दूध पेढा /मलई पेढा (dudh peda recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#gpr गुरूपौर्णिमा विशेष रेसिपीज
#दूध पेढा
झटपट होणारी रेसिपी. चवीला एक नंबर झाला होता पेढा.

दूध पेढा /मलई पेढा (dudh peda recipe in marathi)

#gpr गुरूपौर्णिमा विशेष रेसिपीज
#दूध पेढा
झटपट होणारी रेसिपी. चवीला एक नंबर झाला होता पेढा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10-15 मिनिटे
12-13 पेढे
  1. 1/4 कपदूध
  2. 1/4 कपसाखर
  3. 1 कपमिल्क पावडर
  4. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  5. 1/4 कपदूध
  6. 3-4पिस्त्याचे काप

कुकिंग सूचना

10-15 मिनिटे
  1. 1

    एका पॅनमध्ये दूध,साखर, तूप,मिल्क पावडर घालून चांगले मिक्स करून घेणे.

  2. 2

    पुन्हा 1/4 कप दूध थोडे-थोडे घालून मिक्स करून घेणे.गॅसवर पॅन गरम करत ठेवावा. गॅस मंद आचेवर ठेवून चमच्याने हलवत राहावे; म्हणजे खाली लागणार नाही.

  3. 3

    मिश्रणाचा गोळा झाला की, गॅस बंद करावा. मिश्रण एका ताटलीत काढून थोडे थंड होऊ द्यावे.हाताला तूप लावून घेणे. मिश्रण कोमट असतानाच चांगले मळून घेणे.गोळा तयार झाला पाहिजे.

  4. 4

    पोळपाटावर गोळा ठेवून लाटण्याने जाड पोळी लाटून घेणे.गोल कटरने गोल कापून घेणे. कटर नसेल तर,लहान वाटी,छोट्या डबीचे झाकण वापरावे.

  5. 5

    तयार गोलांवर 2-3 पिस्त्याचे काप कापून लावून घेणे.

  6. 6

    गुरूपौर्णिमेच्या नैवेद्यासाठी दूध पेढे / मलई पेढे तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes