दाक्षिणात्य दहीवडे (dahi wade recipe in marathi)

Rohini Kelapure
Rohini Kelapure @cook_25511830
पुणे

#GA4
#week25
#dahi wada हा कीवर्ड घेऊन मी नेहमीपेक्षा वेगळे #दाक्षिणात्य_दहीवडे केले आहेत.
हल्ली आपण चिंच गुळाची चटणी, हिरवी चटणी हे घातलेले दहीवडे सगळीकडे पाहतो, खातोही. लग्न, मुंज, किटी पार्टी, गेट टुगेदर सगळीकडे हे केले जातात.
पण हे दहीवडे करण्याचं मनात आलं आणि माझं मन एकदम बालपणात गेलं. खरेदीला कुठे बाहेर गेलो की हमखास उडप्याच्या हॉटेल मध्ये जायचो. तिथे इडली डोसा याचबरोबरीने मागवली जाणारी आमची फेवरेट डिश म्हणजे हे दहीवडे. मुंबईच्या उकाड्यात हे गारेगार पोटभरीचे वडे म्हणजे आम्हाला अगदी आहाहा असेच वाटायचे!
घरीसुद्धा आता सारखं ऊठसूठ असे पदार्थ केले जात नव्हते. त्यामुळे आम्हा मुलांना त्यांचं फार अप्रूप वाटायचं.
तर असे हे माझ्या आवडीचे दहीवडे तुम्हालाही नक्की आवडतील, नक्की करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
३ व्यक्ती
  1. 1/2 वाटीउडीद डाळ
  2. तुकडाआल्याचा अगदी लहानसा
  3. तुकडाखोबऱ्याचा अगदी छोटासा
  4. 3हिरव्या मिरच्या
  5. 1 चमचाकढीपत्ता
  6. 1/4 चमचामोहरी
  7. 1लाल सुकी मिरची
  8. चवीप्रमाणे मीठ
  9. 1 चमचासाखर
  10. 1 वाटीदही
  11. 1/2 वाटीपाणी
  12. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    उडीद डाळ स्वच्छ धुवून ४ तास पाण्यात भिजत घालावी. निथळून ¼ चमचा मीठ घालून वाटून घ्यावी.

  2. 2

    १ लहान मिरची, आले आणि खोबऱ्याचे अगदी लहान तुकडे करावेत. सगळे डाळीत घालून हाताने खूप फेटून घ्यावेत.

  3. 3

    कढईत तेल तापवावे. डाळीच्या मिश्रणाचे मध्यम आकाराचे चपटे गोळे बनवून मध्यम आचेवर किंचित गुलाबीसर तळून घ्यावेत. वडे लगेच गार पाण्यात बुडवून ठेवावेत.

  4. 4

    दही आणि ½ वाटी पाणी गाळण्यातून गाळून घ्यावे. त्यात साखर आणि थोडेसे मीठ घालून एकत्र करावे. वडे हाताने अलगद दाबून त्यातले पाणी काढून टाकून दह्यात घालावे.

  5. 5

    एका पळीत २ चमचे तेल तापवून त्यात मोहरी, सुक्या आणि हिरव्या मिरच्या तसेच कढीपत्ता घालून चरचरीत फोडणी करावी. अलगद छान पसरून दहीवड्यावर घालावी.

  6. 6

    मग दहीवडे फ्रिजमध्ये मस्त गार होऊ द्या. आगळ्यावेगळ्या चवीचे हे दहीवडे तुम्हाला नक्की आवडतील.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rohini Kelapure
Rohini Kelapure @cook_25511830
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes