चटपटीत गार्लिक चटणी (chatpatit garlic chutney recipe in marathi)

Mangala Bhamburkar
Mangala Bhamburkar @cook_26659112
Amravati

#GA4
#week24
#garlic
लाल मिरचीची चटणी ठेचा लोणचं हे प्रत्येकाकडे साधारणत केल्या जातात आज आपण राजस्थानी स्टाईल चार्ली चटणी बघणार आहोत .दिसायला v खायलाही झणझणीत चटणी थालीपीठ ,पराठे ,भाकरी ,सँडविच कशाही सोबत छान लागते.

चटपटीत गार्लिक चटणी (chatpatit garlic chutney recipe in marathi)

#GA4
#week24
#garlic
लाल मिरचीची चटणी ठेचा लोणचं हे प्रत्येकाकडे साधारणत केल्या जातात आज आपण राजस्थानी स्टाईल चार्ली चटणी बघणार आहोत .दिसायला v खायलाही झणझणीत चटणी थालीपीठ ,पराठे ,भाकरी ,सँडविच कशाही सोबत छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिन.
५ व्यक्ती
  1. 50 ग्राम (1 वाटी)लाल सुकी मिरची
  2. 1 वाटीसोललेला लसूण
  3. 1 टीस्पूनजिर
  4. 1 टीस्पूनधने
  5. 1 टीस्पूनहिंग
  6. 2-3पिकलेल्या चिंचेचे बोटुक
  7. 1 इंचआले
  8. 1/2 कपतेल

कुकिंग सूचना

२० मिन.
  1. 1

    प्रथम कढई गरम करा त्यात सुखी लाल मिरची घाला व कोरडी होईपर्यंत भाजा कारण ओलावा राहिल्यास चटणी खराब होईल

  2. 2

    भाजलेली मिरची बाजूला काढून ठेवा व कढई मध्यम आचेवर गरम करा. त्यात अर्धा कप तेल बुडबुडे दिसेपर्यंत गरम होऊ द्या

  3. 3

    त्यातलं बरंचसं तेल काढा,पुढे चटणी वाटताना ते कमी येईल.कढई मध्यम आचेवर गरम होऊ द्या. त्यात सोललेला लसूण घाला, १"बारीक कापलेले अद्रक चे तुकडे घाला. व हलकस गुलाबीसर रंग येयी पर्यंत भाजा,म्हणजे त्यातला बराचसा ओलावा कमी होईल.लसुन ब्राऊन होऊ देऊ नये.म्हणजे चटणी टिकण्यास मदत होईल.

  4. 4

    नंतर त्यात एक टीस्पून जीरे, एक टीस्पून अख्खे धने,थोडीशी चिंच मंद आचेवर भाजा, एक टेबलस्पून मीठ,हिंग घाला व ३मिन. पर्यंत छान भाजून घ्या. मिठामुळे लसूण थोडं पाणी सोडेल व त्यामुळे ओलावा कमी होईल.

  5. 5

    गॅस बंद करा व वरील मसाल्यात, पहिलेच भाजलेली लाल मिरची, एक टेबलस्पून कश्मिरी लाल मिरची पावडर घाला.वरील मसाला थंड होऊ द्या

  6. 6

    वरील मसाला थंड झाल्यानंतर मिक्सर वाटी मध्ये बारीक करा ते मिश्रण कोरडं वाटल्या जाईल,नंतर थोडे थोडे तेल टाकून परत जाडसर वाटा व काचेच्या बाऊलमध्ये काढा म्हणजे एक महिन्यापर्यंत छान टिकेल.

  7. 7

    चटपटीत व झणझणीत चटणी तयार होईल ही चटणी थालीपीठ सॅंडविच भाकरी, पुरी कशाही सोबत सर्व्ह करता येईल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mangala Bhamburkar
Mangala Bhamburkar @cook_26659112
रोजी
Amravati

टिप्पण्या

Similar Recipes