आप्पे चटणी (appe chutney recipe in marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

#trending
माझा आवडीचा स्नॅक्स म्हणजे आप्पे चटणी ,कधीही केंव्हाही हा पदार्थ मला दिला तरी चालतो म्हणून ट्रेंडिंग रेसिपी च्या निमित्ताने पुन्हा आज आप्पे चटणी बनवली बघू मग कशी बनवायची तर ...

आप्पे चटणी (appe chutney recipe in marathi)

#trending
माझा आवडीचा स्नॅक्स म्हणजे आप्पे चटणी ,कधीही केंव्हाही हा पदार्थ मला दिला तरी चालतो म्हणून ट्रेंडिंग रेसिपी च्या निमित्ताने पुन्हा आज आप्पे चटणी बनवली बघू मग कशी बनवायची तर ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 3 वाटी आप्पे साठी रवा
  2. 1 वाटीउडीद डाळ
  3. मीठ चवीनुसार
  4. 1 चमचाजिरेपूड
  5. 1 चमचाखण्याचा सोडा
  6. 2 चमचेचटणी साठी फुटाणे डाळ
  7. 2 चमचेशेंगदाणे कूट
  8. 50 ग्रॅमखोबरं
  9. 2 चमचादही
  10. मीठ चवीनुसार
  11. 1/2 चमचासाखर
  12. 1/2 चमचाजिरेपूड
  13. 2हिरव्या मिरच्या
  14. 2 चमचेकोथिंबीर
  15. फोडणीसाठी तूप,हिंग,जीरे ,मोहरी

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    रवा व उडीद डाळ 3-4 तास भिजत ठेवा,भिजून झालेवर मिक्सर मधून दोन्ही बारीक करून एकत्र करा व पुन्हा पीठ फरमेंट करण्यासाठी 4-5 तास ठेवून द्या

  2. 2

    पिठ फरमेंट झालेवर आप्पे करताना पिठात जिरेपूड, मीठ घालून हलवुन घ्या,मग एक छोट्या भांड्यात थोडं पीठ घेऊन त्यात थोडा सोडा घालून हलवुन घ्या व आप्पे पात्र गॅसवर ठेवा व पात्र गरम झालेवर त्यावर तेल लावून आप्पे चे पीठ घाला व झाकण लावा

  3. 3

    3-4 मिनिटे झालेवर झाकण उगडून आप्पे उलटे करून दुसऱ्या बाजूने भाजून घ्या,मग तयार झाले आपले आप्पे

  4. 4

    चटणी साठी सर्व साहित्य एकत्र घ्या,मग खोबरं, फुटाणे डाळ,शेंगदाणे कूट, कोथिंबीर, मिरची,मीठ, साखर,जिरेपूड,दही सर्वं एकत्र करून मिक्सर मधून बारीक करून घ्या,व मग वरून त्याला तुपाची जीरे,हिंग,मोहरी फोडणी द्या,हवं तेवढं पाणी घालून घ्या मग चटणी तयार

  5. 5

    मग गरमागरम आप्पे व चटणी सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes