गरमागरम ब्रेड पकोडा (ब्रेड सॅन्डविच) (bread pakoda sandwich recipe in marathi)

Vaishali Khairnar
Vaishali Khairnar @cook_24364890

#रेसिपीबुक #week9
#पोस्ट नं 38
सध्या पावसाळा सुरू आहे सगळीकडेच पावसाच्या सरी कोसळताय आणि अशा पावसात ब्रेड पकोडा खाण्याची काय मज्जा असते ती सांगायलाच नको 😘 आज असच मी आणि हबी आम्ही दोघेही पावसात खुप भिजलो आणि घरी आल्यावर काहीतरी चटपटीत चमचमीत स्नॅक्स खायची इच्छा झाली आणि योगायोग असा की ब्रेड आणलेला होता. पण अशा वेळेस पटकण काय होईल असा विचार येतो मग काय जास्त वेळ पण लागायला नको आणि पटकन गरमागरम खायला पण भेटल पाहिजे. म्हणून काही न करता झटपट असा ब्रेड पकोडा बनवला.आणि इतका छान झाला की पटकन संपले..... चला तुम्हाला माझी झटपट अशी रेसिपी सांगते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
2 सर्व्हिंग
  1. 150 ग्रॅमबेसनपीठ
  2. 5 टेबलस्पुनतांदळाचे पीठ
  3. 1 टेबलस्पुनओवा
  4. 1 टेबलस्पुनजीरे
  5. चवीनुसारमीठ
  6. 2 टेबलस्पुनबारीक चिरलेली कोथिंबीर
  7. अगदी चिमूटभर खायचा सोडा
  8. 1 टीस्पूनहळद
  9. घोळ बनवण्यासाठी पाणी

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    सर्वात प्रथम एका भांड्यात बेसनपीठ घ्या त्यात तांदळाचे पीठ घाला व छान मिक्स करून घ्या.

  2. 2

    त्यात हळद, मीठ, ओवा, जीरे, हिंग, घालून छान हाताने मिक्स करून घ्या

  3. 3

    आणि आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि छान घट्ट घोळ बनवून घ्या.व त्यात दोन ब्रेड एकत्र घेऊन बॅटर मध्ये बुडवून गॅस वर गरम केलेल्या तेलात एक एक छान तळुन घ्या.

  4. 4

    तयार आहे मस्त गरमागरम ब्रेड पकोडा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vaishali Khairnar
Vaishali Khairnar @cook_24364890
रोजी

Similar Recipes