कच्च्या केळ्याची भाजी

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#edwan#TMB एडवणहून आणलेल्या कच्च्या केळ्या ची मसाला बाजारचा गरम मसाला वापरून मस्त भाजी केली आणि मुलीला डब्यात दिली.

कच्च्या केळ्याची भाजी

#edwan#TMB एडवणहून आणलेल्या कच्च्या केळ्या ची मसाला बाजारचा गरम मसाला वापरून मस्त भाजी केली आणि मुलीला डब्यात दिली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. कच्ची केळी
  2. कांदे
  3. २ टेबलस्पून सुक खोबर
  4. ७-८ लसूण पाकळ्या
  5. १/२ इंच आलं
  6. १/४ टीस्पून धना पावडर
  7. १/४ टीस्पून जिरा पावडर
  8. १/४ टीस्पून हळद
  9. १/२ टेबलस्पून तिखट
  10. १/२ टेबलस्पून मसाला बाजारचा गरम मसाला
  11. २ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर
  12. १ टीस्पून मीठ
  13. १/२ पेला पाणी
  14. १ टीस्पून तेल फोडणीला आणि बाकी तळण्यासाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    एडवणची कच्ची केळी घेतली.सोलून तुकडे करून पाण्यात ठेवली. भाजीसाठीचे सर्व साहित्य घेतले. कांदा, कोथिंबीर चिरून घेतली.

  2. 2

    आलं, लसणाची पेस्ट केली.केल्याचे काप तळून घेतले.

  3. 3

    कढईत तेल घालून ते गरम झाल्यावर हिंग कांदा परतून घेतला, मग खोबरं घालुन परतले,हळद,तिखट, धणे पावडर, जीरा पावडर,मसाला बाजारचा गरम मसाला, आलं लसूण पेस्ट,कोथिंबीर घालून छान परतले,

  4. 4

    मसाला छान परतल्यावर त्यात तळलेली केळी घालून,मीठ घालून नीट मिक्स केले मग पाणी घालून छान वाफ आणली.

  5. 5

    तयार भाजी बाउलमध्ये काढून कोथिंबीर घालून सजवली.थोडी गार झाल्यावर डब्यात पोळी आणि भाजी भरून दिली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes