पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)

Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252

पावभाजी खरोखरच सोपा, पोटभरीचा आणि चविष्ट पदार्थ आहे.गरम गरम extra butter , चिज मारलेली पावभाजी बघीतली की,तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही.मस्त गाडीवरची पावभाजी त्याचा तव्यावरचा पावभाजी स्मॅश करतानाचा खडखड आवाज ,सगळीकडे दरवळलेला सुगंध पोटातली भूक अजुनच जागवतो .पावभाजी आवडत नाही असं म्हणणारा माणूस मिळणं कठीणच...भाज्यांच्या मिश्रणाने बनणारी पाव किंवा ब्रेड सोबतीने सहज फस्त होणारी ही पावभाजी अनेक वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. लाल पावभाजी, ग्रीन पावभाजी, ब्लॅक पावभाजी, खडा पावभाजी, स्मॅश्ड् पावभाजी, चिझ पावभाजी, पनीर पावभाजी अमूल पावभाजी, कोल्हापुरी पावभाजी,जैन पावभाजी, पनीर पावभाजी,मसाला पाव अशा अनेक variations मधे पावभाजी बनवली जाते. पावभाजी हा पदार्थ मुखत्वे करून संध्याकाळीच खाल्ला जातो.
गरजेनुसार पावभाजीत बरेच बदल झालेत. पाव-भाजी मध्ये भाजी बनविण्यासाठी टोमॅटो, बटाटे, कांदा, लसूण आल्याची पेस्ट, मसाले, तसेच ढोबळी मिरची, फूलकोबी, मटार ह्या भाज्या आवश्यक असतात.पावभाजी मध्ये कसुरी मेथी न विसरता घालावी..छान सुगंधित आणि चवदार लागते😋
पार्टी अथवा लहान मुलांच्या कार्यक्रम ,घरात वाढदिवस असेल,छोटेसे गेट-टुगेदर असेल, चटपटीत मेनू करायचा असेल तर पाव भाजी एकदम आवडीचा मेनू आणि मस्त ...
कुठल्याही function ला फिट बसणारा, लहान थोर सगळ्यांना आवडणारा आणि आपल्या जिभेचे लाड पूरवणारा असा हा पदार्थ 😍😍पावभाजी करण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यांची निवड करू शकता . बीट टाकल्याने भाजीला छान कलर येतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
10 सर्व्ह
  1. 1/2 किलोफ्लावर
  2. 400 ग्रॅमसोललेले मटार दाणे
  3. 200 ग्रॅमसिमला मिरची(बारीक चौकोनी तुकडे करून)
  4. 400 ग्रॅमउकडलेले बटाटे
  5. 600 ग्रॅमटोमॅटो (प्युरी करून)
  6. 2बिट
  7. 2गाजर
  8. 1/2 किलोकांदे(बारीक चिरलेले)
  9. 150 ग्रॅमफरसबी
  10. 3 टेबलस्पुनआलंलसूण पेस्ट
  11. 3 टेबलस्पूनवाडवळी मसाला
  12. 2 टीस्पूनहळद
  13. 1 टेबलस्पूनकाश्मिरी मिरची पावडर
  14. चवीनुसार मीठ
  15. 5-6 टेबलस्पून पावभाजी मसाला(भाजी किती चमचमीत पाहिजे त्यानुसार मसाल्याचं प्रमाण कमी/जास्त करावं)
  16. 3पॅकेट अमूल बटर
  17. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  18. चीज(आवडीनुसार)
  19. 1 टीस्पूनकसुरी मेथी
  20. बारीक चिरलेली कोथिंबीर
  21. लिंबू
  22. पाणी गरजेनुसार
  23. लादीपाव/ ब्रेड
  24. 2 टीस्पूनकांदा लसूण मसाला

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून, जाडसर कापून घ्याव्यात. बटाटे कुकरमध्ये ३ शिट्या काढून उकडून घ्यावेत.भाज्या शिजवताना थोडे मीठ, हळद, हिंग घाला.टोमॅटोची प्युरी करून घ्यावी.

  2. 2

    ,कांदा, सिमला मिरची सोडून सगळ्या भाज्या कुकरमध्ये शिजवून घ्या.भाज्या शिजवताना मोजकेच पाणी घाला. भाज्या व्यवस्थित शिजल्या की मॅशरच्या सहाय्याने भाज्या मॅश करा. उकडलेले बटाटे भाजीत घालून एकत्र मॅश करून घ्यावेत.उकडलेल्या भाजीचे पाणी फेकू नका.हेच उरलेले पाणी पावभाजीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करताना वापरावं.बिट घातल्यामुळे भाजीला छान लाल रंग येतो....

  3. 3

    कांदे व सिमला मिरची बारीक चिरून ठेवा.मसाले तय्यार ठेवा. मसाले भाजीत घालताना जळणार नाहीत ह्याची काळजी घ्या नाहीतर भाजीला काळपट रंग येईल.

  4. 4

    जाड बुडाच्या कढईत 1 टेबलस्पून तूप गरम करावे आणि त्यात 1 पॅकेट बटर घालावं. मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा आणि गॅस मोठा करून कांदा गुलाबी रंगाचा होईस्तोवर चांगला परतून घ्यावा. मग त्यात आलं लसूण पेस्ट घालून मिक्स करावे.आता चिरलेली सिमला मिरची घालून थोडी शिजवावी.

  5. 5

    शिमला मिरची थोडी शिजत आल्यानंतर टोमॅटोची प्युरी घालून तूप सुटेपर्यंत परतून घ्या.यामध्ये हळद,वाडवळी मसाला,काश्मिरी मिरची पावडर,मीठ,पावभाजी मसाला घालून छान परतून घ्या.

  6. 6

    नंतर यात मॅश केलेल्या भाज्या घालून व्यवस्थित परतून एकजीव करून घ्यावे. आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून ढवळून घ्यावं.तश्या भाज्या शिजलेल्या असतात पण सगळे फ्लेवर्स एकत्र व्हावे यासाठी १० मि. कढईवर झाकण घालून ठेवाव. भाजीची चव घेऊन आवश्यकता वाटल्यास मीठ मसाला घाला. वरून बटर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. भाजी मुरली की जास्त चविष्ट लागते. म्हणून वाढण्यापूर्वी किमान अर्धातास आधी करून ठेवावी

  7. 7

    तवा गरम करून त्यात अमुल बटर सोडा. मग पावाला सुरीने मधोमध चिर पाडा. आणि बटर लावा.पाव गरम झाले की वरून थोडासा कांदा लसूण मसाला लावायचा(मसाला पाव) आणि मस्तपैकी बटरमधे घोळून गरमागरम पाव चमचमीत पावभाजीसोबत तय्यार.....
    प्लेटमध्ये गरमागरम भाजीवर बटर, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालावी आणि पावाबरोबर सर्व्ह करा. सोबत लिंबाची फोड द्यायला विसरू नका!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252
रोजी

Similar Recipes