महाराष्ट्रीयन चमचमीत मसालेभात (masale bhaat recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#लंच
# शुक्रवार - मसालेभात
साप्ताहिक लंच प्लॅनर मधील पाचवी रेसिपी.
मसाले भाताशिवाय पंगतीचे जेवण अपूर्णच असतं. गोडा मसाला, साजूक तूप , ओलं खोबरं ,मठ्ठा,जिलबी याचं अप्रतिम आणि चमचमीत combination म्हणजे मसाले भात...😋😋
त्यातही भर म्हणून तूपात तळलेले काजूगर म्हणजे नखशिखांत नटलेलया सौंदर्यवंतीच्या भाळावरील चंद्रकोरच जणू!!😊
चला तर,पाहूयात चमचमीत मसालेभाताची रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० ते २५ मि.
४ सर्व्हिंग
  1. 1-1/2 कप आंबेमोहर, बासमती तांदूळ
  2. 1/2 कप मटार
  3. 1/4 कप गाजराचे तुकडे
  4. 1/4 कप फ्लाॅवरचे तुकडे
  5. 1टोमॅटो चिरून
  6. 1कांदा उभा चिरलेला
  7. 2तमालपत्र
  8. 1 टेबलस्पूनआलं लसूण क्रश
  9. 5- ६ काजू
  10. 1 टेबलस्पूनधणे
  11. 4लवंगा
  12. 1दालचिनी तुकडा
  13. 1चक्रफूल
  14. जीरे,मोहरी,हिंग
  15. 1 टीस्पून हळद
  16. 1 टीस्पूनलाल तिखट / आवडीनुसार
  17. 1 टीस्पूनगोडा मसाला
  18. 3वेलदोडे
  19. ओलं खोबरं
  20. 1 टेबलस्पूनतूप
  21. कोथिंबीर
  22. 3 कपपाणी
  23. 1मध्यम आकाराच्या बटाट्याच्या फोडी
  24. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

२० ते २५ मि.
  1. 1

    पॅनमधे धणे,लवंग,चक्रफूल, दालचिनी २ परतून ब्लेंडरमधे जाडसर वाटून घ्या.

  2. 2

    कढईत तेल गरम करून त्यात जीरे,मोहरी,हिंग, तमालपत्र, वेलदोडे,काजू परतून घ्या.

  3. 3

    नंतर त्यात कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.

  4. 4

    त्यात सर्व मसाले,ब्लेंडरमधे वाटलेला मसाला आवडीनुसार घालून परतून घ्या. नंतर त्यात सर्व भाज्या, टोमॅटो,मीठ घालून व्यवस्थित परतून घ्या.

  5. 5

    तांदूळ घालून,पाणी घालून मिक्स करा‌.वरून तूप घालून भात शिजवून घ्या.

  6. 6

    वरून ओले खोबरे, कोथिंबीर घालून मठ्ठा व जिलबी सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes