मूगाच्या सालीचे  पकोडे (moongachya saliche pakode recipe in marathi)

Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
Mumbai

#फ्राईड

मौसम मस्ताना असताना गरमागरम पकोडे खायचा मोह नक्कीच होणार हो की नाही? मग होऊन जाऊ देत एक आगळे वेगळे मुगाच्या सालीचे पकोडे

मूग हे कडधान्य खूप पौष्टीक असते तसेच मूगा चे साल देखील... या सालींचे गरमा गरम पकोडे केले की ते अधिकच चविष्ट व मस्त कुरकुरीत लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. १०० ग्रॅम मूग
  2. 10 टेबलस्पूनबेसन
  3. 2 टेबलस्पूनतांदळाची पिठी
  4. 1बारीक चिरलेला कांदा
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  7. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  8. 1 टेबलस्पूनधने पूड
  9. चिमूटभरओवा
  10. तेल
  11. गरजेनुसार पाणी
  12. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

5 मिनिटे
  1. 1

    प्रथम आदल्या दिवशी मूग भिजत घालावे. मग दुसऱ्या दिवशी मूग सोलून त्याची साले घ्यावीत सोबतीला थोडे मूग ही घ्यावेत

  2. 2

    एका बाउल मध्ये मुगाची साले चिरलेला कांदा... कांदा जर नको असेल तर नाही घेतला तरी चालेल. त्यात वरील सर्व मसाले घालावेत. नंतर ओवा आणि एक टेबल स्पून गरम मोहन घालावे. त्यात चवीनुसार मीठ टाकून मिश्रण चांगले एकजीव करावे. गरज लागल्यास थोडे पाणी टाकावे.. मिश्रण जास्त मऊ करू नये

  3. 3

    कढईत तेल तापवून मंद आचेवर याचे पकोडे करून मस्त तळून घ्यावेत.. अशाप्रकारे आपले हे गरमागरम पकोडे सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
रोजी
Mumbai
cooking makes my tummy happy🍱
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes