अमृतफळ (amrutphal recipe in marathi)

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786

#shravanqueen #cooksnap मी अंजली भाईक ताई ह्यांची अमृतफळ ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे.अंजू ताई अमृतफळ ही रेसिपी खूप छान झाली आणि घरी सुद्धा सर्वांनाच आवडली. आणि महत्त्वाचे म्हणजे खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. थँक यु सो मच ताई🙏😍

अमृतफळ (amrutphal recipe in marathi)

#shravanqueen #cooksnap मी अंजली भाईक ताई ह्यांची अमृतफळ ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे.अंजू ताई अमृतफळ ही रेसिपी खूप छान झाली आणि घरी सुद्धा सर्वांनाच आवडली. आणि महत्त्वाचे म्हणजे खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. थँक यु सो मच ताई🙏😍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनीटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपतांदळाचे पिठ
  2. 1 कपओल्या नारळाचा कीस
  3. 3/4 कपदही
  4. चिमुटभरमीठ
  5. 1 कपसाखर
  6. 1 कपपाणी
  7. 4 ते 5ते पाच केशर काड्या
  8. 2 चिमुटभरकेशरी रंग
  9. तळण्याकरिता तूप किंवा तेल

कुकिंग सूचना

20 मिनीटे
  1. 1

    सर्वात आधी एका पातेल्यामध्ये साखर आणि पाणी टाकून एकतारी पाक करायला ठेवून द्यावे व त्यामध्ये चिमूटभर रंग आणि केशर काड्या पण टाकाव्यात. म्हणजे पाकाला छान कलर येतो.

  2. 2

    आता मिसरच्या पॉट मध्ये दही, खोबर्‍याचा किस,तांदळाचे पीठ,चिमूटभर मीठ, चिमुटभर केशरी रंग टाकून सरबरीत बारीक करून घ्यावे. मिश्रण जर खूपच घट्ट वाटलं तर त्यामध्ये थोडंसं पाणी सुद्धा तुम्ही ऍड करू शकता. आपल्याला हे मिश्रण भज्यासारखं तयार करून घ्यायच आहे.

  3. 3

    आता एका कढईत तेल किंवा तूप टाकून त्यामध्ये अमृतफळ भज्सासारखे तळून घ्यावेत.

  4. 4

    आता या अमृतफळाला तयार केलेल्या पाकात टाकून 10 मिनिटे मुरू द्यावे आणि मग या अमृतफळाचा देवाला नैवेद्य दाखवून खायला घ्यावेत. चला तर मग करून बघा आणि सांगा मग कसे लागतात ते🙏😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
रोजी

Similar Recipes