रबडी घेवर (rabadi ghevar recipe in marathi)

Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026

#पश्चिम#राजस्थान

रबडी घेवर (rabadi ghevar recipe in marathi)

#पश्चिम#राजस्थान

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
२ व्यक्ती
  1. २०० ग्रॅम मैदा
  2. ५० ग्रॅम बेसन
  3. १५० ग्रॅम तूप
  4. १०-१५ बर्फ चे क्यूब
  5. 1/2लिंबू
  6. 1 किलोतळण्यासाठी तेल
  7. रबडी साठी :
  8. 1 लिटर दूधा
  9. १५० ग्रॅम साखर
  10. १०-१५ केशर काड्या
  11. ५-७ खारिकची पावडर
  12. 1 टेबलस्पूनमनुका
  13. 1 टेबलस्पूनकाजू काप
  14. 1 टेबलस्पूनबदाम काप
  15. 1 टेबलस्पूनपिस्ता काप
  16. 1 टेबलस्पूनमगजबी
  17. 1 टेबलस्पूनसोफ गोळ्या

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    घेवर साठी लागणारे साहित्य एका डिशमध्ये काढून टाकले त्यानंतर तुपात बर्फाचे क्यूब टाकून हाताने पंधरा ते वीस मिनिट गोल राऊंड मध्ये तुपाचा रंग पांढरा होईपर्यंत खूप घुसळायचे.

  2. 2

    तू एकदम घट्ट झाल्यानंतर बर्फाचे उरलेले गोळे त्यातून काढून घ्यायचे व लिंबाचा रस घालायचा.व त्यात मैदा व बेसन घालायचे.

  3. 3

    गुठळी न होऊ देता बर्फाच्या थंडगार पाण्यातच भिजवायचे. बॅटर एकदम घट्ट व अगदीच पातळ करू नये. घेवरला तेलात टाकल्यावर चांगली जाळी यावी या प्रमाणात भिजवावे गॅस वर तेल गरम करत ठेवावे

  4. 4

    तेलाला उकळी आली की थोडे उंचावरून चमच्याने तेलात घेवरचं बॅटर ओतावे म्हणजे मध्यभागी होल पडून घेवरला चांगली जाळी पडते.

  5. 5

    घे वरचा रंग बदलेपर्यंत एकाच बाजूने शिजू द्यावे. सोनेरी रंग आल्यानंतर मध्यभागी पडलेल्या होलमध्ये सुरी किंवा पट्टी घालून हलक्या हाताने उलटे करावे तो मुडणार किंवा तुटणार नाही याची काळजी घ्यावी.

  6. 6

    दोन्ही बाजूने चांगला गोल्डन कलर आल्यानंतर एका डिशमध्ये हलक्या हाताने काढून घ्यावे थोडं उंच भांडे किंवा तिपाई,स्टॅड याच्यावर ठेवावे जेणेकरून त्यातील तेल सर्व खाली गळून जाईल व त्याची जाळी छान दिसेल. आपण घेवर करत असतानाच दुसर्‍या बाजूला रबडीसाठी दूध उकळत ठेवावे.

  7. 7

    दूध उकळून घट्ट झाल्यावर त्यात साखर ड्राय फ्रुट्स व केशर काड्या घालून घ्याव्यात व रबडी थोडी एकदम घट्ट असावी.रबडी पूर्णपणे तयार झाल्यानंतर गार्निशिंगसाठी ड्रायफ्रुट्स एका डिशमध्ये काढून घेतले काही ड्रायफ्रुट्स बारीक करून घेतले.

  8. 8

    रबडी पूर्णपणे घेवर वर पसरवून घ्यायची. नंतर त्यावर मगज बी खारीक पावडर काजू बदाम पिस्त्याचे काप मनूका पसरून घ्यावे. त्यात शोपच्या गोळ्याही कलरफुल घातले आहेत. रंगीबिरंगी दिसायलाही खूप छान व खायलाही खूप स्वादिष्ट अशी रबडी घेवर तयार आहे खायला खूप छान लागते त्यामुळे तुम्हीही करून पहा.

  9. 9

    टिप : घेवर तळणासाठी जे भांडे घेतलेआहे ते खूप उंच असे असावे जेणेकरून तेलात घेवर टाकल्यानंतर वरती येते त्यावेळेला तेल अंगावर सांडून एक्सीडेंट होऊ नये याची काळजी घ्यावी. म्हणजेच भांडे तेलाने एक चतुर्थांश १/४ भागच घ्यावं.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes