काजू मखाना खीर (kaju makhana kheer recipe in marathi)

Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351

#रेसिपीबुक
#week7
#सात्विकॴहार
श्रावण महिना म्हटलं की उपवास हे आलेच त्यासाठी आज काजू मखाना खीर ही रेसिपी तुमच्यासाठी शेअर करत आहे. मखाना हा अतिशय पौष्टिक व उपवासाला चालणारा पदार्थ आहे. मखाना ला लोटस सीड असेही म्हणतात. मखाना तुपामध्ये फ्राय करून त्यामध्ये मीठ व मिरेपूड घालून आपण खाऊ शकतो. फ्राय केलेले मखाना मी माझ्या मुलांना चिप्स ला पर्याय म्हणून देते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिटे
  1. 1/2 लिटरदूध
  2. ५० ग्राम मखाना
  3. 9-10काजू
  4. 2 टेबलस्पूनसाखर
  5. 1/2ती स्पून वेलची पावडर
  6. 7-8केशर
  7. 8-9किशमिश
  8. 1 टी स्पूनतूप

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    प्रथम पॅनमध्ये पण१ टी स्पून तूप घालावे व तूप थोडेसे वितळल्यावर त्यामध्ये मखाना व काजू गुलाबी होई पर्यंत फ्राय करून घ्यावे.

  2. 2

    काय झालेले मखाना थंड झाल्यावर ते आता मिक्सरमधून आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहेत.

  3. 3

    हे मिश्रण थंड होईपर्यंत आता आपण अर्धा लिटर दूध घेऊन गरम करण्यासाठी ठेवायचे आहे.दूध पूर्ण उकळल्यावर आता आपल्याला त्यामध्ये आपण वाटलेले जाडसर मखाना व काजूचे मिश्रण दुधामध्ये घालायचे आहे. मग त्यामध्ये केशराच्या काड्या, ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करावे. हे मिश्रण पाच मिनिटे शिजू द्यावे.

  4. 4

    हे मिश्रण पूर्ण उकळल्यावर मग त्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. वेलची पावडर मिक्स करायची आहे. त्यानंतर हे मिश्रण साखर वितळेपर्यंत शिजू द्यायचे आहे.

  5. 5

    ही झाली आपली काजू मखाना खीर तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes