रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

३० मिनिटे
३-४ सर्व्हिंग
  1. १५० ग्रॅम मैदा
  2. 2 टेबलस्पूनबेसन
  3. 1/4 टीस्पूनहळद
  4. चीमुठभर हिंग
  5. चीमुठभर मीठ
  6. 2 टेबलस्पूनगरम तेल
  7. ५० ग्रॅम सुकं खोबरं
  8. 1 टीस्पूनजीरे
  9. 1 टीस्पूनधणे
  10. 1 टीस्पूनबडीशेप
  11. 2 टीस्पूनतीळ
  12. 1 टीस्पूनखसखस
  13. 1/4 टीस्पूनहळद
  14. 1 टीस्पूनलाल तिखट
  15. चीमुठभर हिंग
  16. 1/2 टीस्पूनआमचूर पावडर
  17. 2 टीस्पूनसाखर
  18. 1/2 टीस्पूनमीठ
  19. 2 टीस्पूनचिंचेची चटणी

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    मैद्याच्या पीठात बेसन पीठ, हळद, हिंग आणि मीठ घालून मिक्स करावे. गरम तेल घालून चांगले एकजीव करावे.

  2. 2

    थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे. तेल लावून २० मिनिटे झाकून ठेवावे. मसाला बनविण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात सूकं खोबरं, जीरे, धणे, बडीशेप, तीळ, खसखस, हळद, लाल तिखट, हिंग, आमचूर पावडर, साखर आणि मीठ घालून बारीक वाटून घ्यावे.

  3. 3

    पीठाचा गोळा लाटून त्यावर चिंचेची चटणी लावून त्यावर तयार केलेला मसाला लावावा. थोडे हाताने दाबून घ्यावे जेणेकरुन मसाला चांगला लागेल पीठाला.

  4. 4

    रोल करून कापून घ्यावे. हलके हाताने दाबावे.

  5. 5

    कढईत तेल गरम करून त्यात बाकरवड्या चांगल्या खरपुस तांबूस रंगाच्या तळून घ्याव्यात.

  6. 6

    सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Priyanka Sudesh
Priyanka Sudesh @cook_22358434
रोजी
Thane
I am software engineer by profession. Like to cook different foods by passion.
पुढे वाचा

Similar Recipes