आळूवडी (aluvadi recipe in marathi)

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
Kalyan

#रेसिपीबुक #week14

आळूवडीआणिबर्फीरेसिपीpost1
कुरकुरीत खमंग अळूवडी बहुधा लहान-थोर सर्वानाच  आवडते.  पूर्ण श्रावण आणि पावसाळ्यामधे अळूची पाने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. काळसर देठाची अळू ही अळूवडीसाठी वापरली जातात आणि साधारण हिरवट देठाची पाने अळूच्या भाजीसाठीवापरली जातात.
तळताना अळूवडीच्या सुटत जाणा-या खमंग पदरासारख्या कितीतरी आठवणी ह्या एका मराठमोळ्या पदार्थांभोवती घुटमळतात. एकेका सुरेख आठवणींचे पदर हळूहळू उलगडत पार भुतकाळाची वारी घडवून आणतात.  अळूवडीची पाने आता जरी सर्रास १२ महिने मिळत असली तरी पूर्वी जास्त करून पावसाळ्यात उपलब्धता असे. मस्त पावसाळ्यातील दिवस, हिरवाईच्या अनेक छटा ल्यालेली झाडे, धुंद वातावरण आणि खमंग शाकाहारी जेवणाचा बेत. गौरी-गणपतीत तर  घरी हमखास अळूवडीचा बेत असतो. यात एक नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे अळूची पाने (Taro Leaf). अळूच्या पानांपासून बनवलेल्या अळूवड्या ह्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. पण तुम्हाला माहिती आहे औषधी गुणधर्म असलेल्या या अळूच्या पानांपासून न केवळ अळूवडी बनवता येते तर आणखी खमंग, चटकदार चवदार अशा रेसिपीज बनविता येतात.
अळूची पाने खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात आणता येते. त्याचबरोबर पोटाचे विकार, सांधेदुखी यांसारखे आजारही बरे होण्यास मदत होते. त्यामुळे अळूची पाने खाताना जर तुमची नाकं मुरडत असतील तर तुम्ही ही आळूवडीची रेसिपीज ट्राय करुन त्यावर ताव मारू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

६० मिनिटे
  1. 12अळूची पाने (काळ्या देठाची आळूवडीची)
  2. २आणि १/२ वाटी चण्याचे पीठ
  3. 2 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  4. 1 टीस्पूनहळद
  5. 2 टेबलस्पूनधणे जिरे पावडर
  6. 1/2 कपचिंचेचा कोळ
  7. 1/2गुळ बारीक चिरून
  8. चवीनुसार मीठ
  9. 1 टेबलस्पूनतीळ
  10. 1 टीस्पूनहिंग पावडर
  11. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

६० मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम अळूची पाने स्वच्छ धुऊन कोरडी करा व त्यांच्या मागच्या रेषा सुरीने कापून घ्या व त्यावर लाटणं फिरवून घ्या म्हणजे त्याचा घट्ट रोल करतायेईल

  2. 2

    एका बाउल मध्ये चण्याचे पीठ,लाल मिरची पावडर,हळद, धणे-जीरे पावडर,तीळ,हिंग,मीठ व तेल सर्व साहित्य एकत्र करून घ्या.

  3. 3

    आता त्यात चिंचगुळाचे पाणी घालून घट्ट पीठ भिजवून घ्या

  4. 4

    आळूपाना चर्या मागच्या बाजूला चण्याचे पीठ पसरवून लावून घ्या.आता चर्या पानावर दुसरे पान ठेवून पुन्हा तीच कृती करा

  5. 5

    चार पानेपीठ लावून एका वर एक ठेवून आता दोन्ही बाजूने दुमडा व हळूहळू त्याचा घट्ट बांधून रोल तयार करून घ्या.

  6. 6

    तयार झालेले अळूची लोंढी आता तेलाचा हात लावून चाळणीवर ठेवा व कुकर च्या ३ शिकल्या करून शिजवून घ्या.

  7. 7

    पूर्ण कुकर थंड झाल्यावर त्यातून अळूची लोखंडी काढून पूर्ण गार झाल्यावर त्याच्या वड्या कापून घ्या.

  8. 8

    पॅन मध्ये थोडे तेल गरम करून त्यात तयार केलेल्या अळूच्या वड्या ऍड करून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
रोजी
Kalyan

Similar Recipes