सुका जवळा भरलेली वांगी

#स्टफड
Week 1
आज रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. मांसाहार तर व्हायला पाहिजे ना. पण मच्छी मार्केट म्हणजे गर्दीचे ठिकाण आणि आता ह्या कोरोनाच्या काळामध्ये गर्दी मध्ये जाणं टाळायला हवं. म्हणून घरात जे आहे त्याचं काहीतरी बनवायचं ठरवलं. फ्रिजर मध्ये सुका जवळा होता आणि छोटी वांगी पण होती. म्हणून जवळा भरून वांगी करायचं ठरवलं. बनवायला वेळ लागतो पण खुप टेस्टी लागतात.
सुका जवळा भरलेली वांगी
#स्टफड
Week 1
आज रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. मांसाहार तर व्हायला पाहिजे ना. पण मच्छी मार्केट म्हणजे गर्दीचे ठिकाण आणि आता ह्या कोरोनाच्या काळामध्ये गर्दी मध्ये जाणं टाळायला हवं. म्हणून घरात जे आहे त्याचं काहीतरी बनवायचं ठरवलं. फ्रिजर मध्ये सुका जवळा होता आणि छोटी वांगी पण होती. म्हणून जवळा भरून वांगी करायचं ठरवलं. बनवायला वेळ लागतो पण खुप टेस्टी लागतात.
कुकिंग सूचना
- 1
स्टफींग:::सर्वात प्रथम जवळा कोमट पाण्यात घालून ठेवा. थोड्या वेळाने जवळा गाळून घ्या. परत चांगल्या पाण्याने धुवून काढा आणि निथळत ठेवा. कढई मध्ये तेल गरम करा....त्यात ठेचलेला लसूण, मिरची आणि आलं टाका. चिरलेला थोडा कांदा टाका. कोथिंबीर टाका. कांदा चांगला फ्राय झाला कि मीठ टाका. हळद आणि एक चमचा आग्री मसाला घालून २/३ कोकम टाका..मग जवळा टाकून चांगले मिक्स करा. वाटल्यास थोडे पाणी आणि मीठ टाका..पाच मिनिटे परतून घ्या. कोथिंबीर टाकून गॅस बंद करा.
- 2
वाटण:::भाजलेलं सुकं खोबरं, थोडी लसूण,आलं आणि मिरच्या वाटून घ्या
- 3
जवळ्याचं मिश्रण चिरलेल्या वांग्यामध्ये भरून बाजूला ठेवून द्या. कढई मध्ये तेल गरम करा. कढीपत्ता टाका. चिरलेला कांदा टाका. हळद, १ चमचा आग्री मसाला टाका. कोथिंबीर आणि मीठ टाकून चांगले मिक्स करा. तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता.वाटलेले वाटण टाका. मिक्स करून झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवून घ्या. पाच मिनिटांनी जवळा भरलेली वांगी घालून झाकण ठेवून दहा मिनिटे शिजवा......भाकरी किंवा पोळीबरोबर सर्व्ह करा. मी त्याच्या बरोबर सोलकढी बनवली म्हणजे अपचनाचा त्रास होत नाही.
- 4
धन्यवाद
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सुका जवळा मसाला
#lockdownrecipe day19आज घरात शिल्लक असलेल्या थोड्या सुक्या जवळा पासून जवळा मसाला बनवला. Ujwala Rangnekar -
भरलेली वांगी (bharali wangi recipe in marathi)
#स्टफ्ड #week1वांग्याची भाजी खूप प्रकारे करता येते. वांग्याचे भरीत, वांग्याचे काप, वांग्याची रस्सा भाजी असे अनेक प्रकार करता येतात. भरलेली वांगी पण वेगवेगळे मसाले घालून करतात. आज मी गोडा मसाला घालून भरलेली वांगी बनवली. खूप छान लागते ही भाजी. स्मिता जाधव -
वांगी सुका जवला भाजी
#लॉकडाउनरेसिपीस#डे१९आज रविवार, खूप आठवण येतेय, मासे खायची इच्छा होतेय, लॉकडाउन मुळे मार्केट मध्ये मासे नाही मग काय.... सुक्या मच्छीचा आधार आणि काय... Deepa Gad -
जवळा चटणी (jawala chatni recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4आवडते ठिकाण कोकणकोकणात नाॅनव्हेज खाण्याची फार चंगळ असते, खूप चविष्ट पदार्थ असतात, कोकणातील घरगुती पद्धतीचा जवळा अप्रतिम लागतो. मी गेल्यावर आवर्जुन खाते. shamal walunj -
ओला जवळा मसाला (ola javla masala recipe in marathi)
आमच्या गावाकडे ओला जवळा मसाला खूप प्रिय आहे, आणि आम्हाला पण खूप आवडतो.#AV Sushila Sakpal -
झणझणीत वांग सुकां जवळा मसाला (Vang Sukka Jawala Recipe In Marathi)
#NVR कोकणात कधी मासांहार वाराच्या दिवशी पावसाळ्यात किंवा इतर दिवशी मासळी चांगली मिळाली नाही. तर साठवणीत ठेवलेला सुकां जवळा जेवणाची लज्जत वाढवतो.चला तर मग झटपट असा झणझणीत वांग सुकां जवळा मसाला बघू. Saumya Lakhan -
सुका जवळा स्टफ्फ वांगी (sukha jawala stuffed vangi recipe in marathi)
#स्टफड साप्ताहिक रेसिपी थीम स्टफ व्हेजिटेबल रेसिपीज थीम सायली सावंत -
सुकट भरलेली वांगी (sukat bharleli Vangi Recipe in marathi)
#cpm3#week3वांग्याला भाज्यांचा राजा म्हटले जातं...आणि या राजाची शान वाढवली जाते ते निरनिराळे प्रकार करून .या वांग्याला निखाऱ्यात भाजलं की बनतं भरीत ,डाळीमधे शिजवलं की बनतं चविष्ट डाळ वांगं....आणि यात मसाला भरला की बनतात भरली वांगी...😋😋पण ,या व्यतिरिक्तही वांग्याचा एक असा प्रकार आहे .जो सगळीकडे आवडीने खाल्ला जातो.शाकाहार आणि मांसाहार ह्यांचा सुवर्ण सगंमम्हणजेच,सुकट भरलेलं वांगं..😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
चमचमीत वांगी फ्राय (vangi fry recipe in marathi)
#cooksnapउज्वला ताई रांगणेकर,मीनल कुडू आणि छाया पारधी या मैत्रिणींची वांग्याच्या काचऱ्या ,वांग्याचे काप ह्या रेसिपीज पाहून त्यात मी थोडा बदल करून रेसिपी रीक्रीएट केली. चटपटीत आणि चमचमीत वांगी फ्राय मला खूप आवडली. माझ्याकडे छोटी वांगी होती, मी ती वापरली. आणि टँगी फ्लेवर साठी आमचूर पावडर वापरली. मी छोट्या वांग्याची भरली वांगी किंवा भात करते ,म्हणून हा वेगळा प्रयत्न...खूप टेस्टी.... Preeti V. Salvi -
कैरी सुका जवळा (kairi suka jawala recipe in marathi)
मैत्रिणींनो आज-काल मच्छी इतकी महाग झाली कीसर्वसामान्यांना दुरून डोंगर साजरे. तरी घरी ठेवणीतली सुकी मच्छी असते म्हणून आज त्याचाच बेत केला आहे. या रेसिपीमधे मी तुम्हाला दोन रेसिपी दाखवणार आहे. Jyoti Gawankar -
भरली वांगी सोडे घालून (bharli wangi bhaji recipe in marathi)
खास मच्छी प्रेमी साठी ह्या लॉकडाऊन च्या काळात मच्छी बाजारात उपलब्ध नसल्यामुळे बराच हिरमोड होतो पण निदान सूकी मच्छी आणी त्यातही सोडे म्हणजे *सीकेपी* लोकांचे आवडते चला तर मग *सीकेपी स्पेशल भरली वांगी सोडे घालून* Nilan Raje -
झणझणीत मसाले वांगी (masala vanga recipe in marathi)
काल शेतातून वांगी आणलीत. छान छोटी छोटी कोवळी वांगी होती ती. ती पाहिल्यावर मसाल्याची वांगी बनवण्याचा मोह आवरला नाही. म्हणून आज मसाल्याची वांगी केली .त्याची कृती आज मी इथे देते आहे. Varsha Ingole Bele -
जवळा मसाला
#लॉक डाऊन नॉनवेज मधील सुकवलेले फिश मधाल ऐक प्रकार म्हणजे जवळा बऱ्याच . जणांच्या घरात जवळा असतोच करायला सोपा व चविष्ट प्रकार Chhaya Paradhi -
चमचमीत भरलेली वांगी
पिढ्यानं पिढ्या चालत आलेली नाव एकूणच तोंडाला पाणी सुटणारी अशी ही भरलेली वांगी Jyoti Kinkar -
मसाला वांगी (masala wangi recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र. घरच्या झाडाची 6-7 वांगी तोडली. छोटी छोटी वांगी असली की मसाला वांगी बनवण्याची भुरळ पडते. वेगळा मसाला तयार करून वांगी बनवलेली आहेत. Pritibala Shyamkuwar Borkar -
-
वांग्याचे भरीत (विदर्भीय पद्धत) (Vangyache Bharit Recipe In Marathi)
#GR2थंडीच्या दिवसात बाजारात विविध प्रकारची वांगी दिसतात एकदम छोटी, लांबट ,जांभळी, पांढरी, हिरवी अशी अनेक प्रकारची, अनेक आकाराची वांगी बाजारात दिसतात आणि त्याचे तेवढेच प्रकार आपल्याला करता येतात. वांग्याचा सगळ्यात आवडणारा पदार्थ म्हणजे वांग्याचे भरीत. आज आपण दही न घालता वांग्याचे भरीत ( ही पद्धत विदर्भीय आहे) करून बघणार आहोत. Anushri Pai -
जवळा भजी (javla bhaji recipe in marathi)
#fdr फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने मी ही जवळा भजी ची रेसिपी माझी सख्खी शेजारीण जी वेळोवेळी माझ्या व सर्वांच्या मदतीला धावून येते तिला डेडीकेट करीत आहे Aparna Nilesh -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB2#WK2# विंटर स्पेशल रेसिपीचला बघूया सगळ्यांच्या आवडीची झणझणीत भरली वांगी ची रेसिपी .. Rashmi Joshi -
भरल्या वांग्याची भाजी
आज मला जवळच्या शेतातली एकदम ताजी माझ्या समोरच तोडलेली वांगी मिळाली.किती मस्त वाटले म्हणून सांगू!!🤗 छान जांभळी जांभळी,छोटी छोटी अगदी नाजूक कोवळी...अहाहा!!थंडी आणि वांग्याची भाजी,वांग्याचे भरित,बाजरीची भाकरी,त्यावर लोण्याचा गोळा,मुगाची खिचडी....स्वर्गसुख ते हेच😊खरंतर आयुर्वेदात वांगी ही वातूळ फळभाजी म्हणून जरा नाकारलीच जाते,वातविकार असणाऱ्यांना अपथ्यच.पण जीभेपुढे कोणाचे चाललंय का?....वांग्यात फायबर आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात.कँन्सरवर मात करण्याचीही क्षमता वांग्यात असते. तिखट मसालेदार भरल्या वांग्याच्या भाजीवर ताव मारणे हे लहानपणापासूनच आवडीचे.😊😋आता इकडे घरातही सगळ्यांना प्रियच!! सातारा कराडकडे कृष्णेकाठच्या शेतामधल्या वांग्यांना तर भलतीच सुंदर चव असते.शिजल्यावर सालही गराबरोबर मिळून जाते.हल्ली लग्नांमध्येही भरली वांगी भाजी बुफे काउंटरवर दिसायला लागलीये.पण पोळी पुरी बरोबर खायला जरा नकोच वाटते!चुलीवर केलेली वांग्याची भाजी आणि भाकरी हा फक्कड बेत जमवायचा तर कुठे खेड्यातच जायला हवं....पण कशाचाही अतिरेक वाईटच!म्हणूनच आपल्याकडे चातुर्मासात चार महिने शरिरावर वातवृत्तीचा प्रकोप होऊ नये याकरता आषाढ ते मार्गशीर्षापर्यंत वांगं खाणं निषिद्ध मानले जाते...नंतर ते खायचे ते थेट खंडोबाचं नवरात्र झाल्यावर,चंपाषष्ठीला.खंडोबालाही या वांग्याचे भरीत रोडग्याचा नैवेद्य प्रिय!...आता बाराही महिने ही वांगी मिळतात,खाल्लीही जातात...आपल्या जीभेचे चोचले पुरवायला!! चला तर...आता पुराणातली वांगी पुराणात ठेवून आजच्या रेसिपीला सुरुवात करु.🙂😋 Sushama Y. Kulkarni -
वांगी भात (Vangi Bhat Recipe In Marathi)
#RDR हिवाळ्या मंधे वांगी छान मिळतात पांढरे व जांभळे व आकारात छोटी अशी वांगी चवदार असतात. Shobha Deshmukh -
भरली वांगी (नाशिक कडची पद्धत) (Bharli vangi recipe in marathi)
गोदावरी काठची काटेरी वांगी भरून केले की अतिशय चविष्ट आणि सुंदर लागतात Charusheela Prabhu -
करंदी सुकट आणि बटाटा (sukat batata bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2गावाकडची आठवण म्हणजे सुकी मच्छी सुकी मच्छी असली अगदी पोटामध्ये दोन घास जास्त जातात. सुकी मच्छी आणि गरम गरम भाकरी काय कॉम्बिनेशन आहे. Purva Prasad Thosar -
झणझणीत भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi)
#PRRवांग हे सहजासहजी खाण्यात मुलांना मोठ्यांना कंटाळा येतो. पण ते जर जरा चमचमीत, झणझणीत असेल तर मग काय भाकरी भातावर ही ताव मारतात. म्हणूनच जो का गावांपासून शहरांपर्यंत आपला पारंपरिक असलेला पदार्थ झणझणीत बनवण्याचा माझा प्रयत्न.. Saumya Lakhan -
वांगी मसाला (wangi masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4#माझे आवडते पर्यटन स्थळकोल्हापूरला आम्ही एकदा गेलो तिथे महालक्ष्मी मंदिर, शाहू महाराजांचे म्युझियम, रंकाळा तलाव वगैरे बघण्यासारखे खूप काही आहे. मुख्य म्हणजे खादाडी, अस्सल खवय्ये असाल तर एकदा तरी कोल्हापूरला भेट द्यावीच, तिकडचे मुख्य म्हणजे जेवणात जो कोल्हापुरी कांदा लसूण मसाला वापरतात त्याचा झणझणीत स्वाद, तेलाचा तवंग अप्रतिम, बघुनच तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही तसेच तिकडची स्पेशल डिश म्हणजे पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, झणझणीत मिसळ असे बरेच पदार्थ चाखायला मिळतील. तर आज मी अशीच वांगी मसाला रेसिपी बनविली आहे, बघा बरं कशी झालीय ते...... Deepa Gad -
भरली वांगी(पुणेरी) (bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W2हिवाळा आणि वांगी यांचं अतूट नातं आहे.तसं पाहिलं तर हल्ली वर्षभर वांगी मिळतात.पण थंडीत वांग्याची भाजी म्हणजे मेजवानीच असते!वांगी प्रकृतीने उष्ण ,त्यामुळे थंडीत उर्जा वाढवण्यासाठी वांगी भाजी,भरीत या स्वरूपात सेवन केली जातात.गरम बाजरीची भाकरी आणि भरल्या वांग्याची भाजी म्हणजे स्वर्गसुखच!...मग बाकी काही नसले तरी चालते.खरंतर चुलीवरचा या भाजी भाकरीचा स्वयंपाक अगदी खुमासदार असतो,पण आपल्या शहरात हे सुख कुठले?...मग विविध हॉटेल्स, रिसॉर्ट, पिकनिक स्पॉट्स इथे आवर्जून मिळतं हे खास गावरान चवीचं भोजन.कृष्णाकाठची वांगी अगदी जांभळी,काटेरी,पातळ सालीची.जळगावकडची खास भरितासाठी.प्रत्येक प्रांताची चव निराळी!काळी,लांब बंगाली वांगी मिळमिळीत चवीची...ती आपल्याकडे फारशी नाही खाल्ली जात.सांबारातही दक्षिणेकडे वांग्याचा वापर केला जातो.वांग्याचे काप म्हणजे खमंग साईड डीश...तर डाळवांगे म्हणजे मस्त आंबटगोड आमटी आणि त्याबरोबर आंबेमोहोर तांदळाचा भात....याची चव न्यारीच.वांगीबटाटा रस्सा अगदी वेळ भागवणारी भाजी,तर संक्रांतीच्या लेकुरवाळ्या भाजीत वांगी अग्रस्थानी. भरिताचेही अनेक प्रकार!वांगी व बटाटा उकडून त्याचं भरित करणं म्हणजे माझ्या आजीचा अगदी आवडता प्रकार!चातुर्मासात वातकारक म्हणून वर्ज्य असलेली वांगी चंपाषष्ठीला भरित रोडग्याचा नैवेद्य खंडोबाला दाखवून मग खायला सुरुवात होत असे.म्हणजे ही वांगी आषाढ ते कार्तिक पावसाळा वातदोष वाढवणारी म्हणून निषिद्ध तर मार्गशीर्षापासून थंडी पडायला लागत असल्याने पुन्हा आहारात समावेश!आपल्या पूर्वजांना आहाराचे किती ज्ञान होते ते यावरुन कळते.चला तर भाजीच्या तयारीकडे वळू!ही भाजी पुणेरी यासाठी की यात मी फक्त गोडा मसाला वापरला आहे,तरीही सुंदर चव आली आहे.😋😋🍆🍆 Sushama Y. Kulkarni -
स्पेशल मसाला भरली वांगी (Masala Bharli Vangi Recipe In Marathi)
भरली वांगी आपण वेगवेगळ्या प्रकारे करतो. पण आज मी दाखवणार आहे ती झटपट होणारी भरली वांगी. यासाठी लागणारा मसाला आपण अगोदर करून ठेवू शकतो. हा मसाला कोणतीही भरलेली भाजी करण्यासाठी वापरू शकतो जसे वांगी, कारली, तोंडली, भेंडी, सिमला मिरची.... Deepa Gad -
जवळा कोशिंबीर (javda koshimbir recipe in marathi)
#GRआम्ही कोळी असल्यामुळें ओल्या माश्या पासून सर्वच सुखे मासे आम्ही बनवतो. सुखे मासे बहुतेक आम्ही पावसाळ्यात च बनवतो. जवळा ची कोशिंबीर आमच्या घरी सकाळ चा नाश्ता बाहेर पाऊस आणि गरम गरम तांदळाची भाकरी या सोबत खूपच छान लागते. तुम्ही पण बनवून बघा. नक्की आवडणार तुम्हाला आरती तरे -
-
पुरणाची वांगी(भरली वांगी) (bharli vangi recipe in marathi)
पुरणाची वांगी किंवा ह्याला भरली वांगी ही म्हणतात.ही भाजी सर्वांनाच आवडते म्हणून वारंवार केली जाते.ह्या ॠतूत वांगीही छान मिळतात बाजारात.आज मैत्रीणी येणार आहेत म्हणून हा प्रपंच. बघा तर कशी करायची पुरणाची वांगी. Hema Wane
More Recipes
टिप्पण्या