उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)

Sneha Barapatre
Sneha Barapatre @cook_25713033

#पश्चिम
#महाराष्ट्र
बाप्पाचा आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक. मोदक हा गोड पदार्थ अतिशय लोकप्रिय आहे. गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी विशेषतः उकडीचे मोदक (Ukadiche Modak) केले जातात. गणेशोत्सवादरम्यान घराघरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तयार केले जातील. आता मिठाईच्या दुकानांमध्येही कित्येक प्रकारचे मोदक उपलब्ध असतात.

पण या मोदकांऐवजी घरामध्ये केलेले उकडीच्याच मोदकांचे सेवन करावे. उकडीचे मोदक चवीला स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर देखील असतात. उकडीचे मोदक तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी सामग्री आपल्या शरीरासाठी पोषक आणि फायदेशीर असते. तांदळाचे पीठ आपल्या आरोग्यासह त्वचेसाठीही लाभदायक आहे. तांदळामध्ये फायबरचे प्रमाण जास्त आहे.महत्त्वाचे म्हणजे तांदळामध्ये ग्लुटेन नावाचे प्रोटीन नसते त्यामुळे तांदळाच पीठ पचायला हलके. गुळाच्या सेवनामुळे शरीराला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन आणि खनिजांचा पुरवठा होतो. स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी वेलचीचा वापर केला जातो. वेलचीमध्ये लोह, पोटॅशिअम, कॅल्शिअम, सल्फर आणि मॅग्नेशिअमयासारख्या खनिजांचा साठा आहे. मोदकामधील सर्वात महत्त्वाची सामग्री म्हणजे खोबरे. ओल्या नारळाच्या खोबऱ्यापासून मोदकाचे सारण तयार केलं जाते. ओल्या नारळाच्या खोबऱ्यामुळे जेवण पचण्यास मदत मिळते. यामध्ये अँटी व्हायरल, अँटी फंगल, अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी पॅरासायटिक गुणधर्म आहेत. तुपाचे आरोग्यवर्धक तसंच सौंदर्यवर्धक देखील लाभ आहेत. मग हे सर्व गुणधर्म असलेले हे मोदक मी तुमच्यासाठी आज बनले आहेत

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

५० मिनिटे
  1. ५०० ग्रॅम तांदळाच पीठ
  2. 1मोठा नारळ
  3. २०० ग्रॅम गुळ
  4. 3 ग्लासपाणी
  5. 3वेलची
  6. 2 टेबलस्पून चारोळी
  7. 2 टेबलस्पून काजू
  8. 4 टेबलस्पून तुप
  9. 1 टेबलस्पूनमीठ

कुकिंग सूचना

५० मिनिटे
  1. 1

    एका पातेल्यात पाणी घेऊन उकडून घ्यावे व त्यात मीठ एक चमचा तूप घालून घ्यावे पाणी उकडले कि त्यात पुरेल तेवढे तांदळाचे पीठ घालून नीट उकड काढून घ्या

  2. 2

    उकड काढून झाले कि ती थोडी गार झाल्यावर पीठ मळून घ्यावे.

  3. 3

    सारणासाठी सर्वात आधी नारळ खवलुन घ्यावे एका पातेल्यात नारळ, गुळ,वेलचीपूड घालून गुळ व नारळ मिक्स होईपर्यंत परतुन घ्या वरून चारोळी काजू घालून सारन तयार करून घ्या

  4. 4

    तांदळाच्या पीठाचे छोटे गोळे करून पाण्याचा हाताने पातळ पारी करून त्याला जमेल तेवढया पाकळ्या करून मध्ये भागी सारन भरून मोदक तयार करून घ्यावे.

  5. 5

    तयार झालेले मोदक आता स्टिमर मध्ये १५ मिनिटे स्टिम करून घ्यातयार मोदक तुप घालून सव्हऀ करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Sneha Barapatre
Sneha Barapatre @cook_25713033
रोजी

Similar Recipes