"हार्ट-बिट♥️मोमोस" (heart shape beet momos recipe in marathi)

"हार्ट-बिट♥️मोमोस"
प्रेम म्हणजे प्रेम असतं.. तुमचं आमचं सेम असत.. अस कितीही म्हटलं तरी,मनातलं गुपित ओठावर आणण्याची किंवा व्यक्त करण्याची प्रत्येकाची विशिष्ट अशी शैली असते...
कोणी प्रेम शब्दात व्यक्त करत.. तर कोणाला नजरेचा एक तिरचं पूरेसा असतो...😊😊 आणि कोणाला प्रेम व्यक्त करायला शब्दही अपुरे पडतात...😍😍
आपल्या जवळच्या अगदी जवळच्या व्यक्तीच्या आवडीच्या गोष्टी करण्यातच मला आनंद मिळतो, आणि प्रेमाच्या एका खास क्षणासाठी फक्त 'वेलेन्टाइन डे' ची वाट का पहावी.... प्रेम करणाऱ्यांसाठी प्रत्येक दिवस हा "वेलेन्टाइन डे" असं माझं मत...☺️☺️
तेव्हा प्रेम साजरे करण्यासाठी आज मी बनवले आहेत, "हार्ट-बिट♥️मोमोस" ज्यात मी बिटरूट वापरून गुलाबीसर लाल रंग आणलाय..♥️♥️
"हार्ट-बिट♥️मोमोस" (heart shape beet momos recipe in marathi)
"हार्ट-बिट♥️मोमोस"
प्रेम म्हणजे प्रेम असतं.. तुमचं आमचं सेम असत.. अस कितीही म्हटलं तरी,मनातलं गुपित ओठावर आणण्याची किंवा व्यक्त करण्याची प्रत्येकाची विशिष्ट अशी शैली असते...
कोणी प्रेम शब्दात व्यक्त करत.. तर कोणाला नजरेचा एक तिरचं पूरेसा असतो...😊😊 आणि कोणाला प्रेम व्यक्त करायला शब्दही अपुरे पडतात...😍😍
आपल्या जवळच्या अगदी जवळच्या व्यक्तीच्या आवडीच्या गोष्टी करण्यातच मला आनंद मिळतो, आणि प्रेमाच्या एका खास क्षणासाठी फक्त 'वेलेन्टाइन डे' ची वाट का पहावी.... प्रेम करणाऱ्यांसाठी प्रत्येक दिवस हा "वेलेन्टाइन डे" असं माझं मत...☺️☺️
तेव्हा प्रेम साजरे करण्यासाठी आज मी बनवले आहेत, "हार्ट-बिट♥️मोमोस" ज्यात मी बिटरूट वापरून गुलाबीसर लाल रंग आणलाय..♥️♥️
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी आवरण बनवून घेऊया,त्या साठी एका कुकर मध्ये बिटरूट थोडं पाणी आणि मीठ घालून वाफवून घ्या आणि त्याची प्युरी करून घ्या
- 2
त्या नंतर एका पॅन मध्ये तयार प्युरी,तेल आणि आणि पाणी घालून एक उकळी येऊ द्या
- 3
आता या मिश्रणात मैदा घालून मिक्स करा
- 4
आता मैद्याच मिश्रण एका परातीत काढून घ्या, आणि गरम असतानाच मळून घ्या
- 5
आताहा गोळा 15 मिनटं बाजूला ठेऊन द्या
- 6
आता सारण बनवायला घेऊया त्या साठी सर्व भाज्या आधी बारीक चिरून घ्या
- 7
एका सुती कापडावर सर्व भाज्या ठवून घ्या, आणि त्यात मीठ घालून घ्या, 10 मिनटं तसेच ठेवून मग त्यातले पाणी काढून घ्या आणि एका वाटी मध्ये काढून घ्या
- 8
आता यात काळीमिरी पूड,चिली फ्लेक्स घालून घ्या,आणि मिक्स करून ठेवा
- 9
आता आपल्या तयार मैद्याच्या गोळ्यांचे छोटे छोटे गोळे करून घ्या
- 10
त्याची एक पारी लाटुन घ्या
- 11
त्यात चमचाभर तयार सारण ठेवा
- 12
आणि मोमोस ला हृदयाच्या आकार देऊन घ्या
- 13
आता स्टिमर मध्ये पाणी घालून पाणी गरम करायला ठेवा,आणि स्टीमिंग प्लेट ला तेल लावून घ्या,आणि त्या वर तयार मोमोस ठेवून घ्या, आणि 10-12 मिनटं मध्यम आचेवर वाफवून घ्या
- 14
आणि गरमागरम सर्व्ह करा,प्रेमासाठी बनवलेले,प्रेमाचे असे "हार्ट-बिट♥️मोमोस"
"Heart-beet♥️mOmOs"
Similar Recipes
-
नाचनी स्वीट (nachni sweet recipe in marathi)
#Heart ,व्हँलेनटाइन डे स्पेशल म्हणुन मी हार्ट शेप मध्ये नाचनीच्या पिठापासून मिठाई बनवली. प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं ❤️ Nanda Shelke Bodekar -
हार्ट बिट (heart beet recipe in marathi)
#Heart #१४ फेब्रुवारी व्हेलेंटाईन दिवस रोमन संत व्हेलेंटाईन ह्यांचा दिवस म्हणजेच प्रेमदिवस म्हणून जगभर साजरा केला जातो आपल्या आवडत्या व्यक्तिला शुभेच्छा, संदेशा, फुले, चॉकलेट, गिफ्ट देऊन साजरा केला जातो चला तर ह्या प्रेमाच्या दिवशी मी बनवलेली हार्ट बिट रेसिपी तुम्हा सगळ्यांशी मी शेअर करते Chhaya Paradhi -
क्रिस्पी लौकी हार्ट शेप स्नॅक्स.. (crispy lauki heart shape snacks recipe in marathi)
#Heartव्हॅलेंटाईन डे सर्वांसाठीच खूप स्पेशल असतो. आणि अशा स्पेशल व्हॅलेंटाईन साठी काहीतरी स्पेशल झालेच पाहिजे.. नाही का...? सकाळपासून विचार करत होते, आणि घरी कुणालाच गोड खायची इच्छा नव्हती. काहीतरी चांगले चटपटीत झाले पाहिजे, असे घरातील सर्वांचे एकमत झाले...पण काय...?दोन-तीन दिवसापासून लौकी घरात आणलेली.. पण तीच्या कडे बघण्याची सवड मला मिळाली नाही, किंवा घरातील लोकांना लौकी आवडत नसल्याकारणाने ती मागेच राहत गेली. तिची ती केविलवाणी नजर मला काही तरी सांगू पहात होती...मग आज ठरविले तिचे म्हणणे ऐकून घ्यायचे, आणि सोबतच घरातील सदस्यांना खुश करायचे. आणि तसेही व्हॅलेंटाईन वीक कुक पॅडवर चालू असल्याकारणाने, हार्ट शेप मध्ये काहीतरी करण्याचे डोक्यात विचार चालू झाले.. आणि मग क्रिस्पी लोकी हार्ट शेप स्नॅक्स तयार झाले... शेवटी काय प्रेम व्यक्त करण्याचा हा एक बहानाच हो कि नाही... ♥️🌹 म्हणतात ना...प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं...तुमचं आमचं अगदी सेम असतं....याहून वेगळ काय असतं...प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत....🌹🌹💕💕 Vasudha Gudhe -
हार्ट - बिट मोमोज (heart beet momos recipe in marathi)
#Heart#cooksnap हि शितल राऊत ह्यांची रेसिपी आहे.मला आवडली म्हणून कुकस्नॅप केली. धन्यवाद. Sumedha Joshi -
"हार्ट बिट-वॉलनट सॅलड" (heart beet walnut salad recipe in marathi)
#sp#सॅलड_प्लॅनर_पदार्थ" हार्ट बिट-वॉलनट सॅलड " बिट किती फायद्याचे आहे ते तर आपल्याला माहीतच आहे, रक्त वाढीसाठी म्हणा, इम्युनिटी साठी म्हणा, कोलेस्ट्रॉल साठी म्हणा,सर्वांसाठी विशेष करून महिलांसाठी तर ते खूपच फायद्याचे असते,त्या सोबतच अक्रोड म्हणजेच वॉलनटला ब्रेन फूड मानलं जातं, या मध्ये रोग प्रतिकारक्षमता असते, त्या शिवाय हृदया साठी ही अक्रोड खूपच महत्वाचे असते...लहान मुलांना स्मरण शक्तीसाठी आहारात नेहमी अक्रोड चा समावेश करावा... एकंदरीत काय तर हे दोन्ही सुपर फूड आहेत, आणि यापासून ही सुपर हेल्दी अशी ही रेसिपी.... आणि सॅलड चा नेहमीच्या आहारात समावेश असणं आरोग्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरते... तेव्हा नक्की ही रेसिपी करून बघा.. Shital Siddhesh Raut -
व्हेज बिट कटलेट (veg beet cutlets recipe in marathi)
#Heart # व्हेलेंटाईन पार्दी ह्यांच्या नावाने १४ फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस संपूर्ण जगभर साजरा केला जातो आपल्या आवडत्या व्यक्ति बद्दल प्रेम व्यक्त करण्याचा दिवस शुभेच्छा , फुले, संदेश, चॉकलेट किंवा इतर गिफ्ट देऊन आपले प्रेम व्यक्त केले जाते आज मी अशीच हार्टची रेसिपी येथे शेअर केली आहे चला तर बघुया व्हेज बिट कटलेट रेसिपी Chhaya Paradhi -
हार्ट चाॕकलेट (Heart chocolate recipe in marathi)
व्हेलन टाईन डे स्पेशल ( हार्ट चॉकलेट )Sheetal Talekar
-
एगलेस रोझ वेलवेट हार्ट केक (eggless rose velvet cake recipe in marathi)
#Heartअसं म्हणतात, प्रेम, एक अशी भावना जी व्यक्त होताच चेहरा खुलतो, बहर येतो. तसं बघितलं तर प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी कुठल्याही ठराविक वेळेची, जागेची, गरज नसते. ३६५ दिवस हे प्रेमाचेच असतात पण व्हॅलेंटाइन डे की बात ही कुछ और है!Valentine's Day special❤️ साठी माझ्या कुंटूंबाकरिता ,मी आज रोझ वेलवेट केक बनवला आहे..💕💖😍 Deepti Padiyar -
व्हेजिटेबल डम्पलिंग (vegetable dumpling recipe in marathi)
#HLR "व्हेजिटेबल डम्पलिंग"मुलांच्या आवडीचे "व्हेजिटेबल डम्पलिंग" म्हणजे त्यांना सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र खाऊ घालण्याचे पौष्टिक असे रॉकेट सायन्स...😊😊 Shital Siddhesh Raut -
-
सोया व्हेजि मोमोस (soya veg momos recipe in marathi)
#स्टीमआपण व्हेज मोमोस नेहमी बनवतात आज मी काहीतरी वेगळं करावं म्हणून त्यांत सोयाबिन चा वापर केला आहे, खाण्या साठी एकदमच नवीन आणि चविष्ट असा हा पदार्थ बनतो. Sulaksha Redkar Narvecar -
रेड वेलवेट हार्ट (red velvet heart recipe in marathi)
#Heartव्हॅलेंटाईन डे निमित्त आज मी रेड वेलवेट केक बनविला त्यालाच हार्ट शेप मध्ये आकार दिला आणि साकार झाला रेड वेलवेट हार्ट... Deepa Gad -
चिकन मोमोस (Chicken Momos Recipe In Marathi)
#SCRबाहेरील पाऊसाची बरसात काहीतरी चमचामीत हवय तर मग बनवा अशे स्वादिष्ट चिकन मोमोस. Rutuja Mujumdar -
लिटिल हार्ट डोन्हट्स (little heart donuts recipe in marathi)
😋😋#Heartदिल हैं की मानता नाही...... माझा फेवरेट गाणं तसच काय करू दिल मानत नाही😄 म्हणू अजुन काहीतरी गोड पदार्थ कोणता करायचा व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी??तर मी ठरवलं छोटुशे सुंदर हार्ट शेप डोन्हट्स बनवुया.तर एन्जॉय करा रेसिपी 😍😊. Deepali Bhat-Sohani -
हार्ट ब्रेड (heart bread recipe in marathi)
#Heart #१४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो हा एकप्रकारे प्रेमी युगुलांसाठी प्रेमाचा आणि रोमांसचा अनोखा उत्सवच आहे या दिवशी लोक त्यांच्या प्रियकर प्रियसी किंवा जोडीदाराला सुंदर भेटवस्तु आणि संदेश पाठवतात व्हॅलेंटाईन डे संत व्हॅलेंटाईन ह्यांच्या नावाने साजरा केला जातो चला तर ह्या निमित्ताने मी बनवलेली हार्ट ब्रेड ही सोपी रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
हार्ट बीट चकली (heart beet chakli recipe in marathi)
#heartप्रेम दिवसाच्या शुभेच्छा.... ❤️नेहमी गोड खाऊन कंटाळा येतो मग...काहीतरी खमंग,खुसखुशीत खावे वाटे...अशावेळी आठवते ती आपली पारंपरिक भाजणीची चकली...तिला नावीन्य रूप देवून अतिशय पौष्टिक असा पदार्थ जो मुलांना करायला आणि खायला दोन्ही आवडतो....कुठलाही रंग न वापरता केलेली हार्ट बीट चकली.... ❤️ Shweta Khode Thengadi -
व्हेज स्टीम मोमोज (veg steam momos recipe in marathi)
#मोमोज#सप्टेंबरव्हेज मोमोजमोमोज हा खूप प्रसिद्ध असा पदार्थ आहे.ही एक तिबेटीयन रेसिपी आहे. नेपाळ,सिक्कीम,हिमाचलप्रदेश,आणि दिल्लीकडे नॉर्थसाईड ला गेलात तर जागोजागी तुम्हाला मोमोज मिळतात.तिथे हे स्ट्रीटफूड म्हणून खूप फेमस आहे.आपल्या इथे ही सर्वांना मोमोज खूप आवडतात. मोमोज मधील भाज्या स्टीम केल्याने ही रेसिपी तेवढीच हेल्दी बनते.मोमोज बनवताना तुम्हाला आपले मोदक नक्कीच आठवतील. फक्त आतल सारण वेगळं बाकी वळवण्याची, स्टीम करण्याची पद्धत सेम. मोमोज ला तुम्ही हवा तो आकार द्या. वास्तविक तिबेटच्या मोमोज चवीबद्दल काही कल्पना नाही परंतु मी बनवलेल्या मोमोज ची चव अफलातून होती . Prajakta Patil -
हिडन सरप्राईज हार्ट केक (hidden surprise heart cake recipe in maathi)
#Heart#Valentine Day Specialआज व्हॅलेंटाइन डे साठी खास हा छुपे रुस्तम हार्ट केक मी हेच नाव ठेवलंय.... म्हणजेच हिडन सरप्राईज हार्ट केक... कसा वाटला जरूर सांगा Deepa Gad -
व्हॅलेंटाईन स्पेशल रेड वेलवेट केक (red velvet cake recipe in marathi)
#heart#केकआज व्हॅलेंटाईन डे आहे त्यात कुकपँड वर व्हॅलेंटाईन वीक चालू केले आहे तर आज फायनल दिवस प्रेम व्यक्त करण्याचा आहे त्यात माझा आज आनंद द्विगुणित होत आहे आज कूकपॅडवर व्हॅलेंटाईन डे आणि माझी शंभरावी पोस्ट आहे ही दोघं आनंद मला आज मिळाली आहे आणि तसा योगही जुळून आला व्हॅलेंटाईन स्पेशल रेड वेलवेट केक मी आज सगळ्यांसाठी प्रेम व्यक्त करून सादर करत आहे माझी रेड वेलवेट केक ची रेसिपी देऊन . प्रेम तुझा रंग कसा आपण बघतो तसा असच काही आहे प्रेमाचे 'चुरा लिया है तुमने जो दील को' हे गाणे गुण गुनत मी केक तयार केला प्रेमाने प्रेमाच्या मुडने ,आनंदानेप्रेमाचे असे खूप छान छान गाणी आपण गात आनंदात आपले प्रेम व्यक्त करत असतो. पूर्वी शेर, शायऱ्या चारोळ्या असे अनेक प्रकार होते प्रेम व्यक्त करण्यासाठी आता तेवढा नागमोडी मार्ग नाही प्रेमाचा मार्ग खूप सरळ झाला आहे जवळपास सगळ्यांनीच प्रेम समजून घेतले आहे . प्रेम हे कोणाचे लपूनछपून कोणाचे बिंदास कोणाचे न बोलताच कोणाचे बोलके असे हे प्रेमाचे बरेच प्रकार आहे . आज प्रेम व्यक्त करण्याची पद्धत पाश्चात्त्य असली तरी खूपच छान असा प्रकार आहे आपण प्रामाणिकपणे बिंदास होऊन सगळ्यांसमोर आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ते जगभरात सांगू शकतो एकमेकावर असेच प्रेम करत राहून सांगता न सांगता कशाची आशा न करता असेच एकमेकांसाठी जगता जगता प्रेमाने हे आपले जीवन भरून घेऊ , एकमेकांना आनंद देऊया आनंद वाटूया आनंदाने प्रेमाने प्रेम करूया 😍😍😍😍❤️💓💗💘💝💞💟🌹🌹🍹🍽️🎂🎂🎂🍫🍬 Chetana Bhojak -
"हार्ट शेप सॅन्डविच" (heart shape sandwich recipe in marathi)
#Heart "हार्ट शेप सॅन्डविच" लता धानापुने -
-
-
शाकाहारी मोमोज (veg momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरपोस्ट १मोमोज हा पदार्थ शाकाहरी आणि मांसाहरी या दोन्ही गटात मोडतो, कारण मोमोजच्या आत जे सारण असते त्यात भाज्या घातल्या की हा शाकाहरी झाला आणि चिकण किंवा मटण खिमा करून घातले तर हे मांसाहरी मोमोज झालेत. मी मोमोज बनवण्याचा कधी प्रयत्न नव्हता केला. पण कूकपॅडच्या थीम मुळे आज संधी मिळाली मोमोज बनवण्याचा. खूप छान झाले एकदम चविष्ट. शाकाहारी मोमोजची रेसिपी मी शेअर करतेय. स्मिता जाधव -
-
"पारंपारिक पद्धतीने सांजोरी हार्ट शेप मध्ये" (sanjori heart shape recipe in marathi)
#Heart "सांजोरी_ या पुरीला कोल्हापूर साईटला तेलची म्हणतात.. कोणी साटोरी म्हणतात,तर कोणी सजुरी. आमच्या गावाकडे सांदुरी पुरी म्हणतात.... लग्नकार्यात ही सांदुऱ्याची पुरी खुप मानाची असते..नवऱ्या मुलांचे घर असेल तर एक पाटीभर (मोठी टोपली) पुऱ्या बनवल्या जातात.. आणि नवऱ्या मुलीचे घर असेल तिथे तर चांगल्या मोठ्या दोन टोपल्या भरून या पुऱ्या बनवल्या जातात रुखवत या पुरी शिवाय पुर्ण होत नाही.. नवरी सोबत शिदोरी म्हणून द्याव्या लागतात.. अशी ही खुसखुशीत सांजोरी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटले च समजा.. मला तर खुपचं आवडते.. हार्ट शेप च्या तीन रेसिपी बनवल्या होत्या.पण मला सांजोरी आठवली म्हटलं पारंपारिक रेसिपी ला नवीन लुक देऊन करुया.. .. सगळ्या आकाराच्या सांजोऱ्या बनवुन मी माझी हौस पूर्ण केली..पण फोटो काढायचे राहून गेले... तुम्ही करून बघा नक्की आवडेल.. चला तर या सांजोरीची रेसिपी दाखवते... लता धानापुने -
स्टॅाबेरी हार्ट बर्फी (strawberry heart barfi recipe in marathi)
#Heart#स्टॅाबेरी बर्फी# ०हॅलेनटाईन डे म्हटल की डोळ्यांसमोर येत ते म्हणजे प्रेमाच प्रतीक लाल रंगांचा फुल , म्हणुन मी सुध्दा आज फक्त लाल स्टॅाबेरीचा वापर केला आहे , तो पण हार्ट शेप मधे बर्फी केली , चला तर मग बघु या ..... Anita Desai -
फ्रुटी व्हॅलेंटाईन हार्ट पराठा (fruit valentine heart paratha recipe in marathi)
#Heart# फ्रूटी हार्ट पराठाआजच्या खास दिवसा साठी एक हेलदी ऑप्शन म्हणून मी फळाचा वापर केला आहे. Rohini Deshkar -
"हार्ट शेप मलाई चाप" (heart shape malai chaap recipe in marathi)
#Heart "हार्ट शेप मलाई चाप" प्रेम दिनानिमित्त गोड गोड मलाई चाप पाठवले आहेत.. गोड मानून घ्या.. खरं तर मलाई चाप साखरेच्या पाण्यात शिजवून झाले की आडवे कापून माव्याचे मिश्रण घालून तीन बाजूंनी प्लेन करून घेतात. मी नेहमी तसेच बनवते..पण आज थोडं वेगळ्या पद्धतीने बनवले आहेत.. खुप मधुर चवीचे हे मलाई चाप माझ्या नातवंडांना आणि आम्हाला ही खुप आवडतात..चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
हिडन सरप्राइज हार्ट केक❤️❤️ (hidden surprise heart cake recipe i
#Heartआपण आपली सुख दुःख नेहमीच आपल्या जवळच्या माणसांसोबत ,प्रेमळ हृदयाद्वारे शेअर असतो.एक बायको ,आई ,बहिण ,आजी ,ताई नेहमीच आपल्या कुटुंबातील प्रत्येकाला खूश ठेवण्याच्या धडपडीत असते.यातही तीआपली आवड विसरून, सर्वांच्या आवडी निवडी जपते...😊आज मी ,हा सरप्राईज केक बनवून ,माझ्या प्रेमळ भावना माझ्या कुटूंबासोबत शेअर केल्या आहेत..😊माझ्या घरच्यांना खूप आवडला हा केक..😊चला तर,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
रेड वेलवेट कुकीज (Red velvet cookies recipe in marathi)
#EB13#W13#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चॅलेंजरेड_वेलवेट_कुकीज व्हँलेंटाईन डे happening करायचा असेल तर red roses बरोबर या रेड वेलवेट म्हणजेच लाल मखमली कुकीज असतील तर दिल दिवाना हो गया समझो..🥰...व्हँलेंटाईन डे चा प्रेमाचा लाल रंग या मखमली लाल रंगाच्या कुकीज ने अधिक खुलून येतो..❤️ आणि प्रेमा ,तुझा रंग कसा ??म्हणत प्रेमाच्या लाल रंगाच्या पिन पासून ते लाल पेना पर्यंत वापर करुन प्रेम म्हणजे प्रेम असतं..तुमचं आमचं सेम असतं ❤️...म्हणत प्रेम व्यक्त केलं जातं..प्रेमाची ग्वाही दिली जाते..आता कोणी म्हणतं प्रेम व्यक्त करायला हा एकच दिवस कां..मग इतर 364 दिवस काय???..पण जगण्याचा उत्सव करणार्या उत्साही मनांना प्रेमाच्या आणाभाका देण्यासाठी हा दिवस खास पद्धतीने साजरा करायचाच असतो..(मग भले इतर दिवस एकमेकांच्या उरावर का बसेनात😜) बरोबर ना...😊 आपली मैत्रिण @shitals_delicacies शितल मुरंजन हिने zoom meeting च्या सेशनमध्ये या रेड वेलवेट कुकीज कशा तयार करायच्या याचं live demonstrationदिलं होतं..मी तेव्हाच ठरवलं की या व्हँलेंटाईन ला या रेड वेलवेट कुकीज करुन बघायच्या. शितल,अतिशय सुंदर झाल्यात कुकीज..Thank you so much for this wonderful recipe..🌹❤️❤️ तुम्हांला देखील ही रेसिपी हवी असेल तर चला माझ्याबरोबर किचनमध्ये.. Bhagyashree Lele
More Recipes
टिप्पण्या (2)