रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
२०/२१ पुरणपोळ्या
  1. 1/2 किलोचणाडाळ
  2. 1/2 किलोगुळ
  3. १०० ग्रॅम साखर
  4. 1/2 किलोमैदा
  5. 3 टेबलस्पुनगव्हाच पिठ
  6. 1/2 टिस्पुनकाळेमिरी पुड
  7. 1/2 टिस्पुनसुंठपुड
  8. 1 टिस्पुनवेलची जायफळपुड
  9. 1/2 टिस्पुनहळद
  10. 3 टेबलस्पुनतेल
  11. लाटण्यासाठी तांदुळाची पिठी

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    चणाडाळ धुवून ३/४ तास भिजत ठेवा, नंतर कुकर्मांच लावून ३/४ शिट्या काढुन शिजवून घ्या. डाळ गरम ‌सतावीत त्यातले सर्व पाणि काढुन त्यात साखर घाला नंतर गुळ घालुन पुन्हा चांगले शिजवून घ्या. चांगले सुकवुन थंड करायला ठेवा

  2. 2

    थंड झालेले पुर्ण पुरणयंत्रातुन किंवा मिक्सरमधुन चांगले बारिक वाटुन घ्या नंतर त्यात मिरेपुड, सुंठपुड, वेलची जायफळपुड घालुन मिश्रण चांगले एकजीव करुन त्याचे आपल्या आवडीप्रमाणे गोळे करुन ठेवा.

  3. 3

    मैदा गव्हाच पिठ चाळून घ्या त्यात हळद आणि २ टेबलस्पुन तेल आणि मिठ घालुन पिठ चांगले मळुन घ्या ऊरलेल तेल घालुन पुठ चांगले मऊ करुन त्याचे, पुरणाचे जेवढे गोळे आहेत तेवढे गोळे करुन घ्या

  4. 4

    पिठाच्या गोळ्यात पुरणाचे गोळे भरुन घ्या, तांदुळाची पिठी वापरुन पोळ्या लाटुन तव्यावर चांगल्या खरपूस भाजुन घ्या वरुन साजुक तुप लावून तुप किंवा दुधाबरोबर सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sadhana Salvi
Sadhana Salvi @cook_22587757
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes