केसरिया पेढा (kesariya peda recipe in marathi)

Trupti Temkar-Bornare
Trupti Temkar-Bornare @cook_26301660

केसरिया पेढा इंदौरचा फेमस आहे.खूप दिवस झाले केसरीया पेढा खाल्ला नव्हता.आज खूपच इच्छा झाली पण काय बाहेरचे पदार्थ खाणे covid मुळे बंद . विचार केला आणि घरीच बनविला . मनात खुप भिती होती कारण कुठेही न वाचता किंवा बघता स्वत:च काहीतरी नवीन करत होती.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५-ते ३०मि
२०पेढे
  1. १ वाटी मिल्क पावडर
  2. १/४ वाटी दुध
  3. १/४ वाटी साखर
  4. १०-१२ केसरच्या काड्या
  5. १ टीस्पून साजूक तूप
  6. १ टीस्पून पिस्ता काप

कुकिंग सूचना

२५-ते ३०मि
  1. 1

    वर दिल्याप्रमाणे सर्व साहित्य घेणे.

  2. 2

    एका नाॅनस्टीक पॅनमध्ये दूध तूप केसरआणि साखर एकत्र मिक्स करावे.

  3. 3

    साखर विरघळली की मिल्क पावडर एकत्र करावे

  4. 4

    नंतर पॅन मंद आचेवर गॅसवर ठेवून सतत ढवळत राहावे

  5. 5

    हे मिश्रण घट्ट होईपर्यंत परतून घ्यावे नंतर गॅस बंद करावा. थोडेसे थंड झाल्यावर मिश्रण हाताला तूप लावून सॉफ्ट करावे.

  6. 6

    आता मिश्रणाचे छोटे गोळे करावे आणि पिस्ता काप घालून सजवावे.

  7. 7

    केसरिया पेढा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Trupti Temkar-Bornare
Trupti Temkar-Bornare @cook_26301660
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes