अळीव मखाना लाडू - (ALIV LADOO RECIPE IN MARATHI)

Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542

#रेसिपीबुक #week9

#फ्युजन माझी फ्युजन रेसिपी
अळिवाचे लाडू आपल्याकडे खूप लोकप्रिय आहेत. अळिवाचे लाडू फक्त बाळंतिणीनंच खावे असं नाही. अळीव खूप पौष्टिक असतात. प्रत्येकाने रोज एक चमचा अळीव खावे असं nutritionists सांगतात.
मखाना म्हणजे कमळाच्या बियांच्या लाह्या. ह्या उत्तर भारतात खाल्ल्या जातात. मी अळीव आणि मखाना घालून लाडू बनवते. ही फ्युजन रेसिपी माझं इनोव्हेशन आहे. फक्त अळिवाचे लाडू मऊ होतात. मखाना घालून लाडू छान खुटखुटीत होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

300 मि
10 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपअळीव
  2. 2 कपताजा खवलेला नारळ
  3. 1 कपमखाना
  4. 2 कप चिरलेला गूळ
  5. 1/2कप (नारळाचे पाणीउपलब्ध असेल तर; नसेल तरी हरकत नाही)
  6. 1/2 चमचावेलची पूड
  7. 1 टेबलस्पूनतूप
  8. आवडीनुसारसुका मेवा
  9. चिमूटभर मीठ (ऐच्छिक)

कुकिंग सूचना

300 मि
  1. 1

    अळिवात नारळ, नारळाचे पाणी आणि गूळ घालून एकत्र करा आणि ३-४ तास झाकून ठेवा.

  2. 2

    मखाना सुकेच कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. गार झाल्यावर मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्या.एका जाड बुडाच्या भांड्यात अळिवाचे मिश्रण बारीक गॅस वर शिजवा. एक सारखे ढवळत रहा म्हणजे पातेल्याला चिकटणार नाही.

  3. 3

    मिश्रण सुकले की त्यात वेलची पावडर,तूप, सुका मेवा आणि आवडत असल्यास चिमूटभर मीठ घाला व मिश्रण एकत्र करा.गॅस बंद करून पातेल्यात मखाना ची पूड घाला व ढवळून घ्या.मिश्रण कोमट असताना छोटे लाडू वळा.

  4. 4

    हे लाडू न्याहरीला, चहाबरोबर खायला द्या.हे लाडू ३-४ दिवसापेक्षा जास्त राहणार असतील तर फ्रिज मध्ये ठेवावे लागतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes