पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चणाडाळ स्वच्छ पाण्याने धुऊन दोन तास पाणी घालून भिजत घातली. नंतर दोन तासांनी मोठ्या पातेल्यात चणाडाळ शिजायला ठेवली. डाळ शिजताना मधून मधून फेस येतो, तो काढून टाकावा. डाळ चांगली शिजलयावर गॅस बंद केला, व डाळ गाळून घेतली. त्यातील पाणी काढून बाजूला ठेवले.
- 2
नंतर त्या डाळीत साखर व गूळ घालून गँसवर मंद आचेवर पुरण बनवायला ठेवले.
- 3
मग पुरणात वेलची पावडर व जायफळ पावडर घालून तयार झालेले पुरण एका पातेल्यात काढून घेतले.
- 4
मग परातीत रवा चाळून घेतला व वीस मिनिटे भिजत ठेवला. नंतर त्यात चाळलेला मैदा, गव्हाचे पीठ व चवीनुसार मीठ घालून पिठ मळून घेतले.
- 5
मळलेल्या पीठात तेल घालून ३ ते ४ तास मुरायला ठेवले. चार तासानंतर पिठाचे गोळे करून, त्यात पुरण भरून हलक्या हाताने पोळी लाटून घेतली. आणि तव्यावर दोन्ही बाजूने खरपुस भाजुन, त्यावर साजूक तूप घालून सर्व्ह करावी गरमा गरम पुरण पोळी.
- 6
डाळ गाळून जे पाणी आपण बाजुला ठेवले होते त्याची आमटी करायची. त्यासाठी तेल गरम झाल्यावर ४-५ लसूण पाकळ्या ठेचून घातल्या. मग त्यावर एक चमचा राई घाला.राई तडतडल्यावर त्यात अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट घालून त्यावर डाळीचे पाणी व थोडे वाटलेले पुरण घालून एक उकळी आली, की त्यात मीठ घाला. या आमटीला कटाची आमटी म्हणतात. पुरणपोळी बरोबर कटाची आमटी, दूध, तुप बरोबर सर्व्ह करावी.ही आमटी भाताबरोबर सुद्धा छान लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11मैदा पेक्षा गव्हाच्या पिठाची पोळी चवीला खूप छान लागते. shamal walunj -
-
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला आपली महाराष्ट्रीयन पारंपारिक पुरणपोळीची रेसिपी शेअर करत आहे.काहीजण मुगडाळ वापरून सुद्धा ही पुरणपोळी बनवू शकतात.माझी आजी नेहमी म्हणायची की पुरण घातले की लगेचच त्याचे कणिक मळून ठेवावे म्हणजे कणिक छान मुरले की पुरणपोळ्या सुद्धा खूप सुंदर बनतात.तुम्हालाही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
पारंपारिक पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11।।।।।सण वर्साचा हा गौरी गणपतीइथ येईल आनंदाला भरती.....साडी चोळी नवी नेसुन मिरवायालागौरी गणपतीच्या सणालाबंदु येईल माहेरी न्यायलागौरी गणपतीच्या सणाला....।।।।। Priyanka Sudesh -
शाही पुरणपोळी (shahi puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 सण म्हटलं कि पुरणपोळी हि आलीच आणि ति न आवडणारे फार कमी जण असतील ... मी आज जरा नेहमीच्या पुराणपोळीत थोडा मावा घेतला छान झाल्यात तुम्ही करून बघाDhanashree Suki Padte
-
-
-
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week11 पुरणपोळी ही 5पक्वानांपैकी 1 जसे बाप्पाला मोदक प्रिय तश्या गौराईला पुरणपोळ्या प्रिय चला बघुया कश्या करायच्या ते Manisha Joshi -
-
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 माहेरवाशीण म्हणून गौरी आल्या की त्यांच्यासाठी छान गोडधोड स्वयंपाक केला जातो.प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीचा नैवेद्य दाखवला जातो.बहिणीच्या सासरी खड्यांच्या गौरी बसतात.मग त्यांच्यासाठी खास पुरणपोळीचा नैवेद्य करतात.यावर्षीही आम्ही गेलो होतो.मस्त पुरणपोळी आणि साग्रसंगीत स्वयंपाक करून नैवेद्य अर्पण केला. Preeti V. Salvi -
-
पारंपारिक पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11देवीच्या नैवेद्यात पुराणाचे फार महत्व आहे. ह्या गौरी पुजनाला मी पारंपारिक पुरण पोळी केली होती. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11पुरण पोळी, एक आपली रेसिपी, आपल्या महाराष्ट्रीय समृद्ध संस्कृतीतले आणि विस्तृत खाद्यसंस्कृतीतले एक खमंग पान. ही रेसिपी इतकी आपली आहे की महाराष्ट्राला पुरणपोळीचा जिओ टॅग मिळायला हवा. तुम्ही आपल्या पद्धतीच्या अनेक रेसिपी बनवू शकत असालात तरी पुरणपोळी हा एक सर्वमान्य मापदंड आहे. पुरणपोळी करता आली म्हणजे मराठी पद्धतीचे जेवण बनविण्याची बॅचलर्स डिग्री मिळण्यासारखे असते."होळी रे होळी, पुरणाची पोळी..." अशी आरोळी प्रसिद्धच आहे. पण पुरणपोळी होळीपुरता मर्यादित नाही. पाडवा असो वा पोळा, गौरी-गणपती असो वा कृष्ण, जिथे कुठे सर्वोत्तम गोड पदार्थाचा नैवेद्य दाखविण्याची इच्छा होइल, किंवा गृहिणीला आपले कसब दाखवून कुणा खास पाहुण्यांचे स्वागत करायचे असेल तर पुरणपोळी सारखा पर्याय नाही.पुरणपोळ्या विकत मिळत असल्या तरी तो अगदीच अडचणीत सापडलेल्यांसाठी शेवटचा पर्याय असू शकतो. पण पुरणपोळी बनविण्याची नाही तर ती साजरी करण्याची गोष्ट आहे. आदल्या रात्री डाळ भिजत घालण्यापासून याची सुरुवात होते. दुसऱ्या दिवशी ती डाळ उकडणे, त्यात गूळ घालून शिजवणे, पुरण यंत्रातून त्याचे पुरण करणे, हे सगळे लाड आधी पुरवावे लागतात. घाटण्याचा, पुरण यंत्र फिरविण्याचा नाद स्वयंपाकघरात घुमायला हवा. पुरणाच्या गोळ्यांचा आणि मऊ पिठाचा स्पर्श हाताला व्हायला हवा. अलगद, मायेने पण सराईतपणे लाटणे गोळ्यावरुन फिरायला हवे. तव्यावर फुगलेल्या पुरणपोळीवर साजूक तुप लावतानाचा सुगंध घरभर दरवळायला हवा. आणि इतके सारे होऊन पुरणपोळी खाण्यासाठी मन आतुर झाले असताना आधी देवाला नेवैद्य दाखवेपर्यंत वाट पहाणे देखील आले. तेव्हा कुठे ही सेलिब्रिटी आपल्या पानात अवतरते. सादर आहे ही आपली मराठमोळी रेसिपी... Ashwini Vaibhav Raut -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 माझ्या घरात सणासुदीला गोडधोडाचा स्वयंपाक बनतो. त्यात पुरणपोळी म्हणजे लहानापासून मोठ्यांपर्यंत आवडणारा पदार्थ म्हणूनच तुमच्या सोबत पुरणपोळी ची रेसिपी शेअर करत आहे. Sushma Shendarkar -
-
पुरणपोळी(puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक#वीक3#पोस्ट1महाराष्ट्रात मोठ्या सणावाराला आवर्जून केला जाणारा पुरणपोळीचा नैवेद्य Arya Paradkar -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #पुरणपोळी.. आपली मराठी खाद्यसंस्कृती म्हणा किंवा एकूणच पाककला म्हणा ..हे एक सायन्सच आहे..पाकशास्त्र असं उगाच म्हणत नाहीत याला..ही एक प्रकारची तपश्र्चर्याच आहे..यामध्ये सातत्य,प्रयोगशीलता, चिकाटी,मनापासून आवड हवीच हवी. एखादा पदार्थ जमला नाही तर पुढच्या वेळेला आधीच्या चुका टाळून चिकाटीने तो पदार्थ सराईतपणे जमेपर्यंत करण्याचे सातत्य ...इथेच खर्या सुगरणीचा कस लागतो.आता हेच बघा ना उकडीचे मोदक आणि पुरणपोळी..हे दोन्ही पदार्थ सुबक रितीने जमण्यासाठी काही वर्ष खर्ची घालावी लागतात..तेव्हां कुठे अन्नपूर्णा देवी आपल्यावर प्रसन्न होते. पुरणपोळी आणि उकडीचे मोदक हे तसं राजेशाहीच ..तामझामवालं काम..दोन्हीसाठी निवांत पणा आवश्यक..कसंतरीच उरकायला जाल तर फजिती ही ठरलेलीच..आदल्या दिवशी पासून हे आपल्या आगमनाची वर्दी द्यायला भाग पाडतात..घरातील मंडळींचा काही ना काहीतरी हातभार लागलाच पाहिजे. नादलयताल सणाचा फिल देतो घरातील कुळधर्म कुळाचार असो,होळी ,पोळाअसो..सणसमारंभअसो,अगदीबारशापासून,डोहाळजेवणापासून ते मंगळागौरी पर्यंत,बोडणापर्यंत पानात, नैवेद्यासाठी पुरणावरणाचा स्वयंपाक हवाच..काही वेळेस पुरणपोळी जरी विकत आणली तरी शकुनाचे म्हणून पुरण करतेच घरची गृहिणी.. त्याशिवाय तिला चैन पडतच नाही..तर अशी ही पुरणपोळी म्हणजे आपल्या खाद्यसंस्कृतीची अनभिषिक्सम्राज्ञीचहोय.. Bhagyashree Lele -
विदर्भ स्पेशल पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11# पुरणपोळीमी मुळची सागंली भागातील मात्र नवरोबाच्या नोकरीमुळे नागपूर ,अमरावती याठिकाणी रहाणं झाले माझ्या मुलीला तिकडची भरगच्च पूरण असलेली पुरणपोळी खूप आवडते ही पुरणपोळी खूप मोठी नसते पण पुरण खूप असल्याने एक किंवा दोन पोळ्यात पोट टम्म भरते गरमागरम तुपासोबत खायची ही पुरणपोळी. Supriya Devkar -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week11माझ्या कुटुंबात पुरणपोळी सगळ्यांना भरपूर आवडते .विशेष म्हणजे गौरी-गणपतीच्या सणात पुरणपोळी ला विशेष महत्व , गौराई दीड दिवसाची पाहुनी माहेरी आलेली असते आणि तिला गोड-धोड म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. Minu Vaze -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 रेसिपी-1 पुरणपोळीचा नैवेद्य म्हणजे महानैवेदय. प्रत्येक सणाला पुरणपोळी हवीच. गौरी पूजनाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. आमच्याकडे सर्वांना आवडते. Sujata Gengaje -
साखर पुरणपोळी (sakhar puran poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी रेसिपी पुरणपोळी ही महाराष्ट्रातील पॉप्युलर स्वीट डिश आहे. मी ह्यात गुळाऐवजी साखरेचा वापर करून बनवले आहे .खूप मस्त ,सॉफ्ट बनली. Najnin Khan -
पारंपारिक पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी आणि आप्पे रेसिपी 1 Varsha Pandit -
-
पुरणपोळी महानैवेद्य (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी आणि आप्पे रेसिपी 1 Surekha vedpathak -
पारंपारिक पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पूरणा सारखा पवित्र मंगलकारक नैवेद्य नाही . ताट भरून तोंड भरून षडरस युक्त व प्रोटिनयुक्त, व्हिटॅमिन्स असलेली पुरणपोळी हा सुरेख नैवेद्य आहे.पुरणाचे ताट जसे दृष्टीसुख देते तसे बाकीचे नैवेद्य देत नाहीत अशी ही मंगलकारक, पारंपरिक पुरण पोळी आहे. चला तर कशी करायची पाहूयात .... Mangal Shah -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी महाराष्ट्र चा पारंपारिक पदार्थ. असा म्हणतात हा सहज जमत नाही आणि जमलं तर सुगरणच झाली म्हणा ती व्यक्ती. असा हा पदार्थ माझ्या रेसीपीबुक मध्ये असणे म्हणजे माझी रेसीपीबूक परिपूर्ण वाटेल. चला करूया पुरणपोळी. Veena Suki Bobhate -
-
More Recipes
टिप्पण्या