पालक पनीर (palak paneer recipe in marathi)

Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
virar

पालक पनीर (palak paneer recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०-२५ मिनिटे
४ जणांसाठी
  1. 2जुड्या पालक
  2. १५० ग्रॅम पनीर
  3. 1/2 वाटीफ्रेश क्रीम
  4. 1/2 वाटीमुठभर कोथिंबीर
  5. २-3 हिरव्या मिरच्या
  6. 1 इंचआल्याचा तुकडा
  7. 1 टीस्पूनगरम मसाला
  8. 1 टीस्पूनजिरे
  9. 1मध्यम आकाराचा कांदा - बारीक चिरलेला (ऐच्छिक)
  10. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

२०-२५ मिनिटे
  1. 1

    प्रथम चित्रात दाखविल्याप्रमाणे सगळे साहित्य घ्यावे. पालक निवडून व स्वच्छ धुवून घ्यावा. आता एका टोपात पाणी उकळवून त्यात पालक २-३ मिनिटे ब्लांच करून घ्यावा. आणि लगेच बर्फाच्या पाण्यात घालावा. १ मिनिटभर तसाच ठेवून मग त्याला काढावे. (असे केल्याने पालकाचा हिरवा रंग तसाच राहतो तो काळपट होत नाही.)

  2. 2

    नंतर मिक्सरच्या भांड्यात ब्लांच केकेला पालक, कोथिंबीर, मिरची, आले एकत्रित करून बारीक वाटून घ्यावे. पनीरचे तुकडे करून घ्यावे. एका कढईमध्ये थोडे तेल गरम करून त्यात पनीरचे तुकडे थोडेसे गोल्डन ब्राऊन करून घ्यावेत आणि ते एका प्लेटमध्ये काढून ठेवावेत. त्याच कढईत थोडे अजून तेल घेऊन त्यात जिरे व कांदा घालून, कांदा छान गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यावा.

  3. 3

    नंतर त्यात तयार केलेली पालकाची वाटलेली पेस्ट व थोडे पाणी घालून एक उकळी काढून घ्यावी. त्यात चवीनुसार मीठ, गरम मसाला व कसुरी मेथी घालून छान उकळवून घ्यावे. आता त्यात तळून ठेवलेले पनीरचे तुकडे घालून नीट मिक्स करावेत.

  4. 4

    त्यात मलई घालून एकजीव करावे. पालक पनीर तय्यार!!! चपातीबरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
रोजी
virar

Similar Recipes