मसाला थेपले (masala thepla recipe in marathi)

Rohini Kelapure
Rohini Kelapure @cook_25511830
पुणे

#GA4
#week20
#thepla हा कीवर्ड घेऊन मी #मसाला_थेपला रेसिपी सादर करत आहे.

इंडियन फ्लॅट ब्रेड मध्ये अनेक पदार्थ येतात जसं की भाकरी, थालीपीठ, पराठा, डोसा, इ. पण त्यातला ठेपला हा सर्वाधिक लोकप्रिय आहे.

थेपला ही खास गुजराती डिश आहे. कोणतीही भाजी आणि/किंवा विविध मसाले तसेच कोणत्याही धान्याचे आणि डाळीचे पीठ एकत्र करून हा पोळी सदृश प्रकार बनवला जातो. विशेष म्हणजे हा किमान तीन ते चार दिवस टिकत असल्याने प्रवासात न्यायला अति उत्तम पदार्थ आहे.

लोणचे, दही, भाज्यांमध्ये खासकरून बटाट्याची भाजी यासोबत अप्रतिम लागतो. गुजरातमध्ये नाश्त्याला थेपला हमखास असतोच. तिथे तर म्हणतातच "सवारे सवारे नाश्ता मा थेपला खासे तो बीजू काई खावानू जरुरतच नथी" म्हणजे सकाळी जर नाष्ट्यामध्ये थेपला खाल्ला तर मग दुसरं काही खाण्याची गरजच नाही! इतका पोटभरीचा ठेपला पाहता पाहता सर्वांचाच आवडता झालाय त्यात काय नवल?

मुंबईत तर एकेका केंद्रावरून सरासरी ६००-८०० ठेपले सहज विकले जातात. काही केंद्रांवर तर दहा किलो मिश्रणाचे ठेपले करून दुकानांमध्ये विकायला ठेवले जातात. चला तर पाहूया थेपला ह्या करायला सोप्या, टिकाऊ आणि पोटभरीच्या पौष्टिक पदार्थाची रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
२ व्यक्ती
  1. 1 लहान वाटी गव्हाचे पीठ
  2. 1/2 लहान वाटी बेसन
  3. 1/4 चमचाहळद
  4. 1/4 चमचाजिरेपूड
  5. 1/4 चमचाचाट मसाला
  6. चिमूटभरहिंग
  7. 1/2 चमचातिखट
  8. 1 चमचाकोथिंबीर
  9. 2 चमचेदही
  10. 1 चमचातीळ
  11. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    गव्हाच्या पिठात बेसन मिसळून त्यात तिखट, मीठ, हिंग, हळद, जिरेपूड, तीळ, चाट मसाला एकत्र करावा. त्यात कोथिंबीर, दही आणि २ चमचे तेल घालून पुन्हा सर्व एकत्र मिसळावे.

  2. 2

    लागेल तेवढेच पाणी जराजरासे वापरून घट्ट गोळा भिजवून १५ मिनिटे झाकून ठेवावा.

  3. 3

    मिश्रणाचे छोटे गोळे करावेत. मग एकेक गोळा पातळ लाटून घ्यावा. दिलेल्या प्रमाणात सात थेपले तयार होतात.

  4. 4

    तवा तापवून त्यावर एक थेपला टाकावा. आच कमी ठेवावी. जरासा शेकला की उलटून शेकावा. मग त्यावर दोन्ही बाजूंनी तेल लावून मध्यम आचेवर पूर्ण शेकावा.

  5. 5

    असे सर्व थेपले तयार करून घ्यावेत. लोणचे, चटणी, ठेचा, बटाट्याची पातळ भाजी, उसळ कशाही बरोबर मसाला_ थेपला सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rohini Kelapure
Rohini Kelapure @cook_25511830
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes