कडा प्रसाद /गव्हा च्या पिठा चा शिरा (kada prasad recipe in marathi)

Sarita Harpale
Sarita Harpale @cook_19064029

#GA4 #week6

#HALAWA
नवरात्र आहे... सोसायटीत देवी ची स्थापना केली ए.... कोरोना काळात बाहेरून प्रसाद आणावा तरी कसा। म्हणून पहिल्यांदा कडा प्रसाद अर्थात गव्हा च्या पिठा चा शिरा हलवा try केला .... आणि खुओ सॉफ्ट आणि चविष्ठ झाला।

कडा प्रसाद /गव्हा च्या पिठा चा शिरा (kada prasad recipe in marathi)

#GA4 #week6

#HALAWA
नवरात्र आहे... सोसायटीत देवी ची स्थापना केली ए.... कोरोना काळात बाहेरून प्रसाद आणावा तरी कसा। म्हणून पहिल्यांदा कडा प्रसाद अर्थात गव्हा च्या पिठा चा शिरा हलवा try केला .... आणि खुओ सॉफ्ट आणि चविष्ठ झाला।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीगव्हा च पीठ
  2. 1 वाटीसाखर
  3. 1 वाटीसाजूक तूप
  4. 2 वाट्याभरून पाणी
  5. 1 टेबलस्पूनड्रायफ्रूट आवडीअनुसार

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    पॅन गरम करून त्यात एक वाटी साखर घाला आणि दोन वाट्या पाणी घालुन साखर विरघळेपर्यंत शिजवून घ्या। लक्षात ठेवा की इथे आपण साखरे चा पाक नाही बनवायचा ए फक्त साखर पाण्यात विरघळे परियंत हलवून घ्यायचे।

  2. 2

    एका कढईत गव्हा च पीठ कोरड भाजून घ्या। पीठा चा सुगंध येई परियन्त भाजायचे त्याला लाल होऊ द्यायचे नाही।

  3. 3

    पीठ काढून त्याच कढईत पाऊण वाटी साजूक तूप घाला। तूप तापलं की त्यातून काजू आणि बदाम भाजून घ्या। आणि म किशमिश सुद्धा भाजून घ्या। किशमिश मात्र वेगली भाजा काजू बदामा सोबत भाजली तर की जलुन जाइल। जर ड्रायफ्रूट नसतील आवडत तर ह्या तुपात पीठ भाजायला घ्या।

  4. 4

    पिठा ला छान 7-8 मिनिट गोल्डन ब्राऊन रंग येईस परियंत भाऊन घ्या। नाही तर हलवा कच्चा लागेल।

  5. 5

    आता ह्यात साखरे च पाणी घाला। वाटी च्या मापा अनुसार पाणी घेतलं असेल तर ते जास्त होणार नाही। पाणी घाकताना मात्र पीठ हलवत राहा नाही तर पिठा का गाठी पडतील। आणि आता पीठ तुप सोडे परियांत भाजा।

  6. 6

    आता कढई च्या कडे ने 4 बाजूने तूप घालून पीठ छान हलवून घ्या। जर असा कडेतून तुप सोडून हलवा भाजला तर हा हलवा खुओ सॉफ्ट बनतो ।

  7. 7

    आता आपला कडा प्रसाद, हलवा सर्व्ह करायला तैयार आहे।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sarita Harpale
Sarita Harpale @cook_19064029
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes