रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

25 मिनिट
6 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रामकोबी
  2. 3 टेबलस्पूनचणाडाळ
  3. 1 टीस्पूनमोहरी
  4. 1/2 टीस्पूनहिंग
  5. 4हिरव्या मिरच्या बारीक कापून
  6. 7-8कडीपत्त्याची पाने
  7. मध्यम आकाराचा अर्धा कांदा
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 2 टेबलस्पूनखवलेला खोबरं

कुकिंग सूचना

25 मिनिट
  1. 1

    प्रथम कोबी स्वच्छ धुवून कोबी बारीक चिरून घ्या. तासभरआधी चणा डाळ भिजत ठेवा.

  2. 2

    कढई मध्ये 2टेबलस्पून तेल घ्या. तेल गरम झाले कि मोहरी, कडीपत्ता, मिरची टाका मोहरी चांगली तडतडली कि हिंग आणि बारीक चिरलेला कांदा टाका. कांदा सोनेरी झाला कि हळद घाला. नंतर भिजवलेली चणा डाळ घालून झाकण ठेवून 5 मिनिट ची वाफ द्या.

  3. 3

    नंतर झाकण काढून डाळ शिजली का बघून घ्या बोटाने दाबून बघा. डाळ शिजलेली असेल च. नंतर त्यात चिरलेला कोबी घालून घ्या. आणि झाकण ठेवून चांगली 15-20 मिनिट वाफ द्या. 15 मिनिट नंतर झाकण काढा कोबी शिजलेली असेल.आता त्यात ओले खोबरं भुरभुरून घ्या. भाजी खाण्यासाठी तयार. थोडी कोथिंबीर वरून टाकावी.

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Trupti Mungekar
Trupti Mungekar @cook_27575725
रोजी

Similar Recipes