साजूक तुपातील चिरोटे (chirote recipe in marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#साजूक तुपातील चिरोटे
#अन्नपूर्णा
ही दिवाळी नेहमी पेक्षा वेगळी आहे .अशावेळी घरचे फराळाचे असावे हा आग्रह.मग सुर वात गोडानेच करू या.चिरोटे आमच्या घरी सर्वांचा वीक पॉइंट.खूप छान लागतात पण लवकर संपतात.

साजूक तुपातील चिरोटे (chirote recipe in marathi)

#साजूक तुपातील चिरोटे
#अन्नपूर्णा
ही दिवाळी नेहमी पेक्षा वेगळी आहे .अशावेळी घरचे फराळाचे असावे हा आग्रह.मग सुर वात गोडानेच करू या.चिरोटे आमच्या घरी सर्वांचा वीक पॉइंट.खूप छान लागतात पण लवकर संपतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

एक तास
चार व्यक्तिकरित
  1. 2 वाट्यामैदा
  2. 2 टेबलस्पूनरवा
  3. 4 टेबलस्पूनतेलाचे मोहन
  4. 1.5 वाटीसाखर
  5. 1 टेबलस्पूनकेसर वेलची सिर प
  6. 10काजू तुकडे
  7. साजुक तूप तळण्यासाठी

कुकिंग सूचना

एक तास
  1. 1

    सर्वप्रथम एका ताटात मैदा घ्या.यात तेलाचे मोहन घाला.चांगले मिसळून घ्या.मैदा आता भिजवून घ्या.अर्धा तास झाकून ठेवा.

  2. 2

    आता एकीकडे एका भांड्यात साखर घाला.यात साखर बुडेल इतके पाणी टाका.याचा एक तारी पाक करावा. या पाकामध्ये केसर वेलची सिरप घालावे. आता एका प्लेट मध्ये थोडे तेल व मैदा फेटून घ्या.

  3. 3

    आता भिजवलेल्या मैद्याचे गोळे करा.पोळी लाटून घ्या आता त्यावर मैद्याचे साट लावा.त्यावर कोरडा मैदा भुर भूरावा.

  4. 4

    आता ही पोळी तीन स्टेटमध्ये फोन करावी. दाखविल्याप्रमाणे. आता याचे छोटे छोटे काप करावे. व थोडे हलकेच लाटून घ्यावे.

  5. 5

    आता कढईमध्ये तूप तापत ठेवा. व त्यात हे चिरोटे गुलाबी तळून घ्यावे. तळून झाल्या बरोबर हे चिरोटे पाकामध्ये घालावे. लगेच एक मिनिटांनी बाहेर काढून ठेवावे.

  6. 6

    आताही चिरोटे एका प्लेटमध्ये ठेवा व त्यावर काजू लावा. थंड अथवा गरम सर्व्ह करावे साजूक तुपातली चिरोटे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154
रोजी
cooking and serving with love is my passion.
पुढे वाचा

Similar Recipes