पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)

Archana Joshi
Archana Joshi @cook_24269405
Johannesburg

#रेसिपीबुक #week11

हा माझा पुरणपोळीचा पहिलाच प्रयत्न होता आणि अगदी यशस्वी झाला. सणावाराला सासूबाई किंवा आई च पुरणपोळी करायच्या आणि माझ्यापर्यंत कधीच वेळ आली नाही करायची. सो धन्यवाद cookpad या थीम बद्दल. यानिमित्ताने मी पुरणपोळी करायचा योग आला आणि यशस्वी जमल्याने आनंद द्विगुणित झाला.

पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)

#रेसिपीबुक #week11

हा माझा पुरणपोळीचा पहिलाच प्रयत्न होता आणि अगदी यशस्वी झाला. सणावाराला सासूबाई किंवा आई च पुरणपोळी करायच्या आणि माझ्यापर्यंत कधीच वेळ आली नाही करायची. सो धन्यवाद cookpad या थीम बद्दल. यानिमित्ताने मी पुरणपोळी करायचा योग आला आणि यशस्वी जमल्याने आनंद द्विगुणित झाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
४ सर्विंग
  1. 1 वाटीहरभरा डाळ
  2. 1 वाटीगूळ
  3. 1 टीस्पूनवेलचीपूड
  4. 1 टीस्पूनजायफळ पूड
  5. 1 वाटीगव्हाची कणिक
  6. 1 टीस्पूनहळद
  7. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    आधी डाळ २ तास भिजवून ठेवा व नंतर ५-६ शिट्ट्या काढून शिजवून घ्या. थोडी हळद व मीठ घाला शिजताना.

  2. 2

    आता डाळ व गूळ एकत्र १०-१५ मिनिटे परतून घ्या. मिश्रण घट्ट होईपर्यंत.

  3. 3

    आता गार झाल्यावर हे मिश्रण मिक्सर मधून बारीक काढून घ्या. यात वेलची व जायफळ पूड मिक्स करा. पुरण तयार आहे.

  4. 4

    गव्हाची कणीक नेहमीपेक्षा सैलसर मळून घ्या व छोटे गोळे करून यात पुराण भरून पोळी लाटून घ्या.

  5. 5

    दोन्हींनी पोळी व्यवस्थित भाजून घ्या. मऊ, लुसलुशीत व गोड पुरणपोळी तयार आहे.

  6. 6

    ही पोळी अशीच तूप लाऊन गरमगरम खाऊ शकतो किंवा कटाची आमटी व दूध यासोबतही खाऊ शकतो.

  7. 7

    पोळीवर तूप हे असलच पाहिजे म्हणजे पचायला सोपं पडतं.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Joshi
Archana Joshi @cook_24269405
रोजी
Johannesburg

टिप्पण्या

Similar Recipes