दडपे पोहे.. (dadpe pohe recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#ब्रेकफास्ट #रविवार #दडपे पोहे
#Cooksnap
Rupali Atre Deshpande यांची दडपे पोहे ही रेसिपी मी आज cooksnap केली आहे.. मी टोमॅटो,काकडी घालत नसे..पण आज टोमॅटो,काकडी घालून बघितले..खूप स्वादिष्ट रुचकर झालेत दडपे पोहे..Thank you for this delicious recipe..😊🌹
दडपे पोहे...नावातच आहे या पोह्यांची वैशिष्ट्य...पोह्यांवर वजन ठेवून दडपून ठेवलेले पोहे..लहानपणी आई पोह्यांवर नारळपाणी,ओलं खोबरं,कांदा कोथिंबीर,मिरची,मीठ,साखर घालून त्यावर एखादी जड वस्तू ठेवून दडपत असे.. त्यामुळे सगळ्या पदार्थांचे अर्क पोह्यांमध्ये उतरून दडपे पोह्यांची खमंग भट्टी जमून येतं असे..आणि मग असे अर्धवट मऊ,अर्धवट कच्चे खमंग दडपे पोहे खाणे हा सुख सोहळा असे..😍😋..जसं नोकरीच्या ठिकाणी आपल्याला Target पूर्ण करायला दिले असते..त्यावेळेस नकळत आपल्या मनावर back of the mind का असेना पण Pressure हे असतेच..आणि मग त्या pressure खाली नकळत आपण चांगला performance देतो..तसंच काही दडपे पोह्यांच्या या बाबतीत घडत असावं..😊😊
चला तर मग रेसिपी कडे जाऊ या..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25मिनीटे
4जणांना
  1. 200 ग्रामपातळ पोहे
  2. 2कांदे
  3. 2टोमॅटो
  4. 2काकडी
  5. 2-3 टेबलस्पूनओले खोबरे
  6. 3 टेबलस्पूननारळ पाणी (ऑपशनल)
  7. 5-6हिरवी मिरची
  8. 6-7कढीपत्ता पाने
  9. 3 टेबलस्पूनतेल
  10. 1 टीस्पूनहळद
  11. 1 टीस्पूनमोहरी
  12. 2 टीस्पूनलिंबू रस
  13. चवीनुसारमीठ
  14. चवीनुसारसाखर
  15. कोथिंबीर
  16. वरून घालण्यासाठी बारीक शेव
  17. 2 टेबलस्पूनशेंगदााणे तळून
  18. डाळिंब दाणे सजावटीसाठी

कुकिंग सूचना

20-25मिनीटे
  1. 1

    प्रथम पातळ पोहे स्वच्छ चाळणीने चाळून घेणे. ते एका खोलगट प्लेट मध्ये घेऊन त्या वर नारळाचे पाणी थोडे थोडे घालून अलगद एकत्र करणे. हलकेसे ओले होतील पोहे. (नारळ पाणी ने टेस्ट खूप छान येते.) कांदा, टोमॅटो, काकडी बारीक चिरून घेणे.

  2. 2

    आता त्या मध्ये कांदा, टोमॅटो, काकडी घालून घेणे. व अलगद सगळे एकत्र करून घेणे.5 मिनिटे झाकण ठेवून देणे. तो पर्यंत फोडणी करून घेणे

  3. 3

    त्या साठी कढई मध्ये तेल घालावे. तेल गरम झाले कि त्यात शेंगदाणे तळून घेऊन ते पोहे वर घालणे. आता त्याच तेला मध्ये मोहरी घालून ती तडतडली कि त्यात हिंग, हळद मिरचीचे तुकडे, कढीपत्ता घालून खमंग फोडणी करून घेणे.

  4. 4

    आता ही तयार फोडणी पोहे वर घालावी वरून चवीनुसार मीठ, साखर घालून घेणे. आवाडीनुसार लिंबू रस घालावा. व सगळे पोहे हलवून घेणे

  5. 5

    अशाप्रकारे मस्त टेस्टी आणि झटपट असे दडपे पोहे नाष्ट्या साठी तयार झाले. वरून भरपूर कोथिंबीर आणि ओले खोबरे, बारीक शेव डाळिंब दाणे घालून सर्व्ह करावे.

  6. 6
  7. 7
  8. 8
  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स (2)

Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Similar Recipes