स्मोकी तंदुरी मखाना (smoky tandoori makhana recipe in marathi)

Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
Mumbai

#GA4
#week19
कीवर्ड-तंदुरी
मखाना म्हणजे कमळाच्या बिया.... मखाना हे पौष्टिक खाद्य आहे. मखाना मध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. रक्तदाबला संतुलित ठेवायचं काम मखाना करतो. त्यामुळे रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांसाठी मखाना हे वरदानच आहे. कॅल्शियम, लोह, प्रोटीन,फॉस्फरस, पण मुबलक प्रमाणात असते. तसेच मखाना मध्ये अँटीऑक्सीडेंटची मात्र मुबलक प्रमाणात असते. अँटीऑक्सीडेंट हा शरीराला आवश्यक असणारा अति महत्त्वाचा घटक आहे. अँटीऑक्सीडेंट मुख्यत: आपल्या शरीराची त्वचा उजळवण्यात आणि रोगप्रतिकारक शक्ती अधिक बळकट करण्यास मदत करतात. त्याचबरोबर मखाना मध्ये कमी ग्लाईसेमिक इंडेक्स असतं. त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होण्यास मदत होते. त्यामुळे माखण्याच्या रोजच्या खाण्यात नक्कीच वापर केला पाहिजे....मी केलेले तंदुरी मखाना टेस्ट ला खूप छान लागतात. माझ्या मुलीला खूप आवडले.😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2 जणांसाठी
  1. 2 कपमखाना
  2. 2 टीस्पूनबटर
  3. 1 टीस्पूनतंदुरी मसाला
  4. 1/2चाट मसाला
  5. 1/2 टीस्पूनलाल मसाला
  6. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  7. 1/2 टीस्पूनकाळे मीठ
  8. 1/2 टीस्पूनमीठ
  9. 1/2 टीस्पूनतूप
  10. 1छोटासा कोळसा

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    पॅन गरम करून त्यात मध्यम आचेवर मखाना भाजून घ्या. करपणार नाहीत याची काळजी घ्यावी. एक प्लेट मध्ये सगळे मसाले मिक्स करून घ्या.

  2. 2

    मखाना कुरकुरीत झाला की नाही हे पाहण्यासाठी एक मखाना हातात घेऊन दाबून बघा तो जर पटकन तुटला आणि चुरा झाला तर मखाना तयार आहे. एका प्लेट मध्ये काढून घ्या. पॅन मध्ये बटर टाकून गॅस लो करा.त्यात मिक्स केलेले मसाले टाकून लगेच मखाना टाकून एकजीव करा मसाला करपला नाही पाहिजे 1 मिनिट परतवून गॅस बंद करा.

  3. 3

    आता कोळसा छान गॅस वर गरम करून घ्या. छान लाल झाला की छोट्या वाटीत ठेवून ती वाटी माखण्याच्या मधोमध ठेवा. लगेच त्यावर तूप टाकून घट्ट झाकण लावून 5 मिनिटे तसच ठेवा. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
रोजी
Mumbai
I love cooking.... it's one of my favorite hobby....I m passionate about cooking.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes