कण्कीचे गुलाबजाम (kankiche gulabjamun recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#GA4 #week18
गुलाबजाम का कीवर्ड घेउन मी ही रेसिपी केली आहे
नेहमी मैदा किंवा खवा ह्याचेच गुलाबजाम आपण पाहिलेत पण मैदा हा घटक पचनास जड जातो अणि बर्याच लोकांना पथ्य पण असते.. हाच विचार करुन कणकेचे केले तर.. करुन पहिले फसले नाही पण पाक मुरायला वेळ लाग पण चव तशीच अणि पचायला पण हलके.. नक्की करुन पहा व मला सांगा.. हे कण्कीचे गुलाबजाम

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

25 मिनिट कृती अणि 30-40 मिनिट मुरायला
15 नग
  1. 40 ग्रॅमकणिक
  2. 40 ग्रॅममिल्क पावडर
  3. 1/2 टीस्पूनखायचा सोडा
  4. 1 टीस्पूनखडी साखर
  5. 1 वाटीसाखर
  6. 1 वाटीपाणी
  7. 1/2 टीस्पूनवेलचीची पुड
  8. तेल तळण्यासाठी
  9. 10 टेबलस्पूनदुध पाणी एकत्र केलेले

कुकिंग सूचना

25 मिनिट कृती अणि 30-40 मिनिट मुरायला
  1. 1

    सगळे सामान एकजागी तयार ठेवावे.. प्रथम कणिक मिल्क पावडर अणि खायचा सोडा कोरडाच एकत्र करावा व त्यात थोडे थोडे करुन दुध पाणी एकत्र केलेले घालत एक गोळा मळुन घ्या.

  2. 2

    हा मळलेला गोळा दहा मिनिट झाकुन ठेवा,मग त्याचे समान छोटे छोटे गोळे करुन घ्या व सोनेरी रंगा वर तळून काढावेत व थंड झल्यावर थोडा टूथपिक नी टोचून घेउन पाकात मुरायला ठेवा.

  3. 3

    तुम्ही गुलाबजाम पाक गरम करुन सर्व्ह करु शकता किंवा थंड पण..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
@cook_22433392 मस्त 👍🏻 गव्हाच्या पीठाचे प्रथमच बघितले

यांनी लिहिलेले

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

Similar Recipes