केळ्याचे चिप्स (kedyachi chips recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#cooksnap

खरं केळं हे फळ असं आहे की, जे वर्षभर उपलब्ध असतं. तसंच केळं खाण्याचे बरेच फायदे देखील आहेत. कच्चं केळं हे देखील खूप फायदेशीर मानलं जातं. आजवर आपण केळ्यापासून तयार केलेले अनेक पदार्थ खाल्ले असतील. पण केळ्याचे वेफर्स (Banana chips) हा जवळपास सर्वांचाच आवडता पदार्थ (Recipe) आहे. त्यामुळे तो लोकप्रिय देखील आहे. हा पदार्थ एवढा सोप्पा आहे की, आपण घरी देखील तो सहजपणे बनवू शकता.

आज मी दिपाली सोहनी यांची केळ्याचे चिप्स ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.
खूप छान कुरकुरीत झाले आहेत चिप्स.
फक्त मी थोडासा बदल केला आहे.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

२० ते २५ मि.
३ ते ४ सर्व्हिंग
  1. 3-4 कच्ची केळी
  2. 1 टेबलस्पूनहळद
  3. मीठ चवीनुसार
  4. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

२० ते २५ मि.
  1. 1

    प्रथम केळी पील करून घ्या.

  2. 2

    पातळ आकारात स्लाइस करून घ्या.

  3. 3

    बाऊलमधे २ कप पाणी घेऊन मीठ,हळद एकत्र करा आणि तयार स्लाइस १५ मि.बुडवून ठेवा.

  4. 4

    चाळणीमधे हे चिप्स गाळून घ्या.

  5. 5

    तेल गरम करून चिप्स मध्यम आचेवर कुकरीत तळून घ्या.

  6. 6

    कुरकुरीत केळ्याचे चिप्स खाण्यासाठी तयार आहेत...😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes