मिक्स व्हेजी डाळवडा (mix veg dal vada recipe in marathi)

Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
नाशिक

#SR 
नेहमीच्या डाळ वड्या पेक्षा ही जरा हटके रेसिपी आहे. ह्या वड्या मध्ये मी जास्तीत जास्त न खाल्ल्या जाणाऱ्या भाज्यांचा समावेश केला आहे. जसे की डांगर, टोमॅटो, पालक इत्यादी. तसेच नेहमीपेक्षा वेगळ्या डाळींचा म्हणजे मसूर व सफेद उडीद डाळ याचाही वापर मी केला आहे हा वडा अतिशय चविष्ट व पौष्टिक होतो नक्की ट्राय करून बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटे
दोन जणांसाठी
  1. 25 ग्रॅममसूर डाळ
  2. 25 ग्रॅमसफेद उडीद डाळ
  3. 50 ग्रॅमचना डाळीचे पीठ
  4. आवडीनुसार डांगराचे काप
  5. 1बटाटा
  6. 1टोमॅटो
  7. 7-8 पालकाचे पाने
  8. थोडेसे पनीर किसलेले
  9. 1/2कांदा चिरलेला
  10. 1/2गाजर किसलेले
  11. 1 टीस्पूनलसूण पेस्ट
  12. कोथिंबीर आवडीनुसार
  13. 1 टीस्पूनधना जिरा पावडर
  14. 2 टीस्पूनलाल तिखट
  15. मीठ आवडीनुसार
  16. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    प्रथम सफेद उडीद डाळ मसूर डाळ टोमॅटो व बटाटा एकत्र शिजवून थंड करून घेतले. थंड झाल्यावर ते चांगले एकत्रित स्मॅश केले.

  2. 2

    आता त्यात चना डाळीचे पीठ मिक्स केले. आता त्यात गाजर किसले. पालक व कोथिंबीर चिरून घातली

  3. 3

    पनीर व कांदा आणि हळद मिक्स केले. लसून पेस्ट व लाल तिखट घातली. धना जिरा पावडर घातली. व मिश्रण एकजीव केले.

  4. 4

    आता तळ हातावर वडे चपट गोलाकारात थापून मध्यम आंचेवर खरपूस तळून घेतले. तयार आहे मिक्स व्हेजी डाळवडा. हा डाळ वडा हिरवी चटणी अथवा दही किंवा टोमॅटो सॉस बरोबर अतिशय सुंदर व छान लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
रोजी
नाशिक
नवनवीन पदार्थ व स्वयंपाक बनवणे माझं वेड. विश्व आहे.
पुढे वाचा

Similar Recipes