चिकन रस्सा (Chicken rassa recipe in marathi)

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
Sanpada ( Navi Mumbai)

चिकन रस्सा (Chicken rassa recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
4 ते 5 लोकांकरिता
  1. 1/2 किलोचिकन
  2. मॅरीनेट कण्यासाठी -
  3. 2 टेबलस्पून दही,
  4. 1/4 टीस्पून हळद,
  5. 1 टेबलस्पूनमीठ,
  6. 2 टेबलस्पून (आले +लसूण +पुदिना +कोथम्बीर) एकत्रित पेस्ट,
  7. 2 टीस्पूनमीठ
  8. मसाला वाटण -
  9. ओले खोबरे,
  10. सुखे खोबरे,
  11. 1 लसूण कांदा,
  12. 1 कांदा, कोथम्बीर, आल्याचा छोटा तुकडा,
  13. गरम मसाला -
  14. 2 टेबलस्पून धने, प्रत्येकी
  15. 1 टेबलस्पून बडीशेप, खसखस, पांढरे तीळ,
  16. 1 हिरवी वेलची,
  17. 1 चक्री फूल,
  18. 1 टीस्पूनचिकन मसाला,
  19. फोडणीसाठी -
  20. 1/2 वाटीतेल, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता
  21. 3 टेबलस्पूनकांदा - लसूण मसाला,
  22. 1 टीस्पून तिखट

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    चिकन स्वच्छ धुऊन, दहा मिनिटे मॅरीनेट करून ठेवावे. त्यानंतर पातेल्यात तेल गरम करावे, कढीपत्ता, कांदा फोडणीला घालावा. कांदा लालसर झाल्यावर मॅरीनेट चिकन घालून चांगले परतावे, झाकण झाकून एक वाफ आणावी. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालावे.

  2. 2

    तव्यावर गरम मसाला भाजून घ्यावा. थोडया तेलावर कांदा, सुखे खोबरे वेगवेगळे भाजून घ्यावे. गरम मसाल्याची मिक्सरला पूड करून वरील मसाल्याचे सर्व साहित्य एकत्र बारीक वाटून वाटण तयार करावे.

  3. 3

    तेल गरम करून घेऊन त्यावर वाटण घालून परतावे, लाल तिखट, चिकन मसाला, कांदा - लसूण मसाला घालावा. कडेने तेल सुटेपर्यंत चांगले परतावे

  4. 4

    परतलेला मसाला शिजवून घेतलेल्या चिकन स्टॉक मध्ये घालावा, आवश्यकतेनुसार पाणी व गरजेनुसार मीठ घालावे हवा तेवढा रस्सा बनवावा. एक उखळी आल्यानंतर पाच मिनिटे शिजू द्यावा. तयार चिकन रस्सा सर्व्हिग बाउलमध्ये काढून कोथंबीरने गर्निश करावे व भाकरी किंवा चपाती बरोबर सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Manisha Satish Dubal
रोजी
Sanpada ( Navi Mumbai)

Similar Recipes