पातळ पोहे चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#अन्नपूर्णा
#दिवाळी फराळ
#पातळ पोहे चिवडा

पातळ पोहे चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)

#अन्नपूर्णा
#दिवाळी फराळ
#पातळ पोहे चिवडा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
5 सर्व्हिंग्ज
  1. 1 किलोपातळ पोहे
  2. 300 मिली तेल
  3. 100 ग्रॅमखोबरे काप
  4. 100 ग्रॅमडाळ
  5. 150 ग्रॅमभाजलेले शेंगदाणे
  6. 1/ 2 कप कढीपत्ता पाने
  7. 3 टीस्पूनमोहरी
  8. 3 टीस्पूनहळद
  9. 3 टीस्पूनजीरे पूड
  10. 4 टीस्पूनधने पूड
  11. 1 टेबलस्पूनपांढरे तीळ
  12. चवीनुसार मीठ
  13. चवीनुसार पिठी साखर
  14. 10-12हिरवी मिरची
  15. 3 टीस्पूनलालतिखट
  16. 2 टीस्पूनहिंग

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    प्रथम चिवड्याची पूर्वतयारी करून घेणे. खोबरे काप करून घेणे. मिरचीचे बारीक तुकडे करणे. शेंगदाणे भाजून त्याचे साली काढून घेणे.कढीपत्ता आणि डाळे घेणे. हे सर्व एका प्लेट मध्ये घेणे. नंतर चिवड्यासाठी लागणारे मसाले एका प्लेट मध्ये काढणे. त्यात लालतिखट, हळद, हिंग, मीठ, मोहरी, धने पूड, जीरे पूड आणि पिठी साखर.

  2. 2

    नंतर कढई गॅस वर ठेवून ती गरम करण्यास ठेवणे. कढई गरम झाली कि त्यात थोडे थोडे करून पोहे हलकेसे भाजून घेणे. भाजलेले पोहे थोडे थोडे करून चाळणीने स्वच्छ चाळून घेणे.पोहे भाजले कि खुसखुशीत होतात.

  3. 3

    नंतर एक मोठे पातेले गॅस वर गरम करण्यासाठी ठेवावे. पातेले गरम झाले कि त्यात तेल घालावे. तेल तापले कि त्यात मोहरी घालून घेणे. मोहरी तडतडली कि त्यात मिरचीचे तुकडे व कढीपत्ता घालून 2 -3 मिनिटे खरपूस तळून घेणे. नंतर त्यात खोबरे काप घालून ते सोनेरी रंग होईपर्यंत परतणे.

  4. 4

    खोबरे परतून झाले कि त्यातच लगेचच डाळे आणि शेंगदाणे घालून 2-3 मिनिटे परतणे. हे सगळे घटक छान परतून झाले कि त्यात हळद, हिंग, धने पूड, जीरे पूड, तीळ आणि मीठ घालून घेणे. हे मसाले छान 2 मिनिट परतून घेणे.

  5. 5

    नंतर त्यात भाजलेले पोहे घालून सगळे मिश्रण एकसारखे हलवून घेणे. गॅस बारीक करून हे पातेले 5 मिनिटे गॅस वर ठेवून एकसारखे हलवत राहावे. नंतर गॅस बंद करून वरून चवीनुसार आणि आवडीनुसार पिठी साखर घालून तो चिवडा पुन्हा एकदा हलवून घेणे. अशाप्रकारे खमंग आणि खुसखुशीत चिवडा तयार झाला.

  6. 6

    मस्त खुसखशीत चिवडा तयार होतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

Similar Recipes