कच्च्या केळाची भजी (kacchi kelichi bhaji recipe in marathi)

rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680

#GA4 #week 2
मधील थीम नुसार केळी हा घटक असलेला पदार्थाची रेसिपी म्हणून कच्च्या केळाची भजी बनवत आहे. दक्षिण भारतामध्ये कच्च्या केळ्याची भजी हा खूप प्रसिद्ध पदार्थ आहे. केळाच्या पानावर सर्व्ह केल्या जाते.
आज मुसळधार पाऊस आल्यामुळे गरमा गरम खायची इच्छा झाली. इविनिंग स्नॅक्स म्हणून कच्च्या केळाची भजी बनवत आहे.गरम गरम भजी वाफाळलेल्या चहा बरोबर खाण्याची मजा काही औरच असते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 3मध्यम आकाराची कच्ची केळी
  2. 1 वाटीबेसन
  3. 1 टेबलस्पूनतिखट
  4. 1 टेबलस्पूनधने पावडर
  5. 1 टेबलस्पूनतीळ,ओवा
  6. चवीपुरतं मीठ
  7. 1 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर
  8. तळण्यासाठी तेल
  9. 1/4 टेबलस्पूनहळद
  10. चिमुटभर मिरे पूड

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम कच्च्या केळ्याची साले काढून घेतली काढून घेतली. मग कच्च्या केळ्याचे बारीक बारीक गोलाकार काप करावे.कच्च्या केळ्याचे बारीक काप पाण्यात टाकावे.

  2. 2

    आता बेसाना मध्ये एक टेबलस्पून तेलाचे मोहन घेवून त्यामध्ये दोन बारीक चिरलेल्या मिरच्या,अर्धी वाटी कोथंबीर,एक टेबलस्पून तीळ,ओवा,चवीपुरतं मीठ 1/4 टेबलस्पून हळद टाकावी.

  3. 3

    कच्च्या केळ्याचे गोलाकार केलेले काप बेसानामध्ये टाकावे आणि मंद आचेवर तळावे. कच्च्या केळ्याचे भजी तयार झालेली आहे त्यावर थोडी मिरे पूड टाकावी.कच्च्या केळ्याचे भजी सॉस बरोबर सर्व्ह करता येईल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680
रोजी

Similar Recipes