गावरान वाटाण्याचा झणझणीत रस्सा (watanyacha rassa recipe in marathi)

Seema Mate
Seema Mate @cook_22805348

गावरान वाटाण्याचा झणझणीत रस्सा (watanyacha rassa recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2-3 सर्विंग
  1. 350 ग्रॅमगावरान वटाणे
  2. 1 चमचामीठ
  3. 1मोठी विलायची
  4. 1 छोटादालचिनीचा तुकडा
  5. 1 मोठा कांद्याचे काप
  6. 5-6 खोबऱ्याचे काप
  7. फोडणी करीता साहित्य
  8. 1मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला
  9. 1मोठा टोमॅटो बारीक चिरलेला
  10. 1 चमचामीठ
  11. 2 चमचेलाल तिखट
  12. 1 चमचागरम मसाला
  13. 1 चमचाधने पावडर
  14. 1 चमचाजिरे पावडर
  15. 1/4 वाटीकोथिंबीर
  16. 2 चमचेआले-लसूण पेस्ट
  17. 3-4 कढीपत्त्याच्या काड्या
  18. 1/2 चमचाहळद

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम वाटाणे स्वच्छ करून पाच ते सहा तास भिजत ठेवा. आता एका कूकरच्या डब्यात वाटाणे, दालचिनी, एक चमचा मीठ,अर्धा चमचा हळद तसेच मोठी विलायची घालून कुकरच्या तीन ते चार शिट्या काढून घ्या.

  2. 2

    आता कांद्याचे तुकडे तसेच खोबऱ्याचे तुकडे भरताचे वांगे भाजतो त्याप्रमाणे भाजून त्याची पेस्ट करा.आता एका कढाईत पाच ते सात चमचे तेल घाला. तेल गरम झाले की प्रथम कांदा आणि कढीपत्त्याची जुडी घाला. (गॅस मंद ठेवूनच फोडणी तयार करून घ्यायची आहे.)

  3. 3

    कांदा थोडा नरम झाला की त्यात आले-लसूण पेस्ट, कांदा खोबऱ्याची पेस्ट घाला व छान तेल सुटेस्तोवर शिजवून घ्या. थोडी कोथिंबीर पण घाला.

  4. 4

    आता त्यात सगळे सुके मसाले क्रमाक्रमाने घाला.तसेच त्यात टोमॅटो पण घालून दोन ते तीन मिनिटे शिजवून घ्या. आता त्यात उकडलेले वाटाणे घाला. वाटण्यात पाणी असेल त्यामुळे, वेगळे पाणी घालायची गरज नाही पण, (गरजच वाटली तर एक कप गरम पाणी घालून चार ते पाच मिनिटे वटाण्याची भाजी छान मंद आचेवर शिजू द्या.)

  5. 5

    आता भाजी कोथिंबीरीने गार्निश करा. गरम-गरम वाटाण्याची भाजी फुलके अथवा भाताबरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Seema Mate
Seema Mate @cook_22805348
रोजी

Similar Recipes