मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#gp
#मँगो शिरा
#आंब्याचा शिरा

मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)

#gp
#मँगो शिरा
#आंब्याचा शिरा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपजाड रवा
  2. 1/4 कपसाखर(आवडीप्रमाणे जास्त करणे)
  3. 1/2 कपआंब्याचे तुकडे
  4. 1/4 कपआंब्याचा रस
  5. 1 टीस्पूनवेलची पूड
  6. आवडीनुसार काजू, बदाम
  7. 1-1/2 कपपाणी
  8. 4-5 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

20-25 मिनिटे
  1. 1

    प्रथम शिरासाठी लागणारे साहित्य काढून घेणे. आंब्याचा रस काढून घेणे. आंब्याची साल काढून त्याचे बारीक तुकडे करून घेणे.

  2. 2

    आता गॅस वर कढई ठेवून त्या मध्ये 1 चमचा तूप घालून रवा छान सोनेरी रंगावर भाजून घेणे. 5-6 मिनिटे लागतात.रवा भाजत आला कि छान वास येऊ लागतो. गॅस बंद करून तो रवा एका प्लेट मध्ये काढून घेणे.

  3. 3

    आता आंब्याचा रस मिक्सर पॉट मधून फिरवून घेणे. आता त्याच कढई मध्ये 2 चमचे तूप घालावे. व काजू बदाम सोनेरी रंगावर परतून घेणे. ते वाटीत काढून घेणे. व त्या मध्ये आंब्याचे बारीक केलेले काप घालावेत. थोडे काप काढून ठेवावेत.2 मिनिटे तुपात परतून त्या मध्ये आंब्याचा रस घालून 1 मिनिट हलवून घेणे.

  4. 4

    आता या मध्ये भाजलेला रवा घालून हलवून घेणे. आता त्या मध्ये गरम केलेले पाणी घालावे. व झाकण ठेवून 5 मिनिट वाफ आणावी.आता त्या मध्ये आपल्या आवडीनुसार साखर, ड्रायफ्रूट, वेलची पूड घालून सगळे एकजीव करून घेणे. पुन्हा झाकण ठेवून 5 मिनिटे वाफ काढून घेणे.

  5. 5

    वरून पुन्हा 1 चमचा तूप सोडावे म्हणजे शिऱ्याला स्वाद छान येतो. मस्त टेस्टी आंब्याचा शिरा खाण्यासाठी तयार आहे. गरम गरम सर्व्ह करावा.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

Top Search in

Similar Recipes