गाजर व्हीट केक (gajar wheat cake recipe in marathi)

Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
नवी मुंबई

#GA4 #week4

#Baked
आज आपण अगदी सोप्या पद्धतीने गव्हाचा गाजर केक बघूया.ही रेसिपी झटपट तयार होणारी अणि सर्वाना आवडणारी रेसिपी आहे. अगदी सोप्या पद्धती ने तयार होणारा हेल्दी आणि न्यूट्रिशियस केक आहे . तुम्ही याला सकाळी ब्रेकफास्ट मध्ये, टिफिन बॉक्सला, मुलांच्या शाळेत डब्बा मध्ये, संध्याकाळी चहा चा बरोबर आणि राती जेवण मध्ये पण खाऊ शकतात . एकदम खूपच सॉफ्ट आणि स्पोंजी गाजर व्हीट केक....तुम्ही याला नक्की घरी करून पहा आणि तुमचे प्रतिक्रिया मला जरूर कळवा।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनट्स
4 जणांसाठी
  1. 1 कप गव्हाचे पीठ
  2. 1/ 2 कप साखर
  3. 1/ 2 कप किसलेले गाजर
  4. 3/ 4 कप दही
  5. 1/ 4 कप तेल
  6. 2आणि 1/2 टीस्पून दूध
  7. 1/ 2 टीस्पून बेकिंग पावडर
  8. 1/ 2 टीस्पून बेकिंग सोडा
  9. 1/ 2 टीस्पून व्हॅनिला इसन्स किंवा
  10. 1छोटा तुकडा जायफळ
  11. 2वेलची
  12. 1 छोटा तुकडा दालचिनी
  13. 1/ 4 टीस्पून मीठ
  14. 1 टेबलस्पून मिक्स ड्रायफ्रूट्स

कुकिंग सूचना

45 मिनट्स
  1. 1

    सर्व साहित्य एकत्र घेणे. साखरे बरोबर दालचिनी, वेलची, जायफळ ही बारीक करून घ्यायचे किंवा व्हॅनिला इसेन्स ही वापरू शकता.

  2. 2

    एका मोठ्या भांड्यामध्ये दही, पिठीसाखर, तेल आणि दूध सर्व एकजीव होईपर्यंत व्हीस्कर च्या साह्याने फेटुन घ्यायचे.

  3. 3

    सुखे पदार्थ चाळून घ्यायचे सुखे पदार्थांमध्ये गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मीठ एकत्र चाळुन घ्यायचे.

  4. 4

    त्यामध्ये गाजराचा कीस घालून तेही नीट मिक्स करून घ्यायचे.

  5. 5

    ज्या भांड्यात केक करायचा आहे त्या भांड्याला थोडेसे तेल आणि गव्हाचे पीठ लावून घ्यायचे त्यामुळे केक तयार झाल्यावर लवकर बाहेर निघतो त्यानंतर केकचे मिश्रण त्या भांड्यामध्ये ओतायचे.त्या भांड्याला दोनदा टाईप करायचे त्यामुळे त्यातील हवेचे बबल्स निघून जातात व केक हलका होतो. कढईमध्ये केक बेक करायला तीस मिनिटे ठेवायचा. किंवा हा केक तुम्ही ओव्हन मध्येही 180 डिग्री सेल्सिअसवर तीस मिनिटे बेक करू शकता.

  6. 6

    तीस मिनिटांनी केक बेक झाला का हे टूथपिक घालून बघायचे जर मिश्रण टूथपिक ला लागत असेल तर अजून पाच मिनिट केक बेक करून घ्यायचा. केक पूर्ण थंड झाल्यावर त्याला भांड्यातून सुरीने त्याच्या कडा सोडवून बाहेर काढायचे. आपला खूपच सॉफ्ट आणि स्पोंजी पण तेवढाच टेस्टी गाजर व्हीट केक तयार आहे एकदा खाल तर खातच रहाल इतका तो मस्त होतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
रोजी
नवी मुंबई
Youtuber- Vandana's RecipeHome made RecipesFood Blogger
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes