व्हर्मिसिली कस्टर्ड (Vermicelli Custard pudding recipe in marathi)

Vaishali Khairnar
Vaishali Khairnar @cook_24364890

#रेसिपीबुक
#week 9
#फ्युजनरेसिपीज
Post no 1
#तिरंगा
भारतामध्ये आणि भारतीय उपखंडातील इतर देशात गव्हाच्या शेवया बऱ्याच नावांनी ओळखल्या जातात जसे की गुजरात मध्ये सेव ,कन्नड मध्ये सेवेज ,शेवलु, तेलगु मध्ये सेमया, तमिळ आणि मल्याळम मध्ये सेमिया, असे म्हणतात महाराष्ट्रात शेवया असे म्हणतात या अनेक भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात. तांदळाच्या पिठापासून ,गव्हाच्या मैद्यापासून बनवल्या जातात .ज्यात फक्त मैदा पाणी मीठ असते. महाराष्ट्रात गव्हापासून शेवया बनवल्या जातात यात लोकवन गहू चा वापर मुख्यता करण्यात येतो. खानदेशात हात हातच्या शेवया केल्या जातात व्हर्मिसिली म्हणजेच शेवया या झटपट बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत व्हर्मिसिली, स्पगेटी ,केपीलीने हे सर्व पदार्थ एकाच आकाराचे असतात पण त्यांची जाडी वेगवेगळी असते म्हणून ते वेगवेगळ्या वेळेत शिजवल्या जातात स्पगेटी ही जाड असते आणि ती मुख्यता पास्ता सॉस बरोबर खाल्ली जाते. व्हर्मिसिली चे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.महाराष्ट्रात घरोघरी शेवया बनवल्या जातात या आकाराने बारीक असतात आणि यात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते पास्ता नूडल्स खाणाऱ्यांसाठी शेवया हा एक उत्तम पर्याय आणि आरोग्यासाठी उत्तम असा पर्याय आहे आपण वजन कमी करण्यासाठी याचा वापर करू शकतो. महाराष्ट्रात शेवयांचे बरेच प्रकार बनवले जातात. जसे की शेवयांची खीर गोड शेवया शेवयांचा उपमा तिखट शेवया असे अनेक प्रकार आपण बनवतो आणि जसे गाव बदलते तशी त्याची चवही बदलते तर आज आपण व्हर्मिसिली चा एक फ्युजन प्रकार पाहणार आहोत इटालियन+ मेक्सिकन ला महाराष्ट्रीयन टच व्हर्मिसिली कस्टर्ड / शेवया कस्टर्ड/ चला तर मग रेसिपी पाहूया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
3 सर्व्हिंग
  1. 150 ग्रॅमशेवया
  2. 250 दुध
  3. 100 ग्रॅमसाखर
  4. मी ली आवडीनुसार सुकामेवा
  5. 2 टेबलस्पुनकस्टर्ड पावडर
  6. 1/2 टीस्पूनजायफळ वेलची पुड प्रत्येकी
  7. 2 टेबलस्पुनसाजुक तुप
  8. 2 टेबलस्पुनखोबरा किस
  9. 2 टेबलस्पुनखस पल्प, आॅरेंज पल्प

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    सर्वात प्रथम एका कढईत साजुक तुप घालुन 1 ते 2 मिनिटे शेवया छान भाजुन घ्या.थोडा रंग बदलला की गॅस बंद करा आणि लागणारे साहित्य बाजुला काढुन ठेवा.

  2. 2

    आता भाजलेल्या शेवया एका प्लेट मध्ये काढुन घ्या व त्याच कढईत दुध घाला आणि छान उकळुन घ्या.दुध छान उकळले की त्यात कस्टर्ड पावडर घाला.आणि छान घट्ट होईपर्यंत ढवळत रहा तुम्ही एका वाटीत दुध घेऊन कस्टर्ड पावडर टाकुन घोळ बनवून घेऊ शकता.

  3. 3

    आता त्यात साखर घाला आणि छान मिक्स करून घ्या व त्यात शेवया घालून छान शिजवुन घ्या.

  4. 4

    आता आवडीनुसार त्यात किसलेले खोबर सुकामेवा घालून एकजीव करून घ्या.व त्यात वेलची जायफळ पावडर घालुन एक उकळी काढून घ्या.

  5. 5

    तयार आहे मस्त व्हर्मिसिली कस्टर्ड थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवुन गार गार खायला तयार सर्व्ह करा आवडीनुसार सुकामेवा चेरी घालुन.

  6. 6

    याच रेसिपी ला आपल्या तिरंगा थिम साठी तयार केले आहे त्यात हिरवा रंग म्हणुन मी खस पल्प आणि केसरी रंगासाठी आॅरेंज पल्प वापरला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vaishali Khairnar
Vaishali Khairnar @cook_24364890
रोजी

Similar Recipes