झणझणीत मसाले वांगी (masala vanga recipe in marathi)

काल शेतातून वांगी आणलीत. छान छोटी छोटी कोवळी वांगी होती ती. ती पाहिल्यावर मसाल्याची वांगी बनवण्याचा मोह आवरला नाही. म्हणून आज मसाल्याची वांगी केली .त्याची कृती आज मी इथे देते आहे.
झणझणीत मसाले वांगी (masala vanga recipe in marathi)
काल शेतातून वांगी आणलीत. छान छोटी छोटी कोवळी वांगी होती ती. ती पाहिल्यावर मसाल्याची वांगी बनवण्याचा मोह आवरला नाही. म्हणून आज मसाल्याची वांगी केली .त्याची कृती आज मी इथे देते आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम वांगी स्वच्छ धुऊन घ्यावीत. त्यानंतर वांग्यांना उभ्या चिरा पाडाव्यात.
- 2
आता वरील सर्वमसाले,म्हणजे कांदा टोमॅटो पेस्ट, आले-लसूण पेस्ट, शेंगदाणे खोब-याचा एकत्रित कूट,धने पूड,गरम मसाला, हळद, तिखट,मीठ,सर्वएकत्रित करून घ्यावे. हा मसाला पूर्ण भाजी साठी तयार केलेला असून फोडणीसाठी सुद्धा याच मसाल्याचा वापर करावा.आता चिरलेल्या वांग्यांच्या मध्ये हा तयार केलेला मसाला भरून घ्यावा.
- 3
आता गॅस सुरू करून त्यावर कढई ठेवावी. त्यामध्ये तेल टाकावे. जीरे मोहरी टाकून ती तडतडल्यावर उरलेला तयार मसाला त्यात टाकावा. मसाला तेल सोडेपर्यंत परतून घ्यावे.
- 4
त्यानंतर, त्यात मसाला भरलेली वांगी टाकून परतावे. 2-3 मिनिट परतल्यावर त्यात आमचूर पावडर व गुळ टाकावा व परतावे. नंतर त्यात पाणी टाकावे.
- 5
आता कढईवर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे किंवा वांगे शिजेपर्यंत शिजवून घ्यावे. आता या शिजलेल्या भाजीत कोथिंबीर टाकावी व एकत्र करून घ्यावे.
- 6
अशाप्रकारे झणझणीत मसाल्याची वांगी तयार झालेली आहेत. आता ही भाजी जेवताना गरमागरम पोळी किंवा भाकरी सोबत कांदा, लिंबु, टोमॅटो सह जेवायला वाढावी.
Similar Recipes
-
मसाले वांगी (masala wanga recipe in marathi)
#कुकस्नॅस्पVarsha Ingole Bele यांच्या मसाले वांगी रेसिपीत थोडा बदल करून मी कुकस्नस्प करत आहे. धन्यवाद Varsha ताई तुमची रेसिपी खूप छान आहे Sneha Barapatre -
खानदेशी मसाले वांगी (khandeshi masala vangi recipe in marathi)
#Cooksnap # Mamata Bhandakkar # खानदेशी मसाला वांगी.. छान झाली आहे भाजी.. मुख्य म्हणजे मसाले नसल्यासारखे आहे भाजीत.. अगदी आले लसूण सुद्धा नाही.. धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
पुरणाची वांगी(भरली वांगी) (bharli vangi recipe in marathi)
पुरणाची वांगी किंवा ह्याला भरली वांगी ही म्हणतात.ही भाजी सर्वांनाच आवडते म्हणून वारंवार केली जाते.ह्या ॠतूत वांगीही छान मिळतात बाजारात.आज मैत्रीणी येणार आहेत म्हणून हा प्रपंच. बघा तर कशी करायची पुरणाची वांगी. Hema Wane -
डाळ वांगी
#Cf डाळ वांगी बरेचजण वेगवेगळ्या प्रकारे करतात मी ही रेसिपी माझ्या आई करायची त्यानुसार केली आहे. आई नेहमी ही भाजी करताना वांग्याची देठं काढत नाही कारण त्याची एक वेगळी चव येते आणि भाजी शिजली की ते चेक करायला देठाजवळ दाबून बघता येते. Rajashri Deodhar -
चमचमीत वांगी फ्राय (vangi fry recipe in marathi)
#cooksnapउज्वला ताई रांगणेकर,मीनल कुडू आणि छाया पारधी या मैत्रिणींची वांग्याच्या काचऱ्या ,वांग्याचे काप ह्या रेसिपीज पाहून त्यात मी थोडा बदल करून रेसिपी रीक्रीएट केली. चटपटीत आणि चमचमीत वांगी फ्राय मला खूप आवडली. माझ्याकडे छोटी वांगी होती, मी ती वापरली. आणि टँगी फ्लेवर साठी आमचूर पावडर वापरली. मी छोट्या वांग्याची भरली वांगी किंवा भात करते ,म्हणून हा वेगळा प्रयत्न...खूप टेस्टी.... Preeti V. Salvi -
भोगीची भाजी (boghichi bhaji recipe in marathi)
#मकर# cooksnap# वंदना शेलार ताई काल वंदना ताई नी भोगी स्पेसिएल हा लाईव्ह विडिओ दाखवला. त्या मध्ये भोगीची भाजी दाखवली होती. खूप छान पद्धतीने ती भाजी करून दाखवली. आज मी त्यांनी केलेली भोगीची भाजी केली आहे. मी त्यात थोडा बदल करून केली आहे.खूप छान भाजी झाली होती.खूप खूप धन्यवाद वंदना ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
झटपट भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W2या रेसिपीचे नाव झटपट भरली वांगी दिले आहे याचे कारण म्हणजे यात कोणतेही मी वाटण वगैरे नाही करत. भरली वांगी ही अनेक प्रकारे बनवतात. आणि छान वाटलेला मसाला भरून केलेली वांगी जरा जास्तच भाव खाऊन जातात नेहमी😃. पण मी जी आज रेसिपी देतेय ती भरली वांगी पण तितकीच भन्नाट लागतात चवीला. चला तर आता रेसिपी पाहू. Kamat Gokhale Foodz -
वांगी बटाटा रस्सा भाजी (vanga batata rassa bhaji recipe in marathi)
#cpm5#Week5#वांगी_बटाटा_रस्सा_भाजी.. अतिशय चमचमीत अशी वांगी बटाटा भाजीचे घराघरात स्थान अबाधित आहे..एवढेच नव्हे तर लग्नकार्यात,उत्सवांमध्ये,अन्नदानाच्या प्रसादामध्ये ही भाजी आवर्जून केली जाते.. करायला अतिशय सोपी, सुटसुटीत अशी ही भाजी आज आपण करु या.. Bhagyashree Lele -
मसाला वांगी (masala vangi recipe in marathi)
# आज मसाला वांगी खाण्याचा व बनविण्याचे ठरले.चला तर मग बनवू या मसाला वांगी Dilip Bele -
रस्स्याची भरली ढेमसे (rassa bharle dhemse recipe in marathi)
#GA4#week4 आज मी ढेमशाची भाजी केली आहे .....रस्स्याची भरली ढेमसे! , छान मसालेदार झालीये, बरं का! आणि दिसायलाही छान दिसतात, अशी ढेमसे.... Varsha Ingole Bele -
वांगी भात (Vangi Bhat Recipe In Marathi)
#RDR हिवाळ्या मंधे वांगी छान मिळतात पांढरे व जांभळे व आकारात छोटी अशी वांगी चवदार असतात. Shobha Deshmukh -
भरली वांगी (bharali wangi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 था....आवडते पर्यटक थीम आहे . बघायला गेले तर माझे गाव हे माझे आवडते पर्यटक बोलू शकता...तिकडे माझी आत्या राहते ..गावाला गेलो की ती भरली वांगी खूपच छान करते.. तर मी ती रेसिपी आज सगळया सोबत शेअर करते.. Kavita basutkar -
मसाला वांगी (masala wangi recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र. घरच्या झाडाची 6-7 वांगी तोडली. छोटी छोटी वांगी असली की मसाला वांगी बनवण्याची भुरळ पडते. वेगळा मसाला तयार करून वांगी बनवलेली आहेत. Pritibala Shyamkuwar Borkar -
स्पेशल मसाला भरली वांगी (Masala Bharli Vangi Recipe In Marathi)
भरली वांगी आपण वेगवेगळ्या प्रकारे करतो. पण आज मी दाखवणार आहे ती झटपट होणारी भरली वांगी. यासाठी लागणारा मसाला आपण अगोदर करून ठेवू शकतो. हा मसाला कोणतीही भरलेली भाजी करण्यासाठी वापरू शकतो जसे वांगी, कारली, तोंडली, भेंडी, सिमला मिरची.... Deepa Gad -
कच्च्या पपईची भाजी (kachha papaichi bhaji recipe in marathi)
शेतातून आणलेली कच्ची पपई मोठे असल्यामुळे आणि खाणारे कमी असल्यामुळे ती संपवण्यासाठी वेगवेगळे पदार्थ करण्यावाचून पर्याय नाही नव्हता. म्हणून मग मस्त रेसिपीज बनवल्यानंतर आज सर्वात शेवटी भाजी बनवली आहे. Varsha Ingole Bele -
सुका जवळा भरलेली वांगी
#स्टफडWeek 1आज रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. मांसाहार तर व्हायला पाहिजे ना. पण मच्छी मार्केट म्हणजे गर्दीचे ठिकाण आणि आता ह्या कोरोनाच्या काळामध्ये गर्दी मध्ये जाणं टाळायला हवं. म्हणून घरात जे आहे त्याचं काहीतरी बनवायचं ठरवलं. फ्रिजर मध्ये सुका जवळा होता आणि छोटी वांगी पण होती. म्हणून जवळा भरून वांगी करायचं ठरवलं. बनवायला वेळ लागतो पण खुप टेस्टी लागतात. स्मिता जाधव -
भरली वांगी (विदर्भातील) (bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W2वांग हा पदार्थ बर्यापैकी सर्वांनाच आवडतो आणि जर ते भरलेले वांगी असेल तर तो अगदी आवडीने खाल्ला जातो बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. विदर्भात भरली वांगी बनवण्याची एक वेगळीच पद्धत आहे चला तर आज आपण विदर्भातील भरलेली वांगी बनवूयात Supriya Devkar -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#md #माझ्या आई ला भरली वांगी खुप आवडायची म्हणून मदर्स डे अनुषंगाने आज मस्त भरली वांगी बनविण्याचा बेत रचला. Dilip Bele -
-
भरलेली वांगी (bharali wangi recipe in marathi)
#स्टफ्ड #week1वांग्याची भाजी खूप प्रकारे करता येते. वांग्याचे भरीत, वांग्याचे काप, वांग्याची रस्सा भाजी असे अनेक प्रकार करता येतात. भरलेली वांगी पण वेगवेगळे मसाले घालून करतात. आज मी गोडा मसाला घालून भरलेली वांगी बनवली. खूप छान लागते ही भाजी. स्मिता जाधव -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#रेसिपी क्र.1माझ्या मिस्टर चा आवडता मेनू भरली वांगी व भाकरी .मग सुरवात याच मेनुनी केली . Rohini Deshkar -
झणझणीत सुकं खार वांग (Sukka Khar Vang Recipe In Marathi)
कढई रेसिपी कूकस्नॅप यासाठी मी शीतल राऊत हीची रेसिपी करून बघितली.मी हिरवी वांगी घेतल्यामुळे खूपच छान झाली. Sujata Gengaje -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB2#WK2# विंटर स्पेशल रेसिपीचला बघूया सगळ्यांच्या आवडीची झणझणीत भरली वांगी ची रेसिपी .. Rashmi Joshi -
मसाला दही भेंडी (masala dahi bhendi recipe in marathi)
#cpm4 आज मी भरली भेंडी करताना दह्याचा वापर करून बनविली आहे भाजी. छान चव लागते भाजीची. Varsha Ingole Bele -
झणझणीत मटण.. (zhanzhanit mutton recipe in marathi)
#लंच#मटणआज काल नॉनव्हेज खाणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. नॉनव्हेज खाणार्यांची पहिली पसंत मटण ...मटण खूप वेगवेगळ्या प्रकारे बनविले जाते. प्रत्येकाची बनविण्याची पद्धत वेगळी असली तरी, मटणाला स्वतः ची विशिष्ट प्रकारची चव असल्याने, ते कसेही बनविले तर चांगलेच लागते. आता मटणाची चव मला माहित नाही. कारण मी नॉनव्हेज खात नाही. पण एकंदरीतच घरातील लोकांनी दिलेली प्रतिक्रिया...पण बाहेर मैत्रिणीसोबत केलेल्या चर्चेत मला ते जाणवले...💃 💕 Vasudha Gudhe -
झणझणीत भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#KS2चमचमीत आणि झणझणीत अशी भरली वांगी... 😄😄 Dhanashree Phatak -
झणझणीत वांग्याचे भरीत (vangyachi bharit recipe in marathi)
सकाळी भाजी करताना फ्रिज मध्ये तीन वांगी दिसली .मी कधी लहान वांग्याचे भरीत बनवले नाही पण हिरवी गार वांगी पाहून करायची इच्छा झालीआणि अगदी साध्या पद्धतीने बनवली . Adv Kirti Sonavane -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#AAवांग्याची लागवड वर्षभर केली जाते.वांग्याचे वेगवेगळे प्रकार,भाजीही वेगवेगळ्या प्रकारे केली जाते.आज मी भरली वांगी भरून ना करता वरून मसाला घालून केली आहेत. Pallavi Musale -
खान्देशी वांग्याची भाजी/एक टांगी मुर्गी (khandeshi vangyachi bhaji recipe in marathi)
#ks4 मी या भाजी बद्दल माहिती होती आणि मी खाल्ली देखील होती पण आज खान्देश रेसिपीमुळे करण्याचा योग आला. खरंतर मी वांग्याची भाजी लवकरात लवकर तयार होते म्हणून कुकरमध्ये करायची पण आज खरंच जरा जास्त वेळ देऊन ही भाजी केली अहाहा काय छान चवदार खमंग भाजी झाली... या भाजीत मी डायरेक्ट गॅसवर जाळी ठेवून कांदा टोमॅटो लसूण आलं मिरची खोबरे भाजून घातल्याने भाजी खमंग होते.शक्यतो या भाजीसाठी हिरवी वांगी वापरावीत. Rajashri Deodhar -
मसाला वांगी (masala vangi recipe in marathi)
वागी हा प्रकार शक्यतो सगळ्यांनाच आवडतं,तशी सगळ्याची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते मी पण कांदा न घालता माझ्या पद्धतीने मसाला वांगी बनवली आहे. Monali Sham wasu
More Recipes
टिप्पण्या (3)