व्हिट बेस पिझ्झा (wheat base pizza recipe in marathi)

सायली सावंत
सायली सावंत @cook_22852731

#noovenbaking
नोओव्हनबेकिंग

व्हिट बेस पिझ्झा (wheat base pizza recipe in marathi)

#noovenbaking
नोओव्हनबेकिंग

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिट
  1. पिझ्झा बेस साठी
  2. 1/2 कपगव्हाचे पीठ
  3. 1/4 टीस्पूनबेकिंग पावडर
  4. 1/8 टीस्पूनबेकिंग सोडा
  5. 1/2 कपदही
  6. 2 टीस्पूनतेल
  7. चवीनुसारमीठ
  8. Toppings साठीी
  9. थोडी हिरवी, लाल, पिवळी सिमला मिरची
  10. 1टोमॅटो
  11. 1/2 कपउकडलेले स्वीट कॉर्न
  12. 1/2 कपपिझ्झा सॉस
  13. 3 टेबल स्पूनटोमॅटो सॉस
  14. आवशक्यतेनुसार बटर
  15. आवशक्यतेनुसार मोझेरेला चीझ

कुकिंग सूचना

45 मिनिट
  1. 1

    प्रथम गव्हाच्या पिठात मीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा एकत्र करून घेतले.

  2. 2

    मग त्यात तेल व अर्धा कप दही घालून पीठ चांगले मळून घेतले. आणि ओल्या फडक्यात 15 मिनिटे झाकुन ठेवले.

  3. 3

    नंतर एक मोठी कढई गरम करायला ठेवली. मग त्यात मीठ घालून त्यावर एक रिंग ठेवून त्यावर एक थाळी ठेवावी व 5 ते 10 मिनिटे मोठ्या गॅसवर प्रीहीट करून घेतली. 10 ते 15 मिनिटांनी भिजवलेल्या पिठाची पोळ्या लाटून, त्यावर काट्याच्या चमच्याने टोचे मारून घ्यावे.

  4. 4

    कढईतील थाळीला तेलाने ग्रीस करून घेतले, व त्यात लाटलेला पिझ्झा बेस बेक करण्यासाठी ठेवला व त्यावर झाकण ठेवले.

  5. 5

    मग बेक केलेल्या बेस व पिझ्झा टॉपिंग साठी भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून, पुसून, चिरून घेतलया.

  6. 6

    आता पिझ्झा बेसला बटर लावून घेतले. मग त्यावर मधोमध पिझ्झा सॉस लावला. नंतर टोमॅटो सॉस, कॉर्न, सिमला मिरची, वरून मोझरेला चीझ घालून, मग पिझ्झा तव्यावर ठेवून चीझ वितळू लागलयावर गॅस बंद करून, पिझ्झा डिश मधे काढून घेतला. आणी खायला तयार गहू पिठापासुन बनवलेला पिइझा. या सामानातून मिडीयम आकाराचे तीन पिइझा तयार होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
सायली सावंत
रोजी

टिप्पण्या (2)

सायली सावंत
सायली सावंत @cook_22852731
या Shravan महीना मधे मी माइया 102 रेसिपी बनविलया. या साठी मी अंकिता मेडम यांची खूप खूप आभारी आहे. कारण वेळोवेळी मला अंकिता मेडम यांनी खूप खूप मदत केली आहे. अंकिता मेडम परत एकदा ञिवार वंदन.

Similar Recipes