मेथी-सुका बोंबील भाजी (methi sukha bombil recipe in marathi)

Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
virar

#GA4
#week2 #Fenugreek मेथी

जगण्यापुरता खाणाऱ्यांनी भले आपल्याला जगाबद्दल कितीही ज्ञान दिले असेल, पण खाण्यासाठी जगणाऱ्यांनी हे जग खऱ्या अर्थाने सुंदर बनवले आहे! जगण्यापुरता खाऊन ज्ञानार्जन करणाऱ्या योगी, तपस्वी, विचारवंत, ज्ञानी माणसांनी आग, वाफ, पेट्रोलियम गॅस, सौर उर्जा, शेती यात जे संशोधन केले ते खवय्यांनी आपल्या खवय्येगिरीने सार्थकी लावले आहे. एक पुस्तक वाचण्यामुळे जितके ज्ञान मिळते त्यापेक्षा अधिक ज्ञान एक किलोमीटर चालण्याने मिळते अशी एक प्राचीन म्हण आहे. त्या एका किलोमीटरमधे जास्तीत जास्त ज्ञान मिळवायचे असल्यास बाजारातून अथवा खाऊगल्लीतून चालायला हवे हे खवय्यांनी सिद्ध केले आहे.

अस्सल खवय्ये अन्नाच्या बाबतीत व्हेज नॉनव्हेज असे भेदाभेद मानत नाहीत. दोघांवर त्यांचा एकसारखाच जीव असतो. या प्रेमातून आजवर काही अफलातून कॉम्बिनेशनस् जन्माला आली आहेत. जसे की मेथी आणि सुके बोंबील. बोंबील हा आमच्या परिसरातील सेलिब्रिटी मासा, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळेच त्याचे फॅन. पावसाचे अडीच तीन महिने वगळता वर्षभर ते मिळतात. त्या अडीच तीन महिन्यांचा विरह त्याच्या फॅनस् ना सहन होत नाही. म्हणून खवय्यांना बोंबील सुकवून ठेवण्याचा शोध लावला. 'Make hay while Sunshine' यापेक्षा 'Dry bombil before rain comes' हे जास्त लागू होते. या सुक्या बोंबलासोबत ओल्या हिरव्यागार मेथीच्या भाजीचे कॉम्बिनेशन हा आम्हा वाडवळांचा एक अफलातून शोध आहे. पौष्टिक आणि औषधी गुणांनी युक्त मेथी या बोंबलाची लज्जत कैक पटींनी वाढवते. लवकरच हि भाजी मोठ्या रेस्टॉरंटच्या मेन्यू मधे दिसल्यास आश्चर्य वाटू नये.. :)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
४ जणांसाठी
  1. 1मेथीची जुडी
  2. ८-१० सुके बोंबील
  3. 1मध्यम आकाराचा बटाटा काचर्या करून
  4. 1कांदा (चिरलेला)
  5. 1 आणि 1/2 टेबलस्पून आले, लसूण, मिरची,कोथिंबीर यांचे हिरवे वाटण
  6. 2 टीस्पूनवाडवळी मसाला
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम बोंबील स्वच्छ धुऊन थोडा वेळ गरम पाण्यात भिजवून ठेवावे. त्यामुळे त्याचा उग्र वास थोडा कमी होतो व थोडे मऊ सुद्धा होतात.

  2. 2

    आता एका कढईत तेल गरम करून त्यात हिरवे वाटण, चिरलेला कांदा, हळद व वाडवळी मसाला घालून नीट एकजीव करून घ्यावे. नंतर त्यात बटाट्याच्या काचर्या व बोंबील टाकावेत. नीट एकजीव करावे. एक वाफ काढून घ्यावी.

  3. 3

    बटाटा शिजल्यानंतर त्यात बारीक चिरलेली मेथी घालावी व एकत्रित करून घ्यावे. एक वाफ काढावी. मेथी - सुका बोंबील भाजी तय्यार!!! भात, शिसोणी (चिंचकढी) सोबत मस्त लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
रोजी
virar

Similar Recipes