का याची खात्री करून गॅस बंद करावा. आपले चमचमीत "बांगड्याचे तिखले" खाण्यासाठी तयार.

  4. 4

    बांगड्याचे तिखले आणि सोबत आंबोळ्या किंवा तांदळाची भाकरी सर्व्ह करावे. गरमागरम वाफाळता भात आणि तिखले सुद्धा अगदी जबरदस्त combination आहे. तर मग मंडळी एकदा नक्की करून पहा "बांगडयाचे तिखले"....

  5. 5

    धन्यवाद 🙏☺️

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anuja P Jaybhaye
Anuja P Jaybhaye @cook_21664622
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes