ढाबा स्टाइल शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)

Mangala Bhamburkar
Mangala Bhamburkar @cook_26659112
Amravati

ढाबा स्टाइल शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१तास
४व्यक्ती
  1. 2कांदे
  2. 2टोमॅटो
  3. 2सुखी लाल मिरची
  4. 4-5 टेबलस्पूनदही
  5. 1/2 वाटीकाजू
  6. 200 ग्रामपनीर
  7. 2 टेबलस्पूनसाजूक तूप/तेल
  8. 1 वाटीदूध
  9. 1मोठी विलायची
  10. 1छोटी विलायची
  11. 1 इंचकलमी चा तुकडा
  12. 1चक्रीफुल
  13. 1तमालपत्र
  14. 3/4 वाटीदूध मलाई
  15. 1 टेबलस्पूनजीरा
  16. 1/2 टीस्पूनहळद
  17. 1 टेबलस्पूनलाल काश्मिरी तिखट
  18. 1 टेबलस्पूनआलं-लसूण पेस्ट

कुकिंग सूचना

१तास
  1. 1

    प्रथम काजू उकळत्या पाण्यात टाकून दहा मिनिट मुरु द्या म्हणजे तो नरम होईल. पनीरचे चौकोनी तुकडे करून घ्या

  2. 2

    कढईत थोड तेल/साजूक तूप घाला त्यात जिर, लवंग, मोठी व छोटी विलायची, तमालपत्र व चक्री फुल घाला, जिरं मोहरी थोडी तडतडूडी द्या व त्यात कापलेला कांदा व टोमॅटो घाला, कांदा टोमॅटो थोडा कलर ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या व सर्वांची पेस्ट करा काजूची पेस्ट वेगळी करायची

  3. 3

    कढईत दोन चमचे तेल घ्या व त्यात टोमॅटो- कांद्याची पेस्ट चांगली भाजून घ्या त्यात अद्रक लसणाची पेस्ट घाला,, अद्रकं लसुन छान भाजून झाल्यानंतर काजूची पेस्ट घाला,अर्धा चमचा हळद व एक चमचा कश्मीरी लाल मिरची टाका. मीठ चवीनुसार टाकायचे व त्यानंतर छान ढवळायचे झाकण ठेवून पूर्ण ओलावा निघेपर्यंत व साईडला तूप किंवा तेल सुटेपर्यंत भाजायचे,झाकण ठेवून २-३मिन शिजवायचे व दही, धने पावडर ची पेस्ट करायची मसाल्यात घालायची

  4. 4

    नंतर चांगली फेटलेली मलाई टाकायची व झाकण ठेवून छान शिजू द्यायचं मधून मधून मसाला ढवळाय चा. त्यानंतर एक ते दीड वाटी दूध टाकायचं पाणी टाकू नये दोन-तीन मिनिट मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून शिजवावे नंतर भाजून बारीक केलेली कसुरी मेथी घालायची गरम मसाला घालायचा व छान मिसळायचं

  5. 5

    सर्व मसाला छान मिसळायचा त्यात थोडी साखर घालायची व सगळ्यात शेवटी पनीर टाकायचं नाहीतर पनीर तुटण्याची भीती असते, धाबा स्टाइल शाही पनीर तयार होईल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mangala Bhamburkar
Mangala Bhamburkar @cook_26659112
रोजी
Amravati

टिप्पण्या

Similar Recipes