बासुंदी रेसिपी (basundi recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#wd
#cooksnap- ujwala Rangnekar
वूमन्स डे स्पेसिअल ही रेसिपी मी माझ्या मुलीला डेडीकेट करत आहे.उज्वला ताई चीही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान झाली होती चवीला.खूप आवडली सगळ्यांना.माझ्या मुलीला बासुंदी खूप आवडते म्हणून मी तिच्या साठी बनवली होती.
उज्वला ताई ही रेसिपी पोस्ट केल्याबद्दल खूप धन्यवाद 🙂🙏🙏

बासुंदी रेसिपी (basundi recipe in marathi)

#wd
#cooksnap- ujwala Rangnekar
वूमन्स डे स्पेसिअल ही रेसिपी मी माझ्या मुलीला डेडीकेट करत आहे.उज्वला ताई चीही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान झाली होती चवीला.खूप आवडली सगळ्यांना.माझ्या मुलीला बासुंदी खूप आवडते म्हणून मी तिच्या साठी बनवली होती.
उज्वला ताई ही रेसिपी पोस्ट केल्याबद्दल खूप धन्यवाद 🙂🙏🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 लिटरफुल क्रीम दूध
  2. 100 ग्रामसाखर (कमी जास्त करणे)
  3. 1 टीस्पूनवेलची पूड
  4. 6-7केशर काड्या
  5. 2 टेबलस्पूनचारोळे
  6. 8-9काजू
  7. 8-9बदाम
  8. 8-9पिस्ते

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    प्रथम दूध पातेले मध्ये घेऊन ते छान उकळी येई पर्यंत तापवून घेणे. नंतर गॅस बारीक करून त्या मध्ये डाव घालावा. व बारीक गॅस वर दूध आटवण्यासाठी ठेवावे.

  2. 2

    मधून मधून दूध डावाने हलवत राहावे म्हणजे छान उकळून सायी मुळे घट्ट होते.10 मिनिटे उकळून झाली कि त्या मध्ये आपल्या चवीनुसार साखर घालून घेणे.व छान बारीक गॅस वर उकळू देणे.

  3. 3

    आता त्या मध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घेऊन त्याची पूड करून ती दुधा मध्ये घालावी. व वेलची पूड घालावी. म्हणजे ड्रायफ्रूट आणि वेलचीचा स्वाद छान येतो दुधाला.20 मिनिटे छान दूध आटवून घेणे.

  4. 4

    हळू हळू दुधा चा रंग गुलाबी होण्यास सुरवात होते. आता त्या मध्ये चारोळे आणि केशर काड्या घालावे. रंग छान येतो. दूध निम्मे आटवून घेणे. अशा प्रकारे मस्त टेस्टी अशी बासुंदी तयार झाली.

  5. 5

    मस्त सर्व्ह करण्यासाठी बासुंदी तयार आहे.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

Similar Recipes